ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो ,
गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.
एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.
तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे !
तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !
एक तप झालं.
बरोब्बर १२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपला "विकास आराखडा" महाराष्ट्राला सादर केला.
ह्यावर काम करणाऱ्या गटात काम करण्याची मिळालेली संधी हा एक संपन्न अनुभव होता. साधारण सहा वर्ष आणि साडे-चार महिन्यांच्या ह्या कामातून एक वेगळी दृष्टी मिळाली ..
#महाराष्ट्र #विकासआराखडा
महाराष्ट्राला अंधश्रद्धा व जातीपातीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रबोधनाची मशाल हाती घेणारे आणि मराठी मनाला स्वाभिमान शिकवणारे माझे पणजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
विद्यानंद बापट जिंदाबाद! मुस्लीमांचा DJ बंदीचा फतवा! नृत्यांगना, 116 मंडळांवर खटले, 26 वर थेट गुन्हे! 16 Sound System जप्त! चार शहरांतले ध्वनिप्रदूषण 50% पार!
https://t.co/ORPpcc65XQ
#पुणे: DJ ला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावर बेदम मारहाण. कशाळे चौकात त्यांना गाठून ४-५ जणांनी मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती.
#Pune#Punenews
संतोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक....
त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली....
हीच त्यांची चूक झाली असावी...
थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक, कादंबरीकार आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यातील एक अग्रणी नेते, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे
Many congratulations to Jyothi Yarraji on becoming Asia's fastest woman in the 100m hurdles by winning gold at the 65th National Inter-State Senior Athletics Championships.
After a year-long battle with injury, she has not just returned to the track but displayed an indomitable spirit, outpacing the field in a brilliant 12.99s.
She brought double delight to the nation as, apart from winning gold, she earlier in the day clocked 13.14s to meet the qualifying standard for the 20th Asian Games Aichi–Nagoya 2026.
आज २० जून २०२६ रोजी, मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
- मतदारयादी पुनर्निरिक्षण (SIR) या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, आपलं मतदार याद्यांकडे लक्ष नसल्याने काय गोष्टी घडू शकतात हे आपण पाहिलं.
- महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा, हे इथपर्यंत गेलं? या गोष्टी जाणूनबुजून सुरू आहेत का? निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी हे सुरू आहे का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
- आम्ही हातात बांगड्या नाहीत भरल्या असं म्हणणाऱ्याने मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला वाद नको आहेत पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू.
- तुम्ही धर्माचं काम करत आहात, ते करत राहा. उगाच नको ते उद्योग कशाला करता? मध्यंतरी कबुतरांचा विषय आला, आता पांढरी पट्टी, हे सगळं राजकारण्यांच्या नादी लागून करतायेत.
- आपल्याकडे खासदार फोडणं सुरू आहे, सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जनतेनं लक्षं ठेवलं पाहिजे. एक जुनं वाक्य आहे "स्वाभिमान मेला की उरतात फक्त जिवंत प्रेतं."
- इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार देशात सर्वात जास्त २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतायेत, नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतायेत. राज्यात लहान मुलं, मुली पळवण्याचे प्रकार घडतायेत. एवढं सगळं सुरू असताना आपल्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडण्याचं काम सुरू आहे.
- या आमदार, खासदार पळवापळवीमध्ये आपण आपल्या मुलभूत गोष्टी विसरून जातोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, देशाची परंपरा आपण विसरत चाललोय.
- केंद्राच्या रिपोर्टनुसार MSEDCL ला पॉवर डिस्ट्रिब्युशनमध्ये १०० पैकी दीड गुण मिळालेत. MSEDCL चा आता IPO येत आहे अशावेळी दीड टक्का मिळालेल्या कंपनीत गुंतवणूक करायला कोण येणार? कंपनी अदानीच्या हातात देऊन महाराष्ट्राचा वीज पुरवठा ताब्यात घेण्याचं हे कारस्थान आहे.
- कोण सत्तेवर आहे याने मला फरक पडत नाही. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय याने मला फरक पडतो. सत्तेवर बसून चुकीचे पायंडे पाडले जातायेत याचं कोणाला भान उरलेलं नाहीये.
- आपलं आंदोलन घरापर्यंत पोहोचतं पण घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही याला काय म्हणायचं? आपल्या आजूबाजूला काहीतरी षडयंत्र रचलं जातंय याची आपल्याला कल्पना आहे का?
- लवकरच जनगणना सुरू होत आहे. माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून या जनगणनेवर लक्ष ठेवा. काही ठिकाणी, घर गणनेच्या वेळेस भाजपचे लोकं तिकडे हजर असतात. ते अंदाज घेत आहेत की या घरात आपले मतदार आहेत का नाही? जर त्यांना वाटलं, नाही तर त्यांची नावं काढून टाकण्याच्या हालचाली सुरु होतात. तुम्ही आंदोलनं करता, ती लोकांना आवडतात, लोकांपर्यंत पोहचतात पण त्यांची मतं आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत याचा विचार करा. ३ वर्षांनंतर निवडणुका आहेत म्हणून गाफील राहू नका.
- निवडणुकीचा खेळ कसा खेळला जातोय, किती चालाखीने खेळला जातोय याची कल्पना आपल्याला नसेल तर निवडणुका लढवण्याला काहीही अर्थ नाही.
- मी २०१९ला सांगत होतो निवडणुकांवर बहिष्कार टाकायला हवा, ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारच्या निवडणुका सध्या सुरू आहेत हे पाहता हाताला काही लागणार नाही. आणि लागलं तरी हे आमदार, खासदार पळवून नेतील.
राज ठाकरे ।
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।
12 जणांनी रायगड उभा केला. तुम्ही 12 कोटी आहात. तुम्ही अख्खा महाराष्ट्र रायगड करू शकता.
रायगडावर जा. मनसोक्त जल्लोष करा. ढोलाच्या तालावर नाचा. अंगावर काटा आणा. डोळ्यात पाणी आणा.
पण संध्याकाळी गड उतरताना, महादरवाजातून बाहेर पडताना, एकदा मागे वळून महाराजांच्या समाधीकडे बघा. 1/2👇