आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत मी अनेक वर्षं काम केलं आहे. त्यांची राजकीय समज, प्रशासकीय वचक, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्र घडवण्याची तळमळ मी अत्यंत जवळून अनुभवली आहे. गेल्या ५ वर्षांपासून मी सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असलो तरी महाराष्ट्रासाठी पवार साहेबांनी गेली सलग ६ दशकं केलेलं महत्त्वपूर्ण योगदान माझ्यासह कुणालाच नाकारता येणार नाही. आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात पवार साहेबांचा मोलाचा वाटा आहे. इतकंच कशाला, गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा हाच मराठी नेता, हाच महाराष्ट्राचा भूमिपुत्र मोदी-शहा यांच्या गुजरातच्या मदतीला धावून गेला होता, याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडलाय. अशा आदरणीय पवार साहेबांना पंतप्रधान मोदींनी 'अतृप्त भटकती आत्मा' म्हणणं, हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करून महाराष्ट्रीय जनता या अपमानाचा निश्चित बदला घेईल.
#AaplaBhau #SanjayDinaPatil
@PawarSpeaks@NCPspeaks@AUThackeray@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_@JadhavRakhee
घाटकोपर पूर्व विधानसभा परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बाबासाहेबांना अभिवादन करुन प्रभाग क्रमांक १३३ व १२५ मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात प्रचार फेरी पार पडली. प्रचारात माता भगिनी खूप विश्वासाने औक्षण करतात, लोक भरभरून प्रेम देतात. याच प्रेमाने आपल्या मतदारसंघात मशालीवरच विजयाचा गुलाल उधळला जाईल याची खात्री वाटते.
@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_
#ShivsenaUBT #AaplaBhau #SanjayDinaPatil #Jansanwad #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #FlamingTorch #Mashal #Loksabha #India #parliment #MahavikasAghadi
प्रचार फेरी व पदयात्रा | मंगळवार दि. ७ मे २०२४ रोजी
सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत
- भांडुप विधानसभा
सुरवात : प्रभाग क्रं.११६, शिंदे मैदान
आपली निशाणी - मशाल
अनेक आव्हाने पेलत आम्ही उत्साहाने निवडणुकीचा प्रचार करतोय आणि लोकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. मशालमय वातावरणात संध्याकाळची प्रचार फेरी विक्रोळी विधानसभा क्षेत्रात झाली. आमदार सुनिलजी राऊत यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व इंडिया महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.त्याची काही क्षणचित्रे.
@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_@AUThackeray@KorgavkarRamesh@SunilRaut65 #AaplaBhau #SanjayDinaPatil #Jansanwad #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #FlamingTorch #Mashal #Loksabha #India #parliment #MahavikasAghadi
आपला भाऊ, आपल्या भेटीला !
ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील घाटकोपर पश्चिम येथील नित्यानंद नगर, घाटकोपर पुर्व येथील लक्ष्मीनगर, लक्ष्मीबाग, पटेल चौक, रायगड चौक, विद्याविहार किरोळ गाव मधील नागरिकांशी भेटुन संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
#ShivsenaUBT #AaplaBhau #SanjayDinaPatil #Jansanwad #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #FlamingTorch #Mashal #Loksabha #India #parliment #MahavikasAghadi
२८- ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ
#महाविकास_आघाडी_पदाधिकारी_मेळावा..
📅 १८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वा.
📍 झवेरबेन पोपटलाल सभागृह, हिंगवाला लेन, घाटकोपर पूर्व
#ShivsenaUBT#AaplaBhau#SanjayDinaPatil #महाविकासआघाडी #Melava #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #FlamingTorch #Mashal #Loksabha #India #parliment #MahavikasAghadi
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मंदिरे, मंडळे, संस्था यांनी आयोजित केलेल्या श्री राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास भेट देऊन मिरवणुकीत सहभागी झालो. श्री राम चरणी लीन होऊन देशातील हुकूमशाही नष्ट होऊन एकवचनी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचे रामराज्य येऊ दे अशी प्रार्थना केली. यावेळी तमाम राम भक्तांना श्री राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
#श्रीरामनवमी #ShreeRamNavami #RamJanmotsav #ShivsenaUBT #AaplaBhau #SanjayDinaPatil #Jansanwad #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #FlamingTorch #Mashal #Loksabha #India #parliment #MahavikasAghadi
महाविकास आघाडीचा निर्धार.,
ईशान्य मुंबईतुन भाजपा तडीपार..!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात ईशान्य मुंबई लोकसभेच्या महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई जगतापजी,शिवसेना उपनेते सचिनजी आहिर, दत्ताजी दळवी, नसीम खानजी, जेष्ठ कॉंग्रेस नेते व मा.आमदार विरेंद्र बक्षी साहेब, चरणसिंग सप्राजी, राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव, आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेननजी, पिपल रिपब्लिकन पक्षाचे मिलिंद सुर्वेजी यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीच्या वक्त्यांनी महागाई, जुमलेबाजी, हुकुमशाही, संविधान या प्रमुख विषयांवर भाषणातुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच हि सुवर्ण संधी असुन आपण सारे देशभक्त इंडिया म्हणुन लढत आहोत, मशाल हे चिन्ह घरोघरी पोहचवुन संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतुन दिल्लीत पाठवुया असा निर्धार यावेळी सर्वांनी केला.
माझ्यासह आमदार तथा विभाग प्रमुख रमेशजी कोरगांवकर, विभागप्रमुख सुरेशजी पाटील, आमदार सुनिलजी राऊत, म. विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकरजी, प्रज्ञा सकपाळजी, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
@AUThackeray@ShivSenaUBT_@AhirsachinAhir@Charanssapra@BhaiJagtap1
#ShivsenaUBT #AaplaBhau #SanjayDinaPatil #MahavikasAghadiMelava #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #FlamingTorch #Mashal #Loksabha #India #parliment #MahavikasAghadi
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक शिवसेना भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. माझ्यासह उपनेते दत्ताजी दळवी, विभागप्रमुख तथा आमदार रमेशजी कोरगांवकर, विभागप्रमुख सुरेशजी पाटील, आमदार सुनिलजी राऊत, म विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकरजी, प्रज्ञाताई सकपाळ व पदाधिकारी उपस्थित होते.
#ShivsenaUBT #AaplaBhau #SanjayDinaPatil #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #FlamingTorch #Mashal #Loksabha #India #parliment #MahavikasAghadi