आधी आमचा १५ वर्षांपेक्षा जास्त काळ हवा खात असलेला मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण करा …
.
.
.
की आता आम्ही कोकणात हवेत उडणा-या बसने जायचं ते ही सांगा …🤨
#हवेतउडणारीबस#ख्याख्या 😅
गोव्याच्या विमानतळाला स्व.मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले जाऊ शकते तर लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यायला अडचण काय ? लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नक्की कुणाला नको आहे हा प्रश्न प्रशासनाला आहे ?
#लोकनेतेदिबापाटीलविमानतळ#पनवेल#नवीमुंबई#मराठीएकीकरणसमिती
तुमच्याबद्दल चांगलं बोललं, चांगल्या कामाची स्तुती केली की मा.राजसाहेब हे महाराष्ट्राचे नेते आणि स्वबळावर उभ्या केलेल्या स्वतंत्र पक्षाचे प्रमुख असतात..... आणि तुमच्या कामातील, धोरणातील त्रुटी दाखवल्या की मग ते मिमिक्री आर्टिस्ट, सुपारीबाज असतात.
कालच्या भाषणात मा. राजसाहेबांनी काय विषय मांडले....?
• आपल्या कामातील त्रुटी संदर्भात कुणी बोलल्यानंतर 'बघून घेऊ' अशा आशयाचं धमकीवजा बोलणं मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभत का ?
• महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने महाराष्ट्र विधानसभेत हिंदीतून का बोलावं ?
• प्रकल्प, धोरणं ह्या संदर्भात जनतेने टीका केल्यावर ती महाराष्ट्रावरील टीका कशी असू शकते ?
खरंतर मुख्यमंत्री महोदयांनी ह्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी बिनबुडाचे शब्द वापरण्याची गरज नव्हती.
योगेश खैरे
प्रवक्ता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
5⃣3⃣8⃣ Intl Matches 🙌
1⃣7⃣,2⃣6⃣6⃣ Intl Runs 👌
8⃣2⃣9⃣ Intl Dismissals behind the stumps 👏
Winning Captain of ICC Men's T20 World Cup 2007, ICC Men's ODI World Cup 2011, ICC Champions Trophy 2013 🏆🏆🏆
Happy Birthday to Former #TeamIndia Captain @msdhoni, an absolute icon of the game 🫡
महाराष्ट्रात राहायचं आणि मराठीचा अपमान करायचा हा माज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही.
सोलापूर मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचा मराठीत असलेला फलक काढून भाजपने तो इंग्रजीत लावला, हा खोडशाळपणा कशासाठी ? भाजपला मराठीत असलेला फलक का खुपतोय ?
#मनसे
नितेशची स्मरणशक्ती कमी आहे बहुतेक, म्हणे राज ठाकरेंनी मुस्लिमांना बोलून दाखवावे.
रझा अकादमी विरोधात राज ठाकरेच उतरले होते, भोंग्याविरोधात राज ठाकरेच उतरले होते, अबू आझमीला भर विधानसभेत फटकावणारी मनसेच होती. भाजप नेहमीच बिळात असती!
तू तेव्हा मशिदीत होता म्हणून तुला माहित नसावे.
उद्या होणारा TET (शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षेचा पेपर पण फुटला ?
सेवेत असणारे शिक्षक आणि नवीन उमेदवार असे ६ लाख च्या वर उमेदवार या परीक्षेसाठी राज्यातून होते ...
धड परीक्षा घेता येत नाही आहेत सरकार ला ...
सतत मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे ...
तुमच्या या गोंधळामुळे अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहात ...
सरकार आणि प्रशासन अशी काही गोष्ट शिल्लक आहे का या राज्यात?
आमदार,खासदार फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकार कडून अजून काय अपेक्षा करणार ?
निर्लज्ज सरकार,बेपर्वा प्रशासन ...
अजून किती ⁉️
परवा मध्यरात्री भिवंडीत पोलिसांनी छापा टाकला आणि आज होणारा 'TET' परीक्षेचा पेपर फुटल्याचं सिद्ध झालं. परीक्षा पुढे ढकलली गेली, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींचं काय? परीक्षा म्हणजे उमेदवारांची योग्यता ओळखण्याची संधी असायची, पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र आणि देशातील ‘संधीसाधूंनी’ परीक्षा हा 'प्रश्नपत्रिका विकण्याचा ‘अधिकृत धंदा' बनवला आहे! देशात गाजलेल्या 'NEET' परीक्षेचा घोटाळा असो, की महाराष्ट्रातील 'MHT-CET' चा निकाल; ज्या मुलांना १० वी-१२ वीत साधे पासिंग मार्क्स मिळाले होते, ती मुलं चक्क १०० पर्सेन्टाईल मिळवून टॉपर येतात! हा कोणता चमत्कार? ज्या राज्याला शिक्षणाचा वारसा आहे, तिथे १२ वीच्या परीक्षेत ड्रोन लावून कॉपी रॅकेट पकडावं लागतं आणि १०७ केंद्र ब्लॅकलिस्ट करावी लागतात, ही आहे का महाराष्ट्राची प्रगती? तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी, नीट, सीईटी आणि आता टीईटी... तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडलीये का???
मला सरकारला आणि शिक्षण खात्याला विचारायचं आहे, तुम्ही जे पेपरफुटी विरोधी कडक कायदे आणण्याच्या पोकळ बाता मारता, ते कायदे काय फक्त मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी आहेत का? मंत्रालयाच्या आशीर्वादाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मुख्य सुत्रधारांना अटक नक्की होणार तरी आहे का? की दरवेळीप्रमाणे "आम्ही चौकशी समिती नेमलीये" हा नेहमीचा गुळगुळीत डायलॉग पुढे करून तुम्ही मोकळे होणार आहात? आज गरीब आणि मध्यमवर्गीय घरातला तरुण दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून अभ्यास करतोय. त्याची चूक एवढीच, की तो लाच देऊन पेपर विकत घेऊ शकत नाही! सिस्टीमच्या या नालायकीमुळे आज देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, टोकाचं पाऊल उचलतोय… आणि सरकार मात्र ‘ऑपरेशन टायगर’ करण्यात मग्न आहेत! किमान आता तरी तुमचं हे घाणेरडं राजकारण आणि पोकळ भाषणं बाजूला ठेवा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या त्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका.
लक्षात ठेवा, जर या तरुणांचा संयम सुटला ना, तर तुमच्या या अख्ख्या भ्रष्ट सिस्टीमचा 'पेपर' फाडल्याशिवाय राहणार नाहीत!
-अमित राज ठाकरे
राज ठाकरे यांनी ज्यावेळी परप्रांतीयांविरोधात आंदोलन केले होते, त्यावेळी प्रक्षोभक भाषण केले म्हणून राज साहेबांची सुरक्षा काढून घेतली. तोच न्याय संजय दिना पाटलांना लागू होतो की नाही? हे एकदा गृहमंत्र्यांनी सांगावे. - संदीप देशपांडे, मनसे नेते
#SandeepDeshpande#RajThackeray #SanjayDinaPatil #LatestNews
(Sandeep Deshpande, Raj Thackeray, Sanjay Dina Patil, Maharashtra)
“राजकीय पक्षांकडून तुमचा वापर केला जातोय. मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असावा. सोसायटीमध्ये धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही. जैन मुनी पद्मसागर हे माझ्या घरीही येऊन गेले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून इतरांना त्रास होईल असे प्रकार करू नका.”
– मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना मा. श्री. राजसाहेब ठाकरे.
#MNSAdhikrut
शेतकरी, कष्टकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर छाताडावर लाठ्याकाठ्या झेलणारा 'दिबा' नावाचा एक झंझावात होता ! साडेबारा टक्के परताव्याचा ऐतिहासिक लढा असो की सिडको-जेएनपीटी विरोधी आंदोलन, दिबांनी नेहमीच प्रस्थापितांविरुद्ध एल्गार पुकारून सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचे बळ दिले.
पण आज निवडणुका आल्या की सत्ताधाऱ्यांना आगरी-कोळी-भूमिपुत्र आठवतात आणि सत्ता मिळाली की विसर पडतो ! जर खरोखरच आमच्या बांधवांचा पुळका आहे, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये अजून खोडा कोण व का घातलाय? दशकांपासून हा संघर्ष सुरु आहे. २४ जून २०२१ ला कोविड काळातही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून भूमिपुत्रांनी आपला रोष दाखवला, राज्य सरकारने ठराव पाठवला, तरीही दिल्लीत ही फाईल सडत ठेवून या सरकारने भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पुसली आहेत !
निवडणुकीत मतांसाठी “आपले बांधव” आणि निवडून आल्यावर “कोण बांधव?” ही भाजपची राजकीय सवय आता महाराष्ट्राने ओळखली आहे. दिबांच्या समाजकार्याचा खरा सन्मान करायचा असेल, तर विमानतळाला त्यांचे नाव लागलेच पाहिजे ! भूमिपुत्रांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना जागा दाखवून, दिबांच्या क्रांतीकारी विचारांचा वारसा आम्ही भूमिपुत्र असेच खंबीरपणे पुढे चालवणार ! लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! 🙏🏻
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
“महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा, हे इथपर्यंत गेलं? या गोष्टी जाणूनबुजून सुरू आहेत का? निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी हे सुरू आहे का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आम्ही हातात बांगड्या नाहीत भरल्या असं म्हणणाऱ्याने मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला वाद नको आहेत पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू.”
- मा. राजसाहेब ठाकरे
#राजठाकरे #MNVSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापने आधीपासून ते आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मा.राजसाहेबांच्या पाठीशी सावलीसारखे खंबीरपणे उभे राहणारे, मनसेचे ज्येष्ठ नेते आदरणीय मा. बाळा नांदगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्यामध्ये असलेली कार्यकुशलता तमाम महाराष्ट्र सैनिकांना काम करत राहण्याची प्रेरणा देत राहो. आपल्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना !
@BalaNandgaonkar
निषेध ⚫
निषेध ⚫
निषेध ⚫
महाराष्ट्र ज्याची मागणी करतोय ते दिल्ली कधीच देत नाही. आणि इथले सत्ताधारी महाराष्ट्र राज्याचे हित न पाहता केवळ नंदी बैलासारखे मान डोलवत आहेत.
एकीकडे शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर एका विशिष्ट समाजाचा झेंडा लावला जातो, तर दुसरीकडे त्याच समाजाच्या चौकाचं उद्घाटन केलं जातं. मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, असे निर्णय घेऊन मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जात आहेत का? महापौरांच्या स्वतःच्या वॉर्डमध्येच मराठीचा साधा उल्लेख नसलेल्या चौकाचं उद्घाटन होतं, यावर महापौरांची भूमिका काय? किरीट सोमय्या आणि पराग शाह यांच्या प्रभावाखाली मराठी अस्मितेशी तडजोड केली जात आहे का? महापालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक चौक, रस्ता किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाणी होणारे काम हे मराठीत व्हायला हवे असे अनिवार्य असताना महापौरांना याचा विसर पडलाच कसा? महापौरांनीच जर महापालिकेचे नियम पाळले नाहीत तर कोण नियमाचे पालन करील?
सत्तेतील नेत्यांनी जनभावना समजून घेण्याची गरज आहे. मराठी माणसाचा सन्मान राखायचा असेल, तर अशा निर्णयांपासून अंतर ठेवावं; अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल.
#aaplayashwant #marathi #maharashtra #thinkmayormadam