मित्रांनो आपल्याला कळवण्यात येते की डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 1 एप्रिल पासून ट्विटरवर काही मित्रांनी #ThanksDrAmbedkar उपक्रम हाती घेतला आहे. यात आपण आपले आंबेडकरांविषयी लेख, विचार, कविता, चारोळया ट्वीट करू शकता. #म#मराठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्थ शास्त्रासंबंधी तीन महत्वाची पुस्तके
१) अॅडमिन���स्ट्रेशन ॲन्ड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी,
२) दि इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
३) दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी : इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्यूशन
#ThanksDrAmbedkar #म #मराठी
देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्य���च्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले. #ThanksDrAmbedkar #म #मराठी
बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. #ThanksDrAmbedkar#म#मराठी
समाजाच्या, अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. #ThanksDrAmbedkar#म#मराठी
भारताच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. भारत देशाच्या इतिहासातील पहिले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. #ThanksDrAmbedkar#म#मराठी
आदर्श चलन पद्धती, कृषी उद्योग, खासगी सावकार प्रतिबंधक विधेयक, जातीचे अर्थशास्त्र, आर्थिक पायाभरणी इत्यादी विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले आहेत. भारताची केंद्रिय बँक - भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. #ThanksDrAmbedkar#म#मराठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र होता. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. #ThanksDrAmbedkar#म#मराठी