📍 मुंबई |
माजी #शिवसेना आमदार व नगरसेविका यामिनी जाधव या गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्याने त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी यामिनी जाधव यांचे पती भायखळा शिवसेना विभागप्रमुख यशवंत जाधव उपस्थित होते.
#Shivsena #Mumbai #EknathShinde #Maharashtra