📍क्लीव्हलँड, ओहायो
जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
‘#मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले."
मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी मित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या.
@Dev_Fadnavis@ClevelandClinic@Brookfield@ArcelorMittal@IndiainNewYork@IndianEmbassyUS
#वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या #लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश आणि जिल्हा प्रशासनासोबतच, अन्य विभागांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आता काशिनाथ गायकवाड यांना पत्नीला बैलाच्या जागी जुंपावे लागणार नसल्याने, या कष्टकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्दचे काशिनाथ गायकवाड भूमिहीन शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या मदतीने गायकवाड व त्यांच्या पत्नी हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसतात. मशागतीची, नांगरणी ते पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करतात, यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातच त्यांच्याकडील एका बैलाचा शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी, गायकवाड यांना पत्नी हौसाबाई यांना जोखडला जुंपावे लागल्याचे वृत्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले. यावर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संपर्कात राहून, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना महसूलसह, सर्व यंत्रणांना गायकवाड यांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसील कार्यालयासह, पशुसंवर्धन, कृषी सर्व यंत्रणा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचल्या.
@Dev_Fadnavis
📢 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर यांची ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान व शाश्वत शेती व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
🔔 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत ११ ते १६ जून २०२६ रोजी सकाळी ७:२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर (News On AIR) या ॲपवरही उपलब्ध असेल.
🔔 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. ११ जून २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.
#दिलखुलास
#जयमहाराष्ट्र
#लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली. रस्ते अपघातामध्ये होणारे मृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. iRAD पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्याबाबत त्यांनी यावेळी सूचना दिल्या.
राज्यातील प्रतिबंधित #पानमसाला, #गुटखा, #भेसळ अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत धडक मोहीम राबवली. #अन्न व #औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार केलेल्या सात दिवसांच्या कारवाईत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण २०३ आस्थापनांवर #कारवाई करत ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
#FoodandDrugs
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपया स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुमारे १२ अब्ज डॉलरचे सोने विकल्याचा सोशल मीडियावर करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.
#FactCheck#DGIPRFactCheck
आरबीआयने अशा माहितीचे खंडन करत आपला सोन्याचा साठा ८८०.५२ टन इतका कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
#RBI
#GoldReserves
‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू…
याबाबतचे सविस्तर वृत्त पाहण्यासाठी महासंवादच्या पुढील लिंकला भेट द्या - https://t.co/TRurMG8bCT
#प्रशिक्षण#प्रवेशप्रक्रिया