मी भारतीय लोकशाहीचा मनापासून आदर करते. विधिमंडळ माझ्यासाठी कालही पवित्र होते, आजही आहे आणि उद्याही राहील.
माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे आहेत. विरोध करा, टीका करा; पण लोकशाहीच्या नावाखाली असत्य पसरवू नका.
जयहिंद!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या शिक्षण कार्यातूनच समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते.
#savitribaiphule#womeneducation#Education
आ.सत्यजीत तांबे यांनी ई टॉयलेट्सच्या मागणीद्वारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून महिलांसाठी अत्याधुनिक असे ई टॉयलेट्स उपलब्ध करून दिले आहेत. ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेरकरांच्या सुविधेसाठी या ई टॉयलेट्सचे लोकार्पण होणे, एक महिला म्हणून हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
संगमनेर तालुक्याला तोडण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आज सभागृहात जोरदार मागणी केली.
खरंतर जनतेकडून अशी कोणतीही मागणी नसताना राज्याच्या महसूल विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यातील आमच्या संगमनेर तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय करण्याचा घाट घातला आहे.
जनतेसाठी व प्रशासनासाठी अत्यंत गैरसोयीच्या असलेल्या आश्वी बु. येथे हे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित असून, हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा आदर्श नमुना आहे.
हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी आग्रही मागणी आज अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारकडे केली.
Today in council, I strongly opposed the unjust attempt to divide Sangamner Taluka. Despite no public demand, the Revenue Department plans to set up an Upper Tehsil Office at Ashwi Bk.
Under Ahilyanagar district, causing inconvenience to both citizens and administration. I urged the government to cancel this unwanted proposal immediately.
#Ahilyanagar #DistrictPlanningCommittee #Development #Sangamner
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RVikhePatil
रोटरी क्लब, संगमनेर यांच्यातर्फे आयोजित हॅप्पी स्ट्रीट उपक्रमात सहभागी होऊन खऱ्या अर्थाने एक आनंदी व उत्साहाने भरलेली रविवारची सकाळ अनुभवली.
#rotryclub#sangamner#happystreet#Sunday
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या समाजसेवेच्या महान कार्याला वंदन! त्यांचे विचार आणि योगदान हे आजही समाजपरिवर्तनासाठी प्रेरणादायी आहेत. अशा उपक्रमांमुळे त्यांची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि स्वच्छता, शिक्षण व परोपकार यांसारख्या मूलभूत मूल्यांची जपणूक होईल.
गुणवंत व्हा, यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा !
आजपासून १० वी च्या परीक्षा सुरु होत असून. या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा !
#exam#ssc#student#sangamner#DurgaTambe
हिंदू धर्म-संस्कृतीत कुंभमेळ्यातील स्नानाला पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. यावेळी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात स्नान आणि अर्घ्यदान करण्याचा सौभाग्ययोग प्राप्त झाला. गंगामातेच्या पावन जलस्नानाने तन-मन शुद्ध होत आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची अनुभूती घेतली