निवडणुका येतात जातात पण जनतेच्या कामांमध्ये खंड पडु न देण्याच्या स्वभावामुळेच म्हणुन तर @AjitPawarSpeaks ना महाराष्ट्र हक्काने व प्रेमाने दादा म्हणतो.
#जननायक
स्व.मुंडे साहेब मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर बसायचे आज लातूरला प्रवासासाठी जात असताना स्थानकावरील हमाल मंडळींनी त्याच पेटीवर बसण्याचा आग्रह केला.मी पेटीवर बसलो,सर्व बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सर्वांना माझ्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले.
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.
@NCPspeaks
आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार (@PawarSpeaks) साहेबांच्या उपस्थितीत @NCPspeaks च्या सर्व मंत्रीमहोदयांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी माझ्यासह उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil जी, (१/३)
राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या प्रोफेशनल संस्थेचा दुरूपयोग होतांना दिसत असल्यामुळे आम्ही तिची सरसकट परवानगी काढून घेतली होती. "सीबीआयला राज्यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असल्याच्या" मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
अनेक जाती,धर्म,पंथांना,स्त्रीशक्तीला सोबत घेऊन राज्यकारभार करणाऱ्या महापराक्रमी योद्ध्या,आदर्श राज्यकर्त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘मेरी झांशी नही दूंगी’ म्हणत अतुलनीय शौर्याचं दर्शन त्यांनी घडवलं.
Tribute to the First Woman Prime Minister of our Country, Smt. Indira Gandhi ji on her birth anniversary today. One of the most formidable PM, she earned the title of ‘The Iron Lady of India’!
नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य करणारे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
राज्यातील कोट्यवधी जनता व कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच डॉक्टर,नर्स,सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,काही दिवस घरी विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचे आभार!
मराठी माणसं स्वतःच्या देवाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत नाहीत.
हा तर गुजरातचा नटरंग आहे.
औरंगजेबाच्या भक्तांनो, आमच्या भावनांसोबत खेळलात तर सुरतची पुन्हा बदसुरत करायला वेळ लागणार नाही.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव निलंगेकर पाटील साहेबांच्या निधनानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारं महत्त्वाचं नेतृत्व आपण गमावलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव निलंगेकर पाटील साहेब यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! Ex-CM of Maharashtra and Senior Congress Leader Shri. Shivajirao Nilangekar Patil has passed away. Deepest condolences to his family!!
माजी राज्यमंत्री,शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचं निधन झाल्याचं समजून धक्का बसला.त्यांच्या निधनानं सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील.
अखिल भारतीय भिख्खू संघाचे संघानुशासक महास्थविर सद्धम्मादित्य भदंत सदानंद महाथेरो यांच्या निधनामुळे धम्म अनुशासक तसंच मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे महान व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे मानवतावादी कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मृतांच्या जीवावर गलिच्छ राजकारण खेळू पाहणाऱ्या नीच प्रवृत्तीचा निषेध !
@AUThackeray जी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस परिवार आपल्या सोबत ठामपणे उभा आहे. @ShivSena@ShivsenaComms
मान. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एस.टी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ५५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
तत्परतेने हा निर्णय घेऊन एस. टी कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल कार्यतत्पर दादांचे मनापासून अभिनंदन ! @NCPspeaks@NCPspeaksBMT