Shiv Chatrapati Awardee in Swimming..Sports Council Member SSPU(Pune University)
RC Member Bhandarkar Institute, Ganpati Bappa Devotee..Follows Politics..
अभिमान महाराष्ट्राचा… गौरव भारताचा; ‘आशियाई’ पदकवीरांचं पुण्यनगरीत जल्लोषात स्वागत !🇮🇳
जपान येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आपल्या दमदार कामगिरीने भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावणाऱ्या महाराष्ट्राच्या पदकवीरांचे आज पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर देशासाठी पदके जिंकून मायभूमीत परतलेल्या या खेळाडूंचे स्वागत करताना विशेष आनंद आणि अभिमान वाटला.
या स्पर्धेत साहील जाधवने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक, प्रितिका प्रदीपने सुवर्णपदक, तर धीरज बोम्मदेवराने दोन रौप्यपदके पटकावत भारतीय तिरंदाजीच्या यशात मोलाची भर घातली. जगातील सर्वोत्तम खेळाडूंसमोर आत्मविश्वासाने उभे राहत आपल्या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, एकाग्रता आणि कौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे भारतासह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
खेळाडूंच्या या यशामागे त्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षकांचे आणि संपूर्ण सपोर्ट टीमचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. यावेळी ASI चे मुख्य प्रशिक्षक श्री. सोनम तसेच खेळाडूंच्या मानसिक तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मानसशास्त्रज्ञ डॉ. गायत्री वर्तक मडकेकर यांचेही पुणे विमानतळावर स्वागत करून त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन केले.
पदक हे केवळ एका स्पर्धेतील विजयाचे प्रतीक नसते; त्यामागे अनेक वर्षांची कठोर मेहनत, असंख्य तासांचा सराव, शिस्त, त्याग आणि देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची जिद्द असते. आपल्या या खेळाडूंनी त्याच जिद्दीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या व्यासपीठावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांचे यश महाराष्ट्रातील आणि देशभरातील नव्या पिढीच्या खेळाडूंना मोठी प्रेरणा देणारे ठरेल.
देशाचा गौरव वाढवून मायभूमीत परतलेल्या आपल्या सर्व पदकवीरांचे महाराष्ट्राच्या भूमीत मनःपूर्वक स्वागत! त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! या स्वागतावेळी पुणे शहर युवा मोर्चा पदाधिकारी आणि पुणेकर नागरिक उपस्थित होते.
#Cheer4Bharat #AsianGames2026 #TeamIndia #IndianArchery #Pune #Maharashtra #IndianSports
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
Birthday greetings to Hon'ble Shri @gssjodhpur Ji💐🎂
Your leadership in 'Gyan Bharatam' & in reclaiming Bharat's heritage artefacts is inspirational. @BhandarkarI is Honoured to be part of this National Mission.
Best wishes!
#GyanBharatam
Glad to invite Mrs Amruta Fadnavis to the Legendary Bhandarkar Oriential Research Institute, Pune
Thank you for accepting the invite Mam
We hope to see you soon at Bori🙏🏻
@fadnavis_amruta@BhandarkarI@patwardhanb
‘भांडारकर’च्या ‘ज्ञानसागर’ या हेरिटेज फेस्टला भेट…
📍भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
आपल्या देशाच्या जाज्वल्यपूर्ण अशा प्राचीन प्राच्यविद्या इतिहासाचे दस्तऐवज, हस्तलिखिते, साहित्य याबद्दल त्याचे संरक्षण, संशोधन आणि संवर्धन करणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या ‘ज्ञानसागर’ या हेरिटेज फेस्टला आवर्जून भेट दिली. प्रदर्शनात ठेवलेली दुर्मिळ हस्तलिखिते, ताम्रपट तसेच संस्थेच्या विविध संशोधन प्रकल्पांबाबत माहिती देणाऱ्या दृकश्राव्य दालनालांना भेट दिली.
यावेळी संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री. भूपाल पटवर्धन, सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, नियामक मंडळ सदस्य डॉ. मैत्रेयी देशपांडे, श्री. मनोज एरंडे, श्री. संतोष रासकर, श्रीनिवास कुलकर्णी, ऍड.देवयानी कुलकर्णी आणि संस्थेचे निबंधक श्रीनंद बापट तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचं कौतुक करत अशा उपक्रमांना पुढील काळात सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळेस पुणे मनपा नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, सुनील पांडे, नगरसेविका ॲड. मिताली साळवेकर आणि भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते. भांडारकर संस्थेत येत्या सोमवरपर्यंत (23 फेब्रुवारी) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले रहाणार आहे.
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
शिक्षण, महिला, बालक, युवक व क्रीडा विषयक संसदीय स्थायी समितीचा अभ्यास दौरा व बैठक पुणे येथे पार पडली. या दौऱ्यात भारतीय ज्ञान प्रणाली विषयावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी समिती सदस्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट देत तेथील कार्यपद्धती, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. परंपरा आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
@Swiggy
Worst possible service
Keep us waiting for 2 hrs..
Then sorry, in convince ect
Then cut call & send refund msg
2hrs 25 min later
Sad & Bad
Shame on you
@NDTVFood@SakalMediaNews@TOIIndiaNews
खासदार क्रीडा महोत्सवाचा मा. मोदीजींच्या प्रेरक मार्गदर्शनाने समारोप…
📍 कोथरुड
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप मा. मोदीजींच्या प्रेरक मार्गदर्शनाने झाला. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या समारोप समारंभात खेळाडूंसह व्हर्च्युअली सहभागी झालो. यावेळी क्रीडा क्षेत्रात होत असलेल्या अभूतपूर्व बदल, भारतात आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धांची माहिती देत मा. मोदीजींनी खेळाडूंशी संवाद साधला आणि खासदार क्रीडा महोत्सवातील सहभागाचे अनुभव जाणून घेतले.
मा. मोदीजींच्या संकल्पातील खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ एक स्पर्धा नसून तरुणाईला क्रीडेच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वाची संधी देणारी चळवळ आहे. गावागावातील, वाड्या-वस्त्यांतील सुप्त क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देत ‘खेलो इंडिया’च्या विचाराला बळ देणारा हा उपक्रम आहे. क्रीडा संस्कृती रुजवून सक्षम, सुदृढ आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने हा महोत्सव महत्त्वाचा टप्पा ठरत असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल.
भारतात २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यात खासदार क्रीडा महोत्सवासारखे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असा विश्वास यावेळी मा. मोदीजींनी व्यक्त केला.
यावेळी पुणे खासदार महोत्सवाचे मुख्य समन्वयक श्री. मनोज एरंडे, पॅरा ॲालिंम्पियन श्री. संदीर सरगर, राष्ट्रीय जलतरणपटू त्विषा दीक्षित, दिव्यांग खेळाडू श्री. प्रतीक घोलप यांच्यासह ३५० हून अधिक विजेते खेळाडू, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#SansadKhelMahotsav #सांसद_खेल_महोत्सव #खासदार_क्रीडा_महोत्सव #पुणे #Pune
@narendramodi@PMOIndia@AmitShah@JPNadda@NitinNabin@blsanthosh@BJP4India
@narendramodi Great Sansad khel Tournaments in Pune under the Grand Leadership of H
@mohol_murlidhar
Over 45 k participants
37 Sports
1 Unity Run Marathon
29 venues
4500 Prizes & Trophies
Looking foward to a Bigger & Better Sansad khel 2026 with new Goals & Aims,
PM Sir 🙏🏽
Happy Healthy Birthday Hon PM Sir🎂
Your dedication, determination, devotion, disclipine has transformed India into a super power
May the force be with you always, Sir!
@narendramodi