Forever Student of Life science! Believes in positive change and it always starts from within! Only Karma decides who you are!!
RT's are not endorsement
Simulation byア, @yuruyurau.
Trigonometric Genesis: Where periodic functions learned to undulate and breathe like lifeforms. A soft-bodied form emerges as if math itself were evolving toward life. "Annelida Mathematica".
शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेली टीईटीची रविवारी (28 जून) होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटली आहे. त्यामुळं ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं देशात NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
#TETExam#TETPaperLeak
@IDBI_Bank@IDBIBankCares is this your way to take care of society by fixing the generator on footpath? WOW, incredible CSR exercise..!
Location: Parli Vaijanath, District : Beed, Maharashtra, India
https://t.co/KlQo2iCSG9
बँकेच्या बचत खात्यात ठेवलेल्या पैशांवर खूप कमी व्याज मिळते. साधारणपणे, बँका बचत खात्यांवर वार्षिक 2.5% ते 3.58% व्याजदर देतात. मुदत ठेवींवर (FD) जास्त व्याज मिळते, परंतु गरजेच्या वेळी एफडी मोडल्यास दंड लागतो, ज्यामुळे परतावा कमी होतो. जर तुम्हालाही तुमच्या बँक खात्यात ठेवलेल्या पैशांवर जास्त व्याज हवे असेल आणि कोणत्याही दंडाशिवाय तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे काढण्याची सोय हवी असेल, तर बँकिंग विश्वात तुमच्यासाठी एक 'जादुई' सेवा आहे. ही सेवा म्हणजे 'ऑटो स्वीप सुविधा'.
Mahi 🤝 RO!
The first captain to win this trophy along with the last captain to win this trophy! 🤩🏆
ICC Men’s #T20WorldCup | FINAL | #INDvNZ | LIVE NOW 👉 https://t.co/Tz1DBSb4nT
आई भवानी यांच्या हातून महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी काही तरी कृतीशील घडो !
श्रीमान राज ठाकरे यांच्या पोस्टची दखल घ्यावी असे विशेष त्यात काही नाही. पण काही तरी घडत असताना.. आपल्या स्वभावाप्रमाणे स्वतःची दखल घेतली जावी, मी कसा यात नाही? आणि म्हणूनच तर ही पोस्ट लिहिली गेली नाही ना? असे वाटावे अशीच ती पोस्ट आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र स्वीकारण्याकरता आणि युनेस्को मुख्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे उभारण्यात आलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी फ्रान्सला जाताना तसेच बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा घेऊन जात असताना, माझ्या लक्षात आले की, मराठी भाषा, महाराष्ट्रातील कला लोककला, लोक परंपरा, समृद्ध बोली भाषा, लोकसंस्कृती, लोकदैवते, महाराष्ट्राची आद्य व वंदनीय प्रतीके, जाज्वल्य इतिहास आणि अखंड परंपरा.... यांच्यासाठी काही करुन दाखवले का? की फक्त
पोस्ट लिहून प्रसिद्धी मिळवणारे ही महाराष्ट्रातील नेते आणि पक्ष आहेत, याची जाणीव काही संवेदनशील मनांना करुन द्यावी म्हणून आज थोडे लिहूनच टाकावे असे ठरवले म्हणून हा अक्षरप्रपंच.
आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या वर्षात देशभरात चालणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबईतल्या व्याख्यानमालेत सरसंघचालक प. पू. मोहन भागवत जी यांचे निमंत्रितांच्या नियोजित कार्यक्रमात व्याख्यान झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे नेमके काय काम करतोय, आमच्यासमोर उद्दिष्टे काय आहेत, देशाची आजची आवश्यकता काय आहे, देशाची मार्गक्रमणा कशी झाली पाहिजे, या विषयावरच्या व्याख्यानमालेचा होता.
म्हणूनच सुरुवातीला हे स्पष्ट करावं लागेल की, प.पू, मोहन भागवत जी यांनी ठळकपणे मांडले की, मातृभाषेतच शिक्षण दिले गेले पाहिजे, घरातदेखील मातृभाषेतच बोललं गेलं पाहिजे.
आता श्रीमान राज ठाकरे तुम्ही खरेच मराठी भाषेचे प्रेमी असता तर तुम्ही या विषयावर संघाच्या या भूमिकेचे कौतुकच करायला हवे होते. पण.एवढा मनाचा मोठे पणा कुठून आणणार ? हाही प्रश्न आहे. खरं तर आज जगातील सर्वात मोठी तसेच शंभर वर्षे पूर्ण करणारी, देशसेवा करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना महाराष्ट्राच्या मराठी मातीत प्रथम सरसंघचालक महान, द्रष्टे पं पू. केशव बळीराम हेडगेवार जी यांनी जन्माला घातली.
आज त्या संस्थेची शंभरी साजरी होत असताना सरसंघचालक या आमच्या श्रध्देय जागी अत्यंत नम्र, विद्वान आणि वैचारिक श्रीमंती असलेले प. पू. मोहन भागवत जी हे महाराष्ट्राचे मराठी मातीचे सुपुत्र विराजमान झाले आहेत तुम्ही त्यांचे कौतुक करावे एवढे मोठे नसलात तरी आदराने अभिमान बाळगावे एवढे तर दिलदार असायला काय हरकत आहे ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जन्मशताब्दी सुरु करतानाच तीन गोष्टी महत्त्वपूर्ण रित्या मांडल्या.
1) आत्मचिंतन करणार
2) संपूर्णतः समाजाला संपर्क करणार व आभार मानणार.
3) पुन्हा एकदा देशाला समर्पित करण्याच्या भावनेने कामाला लागणार.
आत्मचिंतन, संवाद आणि समर्पण या तिन्ही गोष्टी शताब्दी पूर्ण केल्यानंतर संघाचे देशभरात कार्यक्रम होत आहेत, त्यात कुठल्याही भाषेला, प्रांतवार रचनेला विरोध करणं आणि कोणताही प्रश्न उभा करणं येत नाही. तरीही प्रश्न उपस्थित केला असेल तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे. संघ परिवार किंवा भारतीय जनता पक्ष नेहमीच मातृभाषेबद्दल आग्रही आणि महाराष्ट्रात मराठीबद्दल आग्रही आहेच.
महाराष्ट्रात असो किंवा जगात असो, प्रत्येक मराठी माणूस मराठीतच बोलेल ज्याची मातृभाषा मराठी आहे. देशपातळीवर इंग्रजी नको तिच्या पेक्षा भारतीय भाषेत संवाद व्हावा, असा प्रयत्न असेल तर केवळ छिद्रान्वेशी वृत्तीने आपण त्याचं विश्लेषण करण्याच्या भानगडीत पडला नसतात तर बरं झालं असते.
आता तुमच्या दृष्टीने रटाळ होणे याचा अर्थ काय ? कोणाच्या व्याख्यानाला आपण रटाळ म्हणताय? ज्यांच्या आशिर्वादाने आणि विचारधारेने जगभरातले मोठे संघटन उभं राहिलेलं आहे त्यांना?
मोफत मनोरंजन होते म्हणून काही जाणांच्या सभांना लोक गर्दी करतात, टाळ्या आणि शिट्या वाजवून मनोरंजन करणाऱ्या कलाकाराला खूश ही करतात पण त्याला मते देत नाहीत. जनता किती हुशार आहे हे माहिती आहे ना? ताजेताजे जे घडलेय ते आठवते ना?
या सगळ्या बाबतीमध्ये भाषावार प्रांतरचना आणि आमचे स्वत्व हेच आमचे मराठी आणि महाराष्ट्र आहे. म्हणून आता थेट प्रश्न तुम्हाला...
१) सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी (INDIA ) ज्यांचे नेतृत्व राहुल गांधी आणि परिवार करीत होते. त्या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तुम्ही समर्थन करीत सभा घेत होतात. ज्या काँग्रेसने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा आग्रह करीत आंदोलन करणाऱ्या हुतात्म्यांवर, मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या, मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या झाडल्या त्या काँग्रेससोबत तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कसे गेलात? म्हणून तुमच्या हेतूबद्दल शंका आहे
2) नुकत्याच झालेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण आपले बंधुराज उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन निवडणूक लढली. हीच उबाठा सेना मराठी माणसाच्या छातीत गोळ्या घालणाऱ्या काँग्रेसची तळी राखते आहे. हिंदुरुदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मराठी भाषेसाठी केलेले योगदान हे आपणाला ज्ञात नाही का मग जर हे ज्ञात होते तर मग आपल्या बंधू राजांना याबाबत कधी तुम्ही प्रश्न विचारलेत का ? म्हणून तुमच्या हेतू बद्दल आमच्या मनात शंका आहे
विषय आमचा तर पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट करतो, आम्ही मराठीबद्दल आग्रहीच आहोत, आणि हिंदुत्वाबद्दल कट्टर आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारची पोस्ट लिहून हे सांगावे लागत नाही.
पण केवळ आपण आपल्याच शहरात बेदखल झाल्यामुळे कुणीतरी दखल घेण्यासाठी एखादी सोशल मिडियावरील पोस्ट म्हणून फार मोठी कामगिरी केली असे वाटणाऱ्यांंच्या हातून आई भवानी देशासाठी, हिंदुत्वासाठी, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी अधिक योग्य भरीव, सकारात्मक, सुयोग्य काम करुन घेईलच अशी प्रार्थना करतो.
धन्यवाद!