कारगिलच्या रणभूमीवर अदम्य शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा इतिहास घडवणाऱ्या आपल्या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम!
त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळेच आपल्या तिरंग्याचा मान सदैव उंच राहिला आहे. प्रत्येक भारतीयासाठी त्यांचे शौर्य हे प्रेरणादायी असून त्याग आणि देशप्रेमाची अमूल्य शिकवण देणारे आहे.
कारगिल विजय दिनानिमित्त सर्व वीर शहीदांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
#kargilvijaydiwas #salutetoheroes #kargil #26july
#snehadubepandit
📍 आमदार जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम
भारतीय जनता पार्टी वसई-विरार शहर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना माझ्या हस्ते पद वाटप करण्यात आले.
यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष श्री. अमरजित (छोटू) सिंग आनंद व श्री. थॉमस जेरॉम डाबरे, जिल्हा सरचिटणीस श्री. अब्दुल मोबीन, जिल्हा सचिव श्री. रिचर्ड रोझारिओ व श्री. नूर खान, तसेच जिल्हा कोषाध्यक्ष श्री. वेलंकणी झहीन पटेल यांना पद प्रदान करण्यात आले.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या संघटनात्मक कार्यातून भारतीय जनता पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवत समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त करते.
यावेळी माझ्यासह भाजपा वसई-विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार, भाजपा वसई-विरार शहर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. मॅथ्यू कोलासो, भाजपा वसई पूर्व-दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री. उदय शेट्टी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#bjp #bjp4maharashtra #vasaivirar #sneha #snehadubepandit
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रसेवा, शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सर्व शूर जवानांना मनःपूर्वक सलाम. देशाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाला विनम्र अभिवादन.
#CRPFRaisingDay #jaihind #crpf #snehadubepandit
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
स्वप्न पाहण्याची प्रेरणा, विज्ञानाची नवी दिशा आणि राष्ट्रसेवेचा अखंड ध्यास देणारे “मिसाईल मॅन” डॉ. कलाम यांचे विचार प्रत्येक भारतीयासाठी कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या कार्याला आणि राष्ट्रनिर्मितीच्या योगदानाला कोटी कोटी प्रणाम.
#apjabdulkalam #missileman #vasai #snehadubepandit
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या रविवारी Vikram-1 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे प्रत्येक देशवासी अभिमानाने भरून गेला आहे. आपण सर्व भारतीय अंतराळ क्षेत्रातील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलो आहोत. खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेले हे भारताचे पहिले रॉकेट आहे. आपल्या तरुण नवसंशोधकांनी ते करून दाखवले, ज्याची कल्पना करणे देखील कठीण होते. त्यांनी अप्रतिम कौशल्य, ध्यास आणि संयम दाखवला आहे. -मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
#मन_की_बात #ManKiBaat
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
अभिमानास्पद सुवर्ण हॅटट्रिक! 🇮🇳🥇
ग्लासगो येथे सुरू असलेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मीराबाई चानू यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत त्यांनी ऐतिहासिक सुवर्ण हॅटट्रिक पूर्ण केली आहे. त्यांची जिद्द, शिस्त आणि अविरत मेहनत देशातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! भारतासाठी अशीच यशाची शिखरे सर करत राहा. 🇮🇳
#MirabaiChanu #TeamIndia #Glasgow2026 #CommonwealthGames
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
जागतिक नेमबाजीत भारताची दुहेरी सरशी! 🏆
आयएसएसएफ विश्वचषक २०२६ मधील २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाची अचूक कामगिरी करणाऱ्या ईशा सिंह आणि कांस्यपदक पटकावणाऱ्या मनू भाकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! देशासाठी मिळवलेला हा दुहेरी सन्मान प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे.
दोन्ही खेळाडूंना आगामी स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या नेमबाजीचा हा सुवर्णवेध असाच कायम राहो आणि भारताचा तिरंगा जगभरात अधिकाधिक उंच फडकत राहो. 🇮🇳
#ISSFWorldCup2026 #EshaSingh #ManuBhaker #शूटिंग
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
विठ्ठल नामाचा गजर, सेवाभावाचा सुंदर साज!
आज पुणे येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित "छंद विठ्ठलाचा" या विठ्ठल भक्तीच्या सुरेल सोहळ्यात सहभागी झालो.
जिव्हाळा फाऊंडेशन समाजातील शेतमजूरांच्या लेकींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे, ही अत्यंत प्रेरणादायी आणि समाजाभिमुख सेवा आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थिनी शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करत असून, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायाने नेत्ररोग तज्ज्ञ असलेले डॉ. अमोघ जोशी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनचर्येतही त्यांनी संगीताचा छंद जपला असून, त्यांच्या सुमधुर आवाजातील विठ्ठल भक्तिगीते ऐकताना मन भक्तिरसात न्हाऊन निघाले. याच प्रसंगी त्यांच्या "कालस्वर" या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा सन्मान लाभला.
या कार्यक्रमाला माझी पत्नी अंजली पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, ॲड. शर्वरी मुठे, राजेंद्र मुठे, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. डॉ. शारंगधर साठे, डॉ. संगीत पारनेरकर, डॉ. अमोघ जोशी, सुषमा जोशी, प्रवीण बढेकर, अमर मांजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
📍२५ जुलै २०२६ | पुणे
#AshadhiEkadashi #JivhalaFoundation #Pune
#आषाढीएकादशी #जिव्हाळाफाऊंडेशन #पुणे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
आज कोथरूड येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या 'अभंग वारी' या विठ्ठलभक्तीपर कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थित राहिलो.
महेशजींच्या सुरेल आवाजातील विठ्ठलनाम, अभंग आणि भक्तिरसाने ओतप्रोत सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. उपस्थित प्रत्येक रसिक वारकरी भावनेत तल्लीन झाला. या अविस्मरणीय भक्तिसोहळ्याचा साक्षीदार होत मनाला विलक्षण समाधान आणि आनंद लाभला.
विठ्ठल नामाची ही अखंड भक्ती आणि संतपरंपरेचा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत असाच पोहोचत राहो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
📍२५ जुलै २०२६ | कोथरूड
#आषाढीएकादशी२०२६ #अभंगवारी #महेशकाळे #कोथरूड #Kothrud
@BJP4Maharashtra@maheshmkale
तुका म्हणे, "आनंदाचे डोही आनंद तरंग..." 🚩
आज कोथरूड येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या 'अभंगवारी' या भक्तिमय कार्यक्रमाला सहपत्नीक उपस्थित राहिलो.
राहुलजींनी आपल्या सुरेल गायकीतून सादर केलेल्या संतवाङ्मयातील अभंगांनी सभागृह अक्षरशः विठ्ठलनामाने दुमदुमून गेले.
अशा सांस्कृतिक आणि भक्तिमय उपक्रमांमधून आपल्या संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
॥ पांडुरंग हरी विठ्ठल ॥ 🙏
📍२५ जुलै २०२६ | कोथरूड
#आषाढीएकादशी२०२६ #अभंगवारी #राहुलदेशपांडे #AshadhiEkadashi #AbhangWari #RahulDeshpande
@BJP4Maharashtra@deshpanderahul
वारकऱ्यांची सेवा... हाच विठ्ठल चरणी अर्पण केलेला खरा नैवेद्य!
आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र नंदवाळ येथे येणाऱ्या वारकरी बांधवांसाठी माझ्या वतीने मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. वारकरी बांधवांचे आशीर्वाद हीच माझ्या सेवाकार्याची खरी पावती!
या सेवाभावी उपक्रमाची क्षणचित्रे.
#आषाढीएकादशी२०२६ #श्रीक्षेत्रनंदवाळ
#AshadhiEkadashi #ShriKshetraNandwal
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजिणी॥
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा॥
आज आषाढी एकादशीच्या अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवशी कोथरूड, कर्वेनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठूरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
श्रीचरणी नतमस्तक होत “माझ्या महाराष्ट्रातील बळीराजा सुखी होवो, सर्व नागरिकांचे आयुष्य आरोग्यदायी, सुखी आणि समृद्ध होवो, तसेच विठूरायाची कृपा तुम्हा सर्व भक्तांवर सदैव राहो,” अशी मनोभावे प्रार्थना केली.
या मंगलप्रसंगी मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्याचा योग आला. संतांच्या या पावन भूमीत वारकरी आणि भक्तांची सेवा करण्याची संधी लाभली, याचा मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.
सर्व वारकरी बंधू-भगिनींना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
राम कृष्ण हरी! 🚩
📍२५ जुलै २०२६ | कोथरूड
#AshadhiEkadashi #AshadhiEkadashi2026 #Kothrud #Pune #कोथरूड #आषाढीएकादशी #आषाढी_एकादशी२०२६
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
तुका म्हणे धावा श्रीहरी, जिथे तिथे दिसे माऊली!
आज पुणे येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पुण्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन माऊलींचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, विठ्ठल-रुक्मिणींची कृपा सर्वांच्या जीवनावर सदैव राहो, अशी प्रार्थना केली.
त्यानंतर दरवर्षीप्रमाणे सतीश शेठ धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे आयोजित खिचडी वाटप उपक्रमात सहभागी होत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्याचे भाग्य लाभले.
भक्ती, सेवा आणि समर्पणाचा हा पवित्र संगम अनुभवताना मन कृतार्थ झाले.
॥ पांडुरंग हरी विठ्ठल ॥
📍२५ जुलै २०२६ | पुणे
#आषाढीएकादशी२०२६ #विठ्ठल #रुक्मिणी #विठ्ठलवाडी #प्रतिपंढरपूर #पुणे #Pune
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
"अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..!"
आज आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन मुहूर्तावर पुण्याच्या कर्वेनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठूरायाचे दर्शन घेतले आणि भाविकांसाठी प्रसाद वाटपाची सेवा केली. विठूमाऊलीची कृपा तुम्हा-आम्हा सर्वांवर अशीच राहो, अशी प्रार्थना केली.
या प्रसंगीची क्षणचित्रे...
📍 २५ जुलै २०२६, पुणे
#आषाढीएकादशी #विठूमाऊली #विठ्ठलरुक्मिणी #कर्वेनगर #कोथरूड #Pune #AshadhiEkadashi #Karvenagar
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra