‘ऑपरेशन टायगर’कडे फक्त सहा खासदारांच्या संभाव्य हालचाली म्हणून पाहू नका. ही लढाई त्यापेक्षा खूप मोठी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खरा प्रश्न हा नाही की कोण कुठे जाणार. खरा प्रश्न आहे, राज्याच्या सत्ताकारणाचा Boss कोण?
कोणाकडे सत्ता आहे, कोणाकडे संघटना आहे, कोणाकडे दिल्लीचा विश्वास आहे, कोणाकडे उद्योगजगताशी संवाद आहे आणि कोणाकडे लोकप्रतिनिधींना हलवण्याची ताकद आहे, याची ही खुली परीक्षा आहे.
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले तर तो फक्त संख्येचा विजय नसेल; तो महाराष्ट्राच्या राजकारणात “कमांड कोणाच्या हातात आहे” याचा स्पष्ट संदेश असेल.
आणि जर ते अपयशी ठरले, तर तो फक्त एक ऑपरेशन फसले असा मुद्दा राहणार नाही; तर “Boss” म्हणवणाऱ्यांच्या नियंत्रणक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील.
#MaharashtraPolitics #OperationTiger
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार की नाही, याचा निकाल आता केवळ संबंधित सहा खासदारांच्या भूमिकेवर अवलंबून राहिलेला नाही. या संपूर्ण घडामोडींचा केंद्रबिंदू आता त्या उद्योगपतीच्या मध्यस्थीकडे सरकला आहे, ज्याच्याशी निर्णायक संवाद साधला गेला असल्याची चर्चा आहे.
मात्र हा विषय फक्त पक्षांतर, खासदारांची संख्या किंवा संसदीय गणितापुरता मर्यादित नाही. राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून सुप्तपणे सुरू असलेल्या वर्चस्वाच्या शीतयुद्धाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या ऑपरेशनमधून कोण आपली पकड मजबूत करतो आणि कोणाच्या राजकीय प्रभावाला धक्का बसतो, यावर पुढील सत्तासमीकरणांची दिशा ठरणार आहे.
म्हणूनच ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ राजकीय हालचाल नसून, महाराष्ट्रातील दोन प्रभावकेंद्रांमधील प्रतिष्ठेची आणि वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई बनली आहे.
#MaharashtraPolitics
I had the pleasure of welcoming the Hon’ble President of Republic of Cyprus, Mr. Nikos Christoudoulides, at the Mumbai airport.
During our interaction, we discussed Maharashtra’s rich cultural heritage, the state’s important role in the economic landscape of India and the world, Maharashtra’s continued progress towards the holistic development of women and children and the longstanding cultural ties between Cyprus and India.
We hope to continue strengthening the relationship between the two countries in the years ahead.
#India #Cyprus
@narendramodi@Christodulides@CYpresidency@CMOMaharashtra@SunetraA_Pawar@mieknathshinde@MahaDGIPR
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.
आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.
दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे.
निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!
आदिती ताईंच्या प्रत्येक वाक्याला तोडुन मोडुन ट्विट केल्याने तुम्हाला आमदारकी किंवा खासदारकी मिळणार नाही ताई….आमदारकी आमचे अंबादास दानवे घेऊन जाणार आणि खासदारकी प्रियंका चतुर्वेदी घेऊन जाणार.
आज ह्या पक्षात तर यांची तळी उद्या पक्ष बदलला तर त्याची तळी उचलुन तुम्ही आत्ताच्या नेतृत्वावर टिका करायला कमी करणार नाही.
असो टाॅकटाईमचा रिचार्ज कोणाचा त्यावर तुमचे सगळे अवलंबुन असते.
जनतेत मिसळुन काम करणारा स्वपक्षातील किंवा विरोधी पक्षातील नेता अकाली गेल्यानंतर दुःखात असलेल्या त्यांच्या अर्धांगिनींना त्रास देणे ह्यात महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेते पारंगत आहेत.
#चंद्रपुर#बारामती#महाराष्ट्र
Beginning of India’s Biggest Win Against Australia
#OnThisDay in 1998, India reduced Australia to 29/4 at Eden Gardens, Kolkata.
Australia went on to score 233, with contributions from Steve Waugh and Ricky Ponting.
In reply, India posted a massive 633/5 declared, before bowling Australia out for just 181, winning the Test by an innings and 219 runs - their biggest victory against Australia.
आज नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांच्या वितरण सोहळ्याचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाला. या विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झाले. या ऐतिहासिक क्षणी प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या आणि ताबा पत्र सुपूर्द करताना मनस्वी आनंद झाला.
जवळपास चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडीडी चाळीतील रहिवाशांचे स्वतःच्या सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानपूर्वक घराचे स्वप्न साकार होताना पाहणे हा अत्यंत भावनिक व अभिमानाचा क्षण आहे. या चाळी केवळ इमारती नव्हत्या; तर त्या कष्टकरी कुटुंबांच्या संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेच्या इतिहासाच्या साक्षीदार राहिल्या आहेत.
म्हाडा आणि राज्य शासन सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व दर्जेदार घर मिळावे, हा शासनाचा दृढ संकल्प असून नायगाव पुनर्विकास प्रकल्प त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या देणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
मागील वर्षी वरळी येथे सदनिकांच्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी आदरणीय अजितदादांनी स्वतः त्या घरांची पाहणी करून त्यांच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले होते. चाळीतील रहिवाशांनी नव्या घरात समाधानाने आणि सन्मानाने राहावे, त्याची योग्य काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला होता. कोणतीही वास्तू उभारताना ती उच्च दर्जाची, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक असावी, याबाबत त्यांचा नेहमीच विशेष आग्रह असायचा. सामान्य नागरिकांना चांगले आणि सुरक्षित घर मिळावे, ही त्यांची मनापासूनची भूमिका कायम राहिली.
दरम्यान, या प्रकल्पासाठी अथक परिश्रम घेतलेल्या म्हाडा प्रशासनाचे तसेच संयमाने सहकार्य करणाऱ्या सर्व रहिवाशांचे मी मनापासून अभिनंदन करते. ज्या कुटुंबांना आज घरे मिळाली आहेत, त्यांच्या आयुष्यात हे नवीन घर सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा व्यक्त करते. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच घरे मिळतील, याची मी खात्री देते.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
आज राष्ट्रवादी परिवाराच्या आमच्या माऊली, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची वाढदिवसानिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले. काकींचे आशीर्वाद घेताना आदरणीय अजितदादांची उणीव प्रकर्षाने भासली. दादा आणि काकींचे मार्गदर्शन माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात सदैव दिशादर्शक राहिले आहे.
@SunetraA_Pawar
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा आज केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही दिली. राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही यावेळी केले.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर “कम अर्ली-गो अर्ली” या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९. ४५ या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची, म्हणजेच सुमारे ३० मिनिटांची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
त्याचप्रमाणे हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १४ मोहिमा राबवून ४२ हजार ५९४ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेतून ५ हजार ६६ महिला आणि २ हजार ७७१ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून महिलांच्या समस्यांसाठी ५१ ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात आले आहेत.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजना राज्य सरकार प्रभावीपणे राबवत आहे. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबवण्यात येत असून बचत गटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाबाबत आणि पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक आहे. राज्यातील १७ हजार २५४ अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १८० दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावे यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबवण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणे आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, बचत गटांचे बळकटीकरण, महिला शेतकरी व कामगारांसाठी विशेष उपाययोजना तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी यावर राज्य सरकारचा विशेष भर आहे.
जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याचा संकल्प विधान परिषदेत व्यक्त केला. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक सक्षमीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे, असे सभागृहात स्पष्ट केले.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#BudgetSession2026
महिला ही समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. तिच्या धैर्य, संयम, निर्धार आणि परिश्रमांमुळे घर, गाव आणि राष्ट्र उभे राहते. स्वतः सक्षम होत इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जागतिक_महिला_दिन#InternationalWomensDay
@SwapnilSpeaks93 पण काल आ.शिवाजीराव गर्जे यांनी माहिती दिली की ते राजीनामे आदरणीय अजितदादांनीच २७ जानेवारीला मंजुर केले होते. बाकी त्यांना राजीनामे द्यायला लावणारे पण दादाच होते आणि मंजुर करणारे पण दादाच होते.
दादांनी त्यांना का राजीनामे द्यायला लावले याची सत्य बाजु फक्त दादांनाच माहिती होती.
.@SachinPilot Ji has consistently demonstrated a dignified and mature approach to leadership within the Indian National Congress. His political conduct, communication style, and administrative experience reflect a balanced blend of grassroots engagement and modern political sensibility.
At a time when the party is navigating structural and electoral challenges, leaders who combine credibility, composure, and connect across demographics become strategically significant. Pilot’s appeal among youth, his governance background, and his ability to maintain measured public positioning even during internal turbulence suggest long-term leadership potential.
From an organisational perspective, appointing him as National President could signal generational transition, institutional stability, and renewed political messaging. Such a move would not merely be symbolic but could represent a calibrated strategic shift aimed at strengthening the party’s national positioning and internal cohesion.
#PersonalOpinion
#WATCH | Delhi: Congress leader Sachin Pilot says, "Holi is the festival of love, enthusiasm, excitement, and brotherhood. Everyone should celebrate it together and share happiness. The atmosphere of conflict that has been created should be ended."