📍 जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
आज जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सदिच्छा भेट देत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच सन २०२२ व २०२३ या वर्षांतील विविध कृषी पुरस्कार वितरण व शेतकरी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, उपाध्यक्ष श्री. दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती फुंड, बांधकाम सभापती श्री. संतोष साठविलकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर, समाजकल्याण सभापती सौ. रुहिता तांबे तसेच अन्य सदस्य, मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखान व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत आज जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी चिरेखान व्यावसायिकांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न व विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित विषयांवर योग्य तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या श्रीमती शायना एन.सी. यांची पक्षाच्या 'प्रभारी राष्ट्रीय सचिव' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातर्फे आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
@ShainaNC
#Shivsena #EknathShinde #maharashtra
@RatnagiriPolice
देवनगरी देवरुख मध्ये मटका व्यवसाय खुलेआम चालू.. देवरुख पोलिसांकडून तात्पुरती कारवाई पण LCB कडून अक्षरक्ष लोकशाही अर्जदाराची घोर अपमान.... हाच काय आपला शिवरायांचा महाराष्ट्र.....
आता फोटो कालच संपूर्ण व्हिडीओ पाठविला LCb ला पण कोणतीही कारवाई नाही.....
देवरुख येथील शिवसैनिक मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री. उदयजी सामंत साहेब यांच्यासमवेत सर्व मान्यवर जमलेल्या सर्व शिवसैनिकांसमोर मेळाव्याचे प्रास्ताविका करण्याचे भाग्य मिळाले..
*"नमन त्या महापुरुषाला, ज्याने आम्हाला सन्मानाने जगण्याची वाट दाखवली."*
🙏 *माझे श्रद्धास्थान,विश्वरत्न, आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्रिवार अभिवादन*
*संविधान भवन निर्माण समिती (संगमेश्वर तालुका )*
माझे प्रेरणास्थान,माझे गुरु,माझे श्रद्धास्थान, माझे जीव कि प्राण असे माझे सर्वस्व,कोकणचे युवा हृदयसम्राट,प्रखर हिंदुत्ववादी, गोरक्षक, कुडाळ -मालवण मतदार संघांचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.....
@meNeeleshNRane
🇮🇳 इतिहासाची नवी पायरी… मालवणकरांसाठी अभिमानाची क्षण! 🚩🙏
आज मालवण तालुक्यातील नांदोस शिवकालीन गढी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित पारंपरिक पुरातत्त्वीय उत्खननाचा शुभारंभ सोहळा सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिष शेलार साहेब यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य व पुरातत्त्व विभागाने सुरू केलेले हे कार्य मालवणच्या इतिहासाला नवे आयाम देणार आहे. शिवकालीन वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी घेतलेले हे ऐतिहासिक पाऊल भविष्यातील पिढ्यांना आपल्या मातीचा अभिमान अधिक दृढ करणार आहे.
याप्रसंगी पुरातत्व व वस्तूसंग्रहाचे संचालक डॉ. श्री. तेजसजी गर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, श्री. अतुल काळसेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री. संतोष साठविलकर अन्य मान्यवर तसेच नांदोस गावातील ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुक्त, निपक्ष आणि धाडसी पत्रकारीतेच्या जोरावरच सशक्त राष्ट्राची निर्मिती शक्य आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ राष्ट्रीय पत्रकारिता दिन निमित्त आभाळभर शुभेच्छा
भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता!!!🏆🏏🇮🇳
विजयश्री खेचून आणत, विश्वचषकावर सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले. ह्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापन वर्ग, क्रिकेटप्रेमी तसेच तमाम भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#ICCWomensWorldCup2025
⭕ *"देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. राष्ट्रीय एकता दिन चिरायू होवो!"*
@BJP4Maharashtra @
⭕ आदरणीय श्री. अमितजी शाह साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा @AmitShah
देशाचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री आणि कुशल प्रशासक अमित शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे देशाची सुरक्षा आणि प्रगती अधिक बळकट होवो.
स्वदुग्धे सदा पोशिते ती जगाला,स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया,परमपूज्य जी वंद्य या भारताला,नमस्कार माझा त्या दिव्य गोमातेला
वसू बारस पवित्र दिनानिमित्त आपणास व आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा
#वसुबारस#vasubaras#bjp#गोमाता#gomata