विश्वव्यापी नेतृत्व मा.अमित भाई शहा यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे सदिच्छा भेट झाली.अखंड भारत निर्माण करण्यासाठीचे आशादायी नेतृत्व म्हणून अमित भाईंच्या नेतृत्वाकडे बघितले जाते.मा.अमित भाई शहा यांच्याशी माझी भेट घडवून आणल्याबद्दल आमचे नेते @sable_rajendra यांचे आभार!
ज्यांच्या परीक्षेत घोटाळा झाला ते विद्यार्थी outing, partying, hoteling यामध्ये व्यस्त आहेत, ज्याने आंदोलन सुरू केले तो पोटभर सामोशे, छोले भटुरे हादडून टेऱ्या वर करून डाराडूर झोपतो आणि ज्याने शाळा कॉलेज सोडून चाळीस वर्षे उलटली-ज्याचे देणे न घेणे तो सोनम वांगचुक उपोषण करून मरायला टेकलाय.
तात्पर्य : माणसाला समाजसेवेची आवड असावी पण किडा नसावा.
ही आठवते का?
श्रद्धा वालकर...३५ तुकडे झालेली..
चार वर्षे झाली...कोर्टात सुनावणी आली रे आली...
की त्या दिवशी आफताब पुढची तारीख मागतो..
कारणे माहिती का?
कधी यांना MA ची परीक्षा द्यायची असते..
कधी डेंटिस्ट कडे जायचे असते..
कधी मानसोपचार करणाऱ्या डॉक्टर कडे जायचे असते...
मला तर वाटते अडीचशे वर्षे लागतील फायनल शिक्षा व्हायला...
स्वतःच्या घरातील बाथरूम मध्ये घसरून. पडणारे आज land slide तज्ञ झाले आहेत
24 तासाच्या आत सगळे सुव्यवस्थित होईल याची खात्री आहे
प्रवेश द्वारावरचा बीम लवकरच पूर्ववत अधिक ताकदीचा उभारला जाईल हे नक्की
बाकी ज्यांना देवेंद्रजींचा द्वेषच करायचा त्यांनी आपले गुऱ्हाळ चालू ठेवावे
😂😂
Landslide is a natural calamity..
700mm rain is a natural calamity..
How Government is responsible for this?
Connecting Link is intact, the landslide happened outside the tunnel and not inside..
So how can people say it collapsed?
Why so much hate for the Infrastructure you all use too????? And if you don’t like it don’t use it. Simple.
Run an agenda but not so brainless and utterly stupid. It just exposes you.
2023 च्या वनडे विश्वचषकानंतर जसा वाईट अनुभव आम्हाला आला होता, अगदी तसेच आता पुन्हा घडत आहे. मी सकाळी उठले आणि पाहिले की माझे सोशल मीडिया अकाउंट अपमानास्पद मेसेजने भरले होते. आम्ही ठीक आहोत, पण हे लोक माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना लक्ष्य करत आहेत. खेळात आक्रमकता असणे ठीक आहे, पण खेळाच्या मागे एक सामान्य माणूस आणि त्याचे कुटुंब असते, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. - जेसिका हेड, ट्रॅव्हिस हेडची पत्नी
#viratkohli #travishead #JessicaHead #Viral #rcb
घरातले आवाज कायमचे थांबतात…
पण आपण त्यांची किंमत नेहमी उशिरा ओळखतो.”
आपण रोज ऐकतो,आईचा स्वयंपाकघरातला आवाज, बाबांचा वर्तमानपत्र दुमडतानाचा आवाज,चहाचा उकळण्याचा आवाज,घरभर होत असलेलं त्यांचं वाद-विवादाचं बोलणं.
हे सगळं आपल्याला इतकं “नॉर्मल” वाटतं की त्यांची उपस्थितीही आपण गृहित धरतो.
कधी कधी त्रासही होतो
“आई खूप ओरडते…”
“बाबा खूप बोलतात…”
“आवाज का करतात…?”
पण जीवनाचा एक नियम आहे
जे आवाज आपल्याला त्रास देतात,तेच आवाज नाहीसे झाल्यावर कानात आयुष्यभर हृदयाची जोरात धडधड ऐकू येते.
माणूस तोपर्यंत जवळ नसतो…जोपर्यंत त्याच्या जाण्याची भीती लागत नाही.
आज आई वडील स्वयंपाक करतायत,गप्पा मारतायत, काहीतरी चिडतायत,कधी कधी रागवतायत…हे सगळं जिवंतपणाचं चिन्ह आहे.
ते एक दिवस शांत झाले,
किंवा कुठेतरी दूर झाले की,
घरातलं घरपण उरत नाही,
भिंती तशाच राहतात,
पण घराचा आत्मा हरवतो.
आज अनेक घरांत मोबाईलचा आवाज आहे, टीव्हीचा आवाज आहे,पण आईवडिलांचा आवाज नाही.
आणि त्या शांततेत एक अवर्णनीय पोकळी असते.
जिला शब्द नसतात,फक्त हुंदके असतात.
आईवडील असतात म्हणूनच घर “घर” असतं…नसतात तेव्हा घर फक्त “रूम्स” उरतात.
आई नसली तर स्वयंपाकाची चव नाहीशी होते,बाबा नसले तर घरातील आधारचं जाणवत नाही.
आईच्या हातची भाकरी,
बाबांच्या कडक सूचना,
आईची माया, बाबांचं टोकणं…
ही सगळी नात्यांची गुप्त संपत्ती असते.
पण आपल्या व्यस्त आयुष्यात आपण हा खजिना वापरतो,जपायला मात्र विसरतो.
आजची पिढी पालकांना वेळ देत नाही…
पण त्यांच्या गैरहजेरीत सोशल मीडियावर पोस्ट मात्र करते
“Miss you maa… miss you papa…”
आई दुपारी विचारते—
“जेवलास का ?”
आपण म्हणतो
“हं हं, झालं.”
बाबा विचारतात
“कधी घरी येणार ?”
आपण म्हणतो
“काम आहे,बिझी आहे.”
आईच्या डोळ्यात चिंता, बाबांच्या आवाजात अपेक्षा…आणि आपल्या बोलण्यात घाई.
आणि एक दिवस
आईचा तो प्रश्न थांबतो,
बाबांचं चौकसपणं थांबतं…
मग उरतो फक्त पश्चात्ताप
“किती वेळ होता माझ्याकडे…मीच दिला नाही.”
पालकांना वेळ देणं म्हणजे मोठी जबाबदारी नाही…ते एक छोटं पण मौल्यवान सन्मान आहे.
त्यांना महागड्या भेटवस्तू नाहीत हव्या,त्यांना वेळ हवा,
कौतुकाचा एक शब्द हवा, त्यांच्या आयुष्याचं ऐकणारा कोणी हवा.
आईवडिलांचं प्रेम हे फुकट मिळतं,पण त्याची किंमत आयुष्यभर भरावी लागते.
घरात त्यांचा आवाज येत राहणं
ही खरी भाग्याची निशाणी आहे
कारण जिवंतपणाचा आवाज
सगळ्यात मोठी देणगी असते.
शेवटी
ते आहेत तोपर्यंत त्यांच्या सोबत राहा.उद्याची हमी कुणालाच नाही.त्यांचंच आयुष्य कमी आहे…आपल्याला तर अजून खूप जगायचंय.त्यांना थोडं वेळ द्या.ते जगभराची कृपा आहेत.