राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री श्री. महादेव जानकर साहेब धाराशिव दौऱ्यावर आले असता शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात त्यांची भेट झाली. यावेळी त्यांचा सत्कार केला व मनमोकळा संवाद साधला.
तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
@MahadevJankarR
#रासप #अध्यक्ष #भेट #सत्कार #धाराशिव #dharashiv
जिल्हास्तरीय मुलींच्या कब्बडी स्पर्धेचे आरणी ता. धाराशिव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा माझ्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून आलेल्या मुलींचा सहभाग लक्षणीय होता. शहरासह ग्रामीण भागातील मुली देखील आता मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
याप्रसंगी आयोजक व सहभागी खेळाडू यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी श्री. कटके, बाळकृष्ण तांबारे सर, सरपंच गोविंद बापू हारकर, माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब तनमोर, गजेंद्र जाधव, नंदकुमार क्षीरसागर, आश्रुबा माळी, पोलिस पाटील परेश शिंदे, धीरज घुटे, पांडुरंग शिंदे, शाम जाधवर, माणिकराव रोहिले, रावसाहेब घुटे आदींसह पंच, खेळाडू उपस्थित होते.
#कब्बडी #kabbadi #players #sports #kabbadiplayer #धाराशिव #dharashiv
कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे.
शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय.
महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही... अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही!
शेतकऱ्यांचा कणा अजून किती मोडणार ?
दरवर्षी येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यावर मोडून पडण्याची वेळ आणली आहे. अशावेळी त्याला आधार हा सरकारच असतो. पण सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार हे बळीराजाचा आधार बनण्याऐवजी त्याचा कणा मोडण्याचे निर्णय घेत आहे.
शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज योजना ही शेतकऱ्यांना तारणारी ठरली आहे. या योजनेत आता लाभ घेण्यासाठी मुद्दल व ६ टक्के व्याज आधी भरावे लागेल, असे जुलुमी फर्मान सरकारने काढले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना व्याज देणे अनिवार्य नव्हते. फक्त मुद्दल भरूनही नव्या कर्जाची उचल करता येत होती. मात्र आता सव्याज परतफेड केली तरच योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
सध्याची शेतकऱ्याची अवस्था पाहता मुद्दल भरणे अडचणीचे झाले आहे. त्यात सरकार म्हणतंय व्याजही भरा. म्हणजेच ही योजना बंद पाडण्याचा कुटील डाव यामागे आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे.
शेतकरी तुम्हाला याचा जाब विचारेलच.. तुम्हाला धडाही शिकवेल.. उत्तर द्यायला तयार रहा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dhananjay_munde
#शेतकरी #farmers #पीक #कर्ज #crop #loan
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती निमित्त कोथरूड, पुणे येथील गांधी भवनातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
देशाच्या उन्नतीसाठी खेड्यांनी स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन गांधीजींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. त्यांचे शांती आणि अहिंसात्मक विचार आजही प्रेरणादायी आहेत.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांची भेट घेऊन सामाजिक व सध्याचे राजकारण अशा अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांच्याकडून अनेक विषयांवर मोलाचा सल्ला ही मिळाला. गांधीजी जाणून घ्यायचे असल्यास डॉ. कुमार सप्तर्षी यांची जरूर भेट घ्यावी, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
#MahatmaGandhi #GandhiJayanti #महात्मा #गांधी #mahatma #Gandhi #जयंती #jayanti
कळंब तालुक्यातील पाडोळी येथील आकाश टेकाळे यांनी नऱ्हे, पुणे येथे "शिवज्ञ अमृततुल्य अँड कॉफे" या नावाने नवीन हॉटेल चालू केले. या तरुण उद्योजकाच्या व्यवसायाचे उद्घाटन माझ्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
ग्रामीण भागातल्या तरुणाने पुण्यात हॉटेलसारखा व्यवसाय सुरू केला, हे पाहून आनंद वाटला. त्यांचा नवीन व्यवसाय लवकरच नावारूपाला येऊन भरभराटीस लागो, अशा शुभेच्छा दिल्या.
तरुणांनी उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे हेच आपले कायम मत राहिले आहे. खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमीकरण घडून यावे असे वाटत असेल तर स्वयंरोजगाराला पर्याय नाही.
यावेळी शिवराज गुंड, माजी उपसंचालक जनक टेकाळे, पणन महामंडळाचे प्रकाश टेकाळे, किशोर टेकाळे, किरण टेकाळे, रोहन सरवदे, रोहित सरवदे, शरद नवगिरे, सूरज राऊत, राजेश सरवदे, पृथ्वी सरवदे, सौरभ ढोबळे, विकास टेकाळे, अभिजित टेकाळे आदी उपस्थित होते.
#opening #ceremony #hotel #हॉटेल #उदघाटन #business #Businessman #पुणे #pune
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणत असल्याचा गाजावाजा मिंधे-भाजप सरकारनं केलाय. पण ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा आता इतिहास संशोधक संदर्भानिशी करतायत.
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या संदर्भातील कोणतीही गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह तसेच पवित्र आहे. पण महाराजांची वाघनखं असल्याचं दाखवून मिंधे-भाजप सरकार काहीही खपवणार असेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणार असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही.
ही वाघनखं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर त्याचे तसे रेकॉर्ड लंडनच्या म्युझियममध्ये का नाहीत? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर मग ती भाड्याने का आणताय?
भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
साधेपणाचे मूर्तींमत उदाहरण असलेल्या शास्त्रीजींनी स्वभावातील मृदूता पण तितकीच खंबीरता, स्पष्टवक्तेपणा आणि समन्वयवादी भूमिकेद्वारे अनेक विधायक कार्यांना चालना दिली. 'जय जवान, जय किसान' या घोषमंत्रातून देशवासियांना प्रेरित केले. त्यांची जीवनगाथा आजही प्रेरणादायी आहे.
#LalBahadurShastri #लालबहादूर_शास्त्री #जयंती #jayanti
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या जोरावर ब्रिटीशांच्या विरोधात लढा देऊन महात्मा गांधी यांनी अभुतपूर्व क्रांती घडवून आणली. सत्याग्रहाच्या मार्गाने आपला हक्क आपल्याला मिळविता येतो याची शिकवण त्यांनी दिली. त्यांचे स्वदेशी गांधीवादी विचार सदैव आम्हाला प्रेरणा देत राहतील.
#महात्मागांधी #mahatmagandhi #जयंती #jayanti
चला तर मग, व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आपण नित्य संपर्कात राहू, आपला संपर्क अधिक घट्ट करू..
What's App चॅनलच्या माध्यमातून @PatilKailasB जी यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंक ला Follow करा..
Follow the Kailas Patil channel on WhatsApp: https://t.co/Waio0NL11M
व्हॉट्सअप हे संपर्कात राहण्यासाठीचे सर्वात लोकप्रिय आणि सोपे माध्यम आहे. याद्वारे आ. @PatilKailasB जी यांना आपल्याशी संवाद साधता येतोय याबाबत आनंद आहे. हे नवीन संपर्क माध्यम दादांच्या रोजच्या कामाबद्दल आणि निर्णयांबद्दल माहिती देईल.
पोकळ आश्वासने, बोलघेवड्या योजना... होऊ द्या चर्चा... अभियानाचा केला राजुरी, सारोळा (बु) येथून शुभारंभ..
केंद्रातील आणि राज्यातील भाजपा प्रणित सरकार हे सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन सत्तेवर आलेले हे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. या सरकारच्या बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने "होऊ दे चर्चा" हे अभियान राबविण्यात येत असून, त्याची सुरुवात लोकसभा निरीक्षक दत्तात्रय गायकवाड, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी यांच्या उपस्थितीत केली.
महागाई, रोजगार आणि भृष्टाचाराच्या मुद्यावर सत्तेत आलेल्या या सरकारने गेल्या ९ वर्षभराच्या काळात सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून एकही महत्वकांक्षी निर्णय घेतलेला नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव, काळे धन परत आणू, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख देऊ यासारख्या अच्छे दिनची सर्वसामान्य माणूस प्रतीक्षा करत आहे. फसव्या घोषणा करणे आणि भल्यामोठ्या खोट्या जाहिराती देणे एव्हढेच काम हे सरकार करत आहे. राज्यातील शेतकरी, युवक, कामगार, व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच क्षेत्रातून सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. परंतु अहंकाराचा चष्मा डोळ्यांवर असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारला जनतेचे हाल दिसत नाहीत. त्यांचा हाच अहंकार मोडीत काढण्याचा व बोलघेवड्या योजनांची भांडाफोड "होऊ द्या चर्चा" या अभियानांतर्गत करण्यात येत आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, अंकुश मोरे, राज जाधव, अविनाश इंगळे, धाराशिवनामाचे संपादक विनोद बाकले, धनंजय इंगळे, राकेश सुर्यवंशी, गुरुनाथ गवळी, विकास जाधव, सरपंच मधूकर गळकाटे, अनिल भोसले, गणेश जाधव, सुरेश कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष अकबर शेख, सावन देवगिरे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
#Shivsena #शिवसेना #ShivsenaUBT #धाराशिव
#dharashiv
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडत असलेल्या, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (IATO) च्या ३८ व्या वार्षिक अधिवेशनास आज उपस्थित राहून पर्यटनासंबंधी माझे मत व्यक्त केले.
भारतातल्या प्रत्येक राज्याला पर्यटनाची संस्कृती लाभली आहे, तशी ती आपल्या समृद्ध महाराष्ट्राला देखील आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास साधण्यासाठी पर्यावरणपूरक संकल्पना प्रत्यक्षात राबविणे गरजेचे आहे. तरच शाश्वत विकास साधला जाईल, पर्यटन क्षेत्राचा विकास होईल!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, सन्माननीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, माजी मंत्री दिलीपराव जी देशमुख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास जी दानवे, यांच्यासह किल्लारी येथील स्मृतीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करून भूकंपात आपले प्राण गमावलेल्या नागरिकांना विनम्र अभिवादन केले.
तसेच किल्लारी व परिसरातील नागरिकांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित राहिलो.
किल्लारीच्या महाप्रलयांकरी भूकंपाला आज ३० वर्षे पूर्ण झालीत. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देऊन गाढ साखर झोपेत असलेल्या गावावर भूकंपाने घाला घातला आणि काय होतंय कळायच्या आत हजारो नागरिक मृत्युमुखी पडले, हजारो जण गंभीर जखमी झाले, हजारो जनावरे दगावली, घरे जमीनदोस्त झाली. भूकंपाचा तो दुर्दैवी क्षण आठवला की अजूनही काळजाचा ठोका चुकतो. त्या काळरात्रीच्या वेदनादायी स्मृती आजही प्रतेकाच्या मनात घर करून आहेत.
याप्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे, मंत्री ना. संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मा. मंत्री आ. राजेश टोपे, मा. मंत्री बसवराज पाटील, मा. मंत्री मधुकरराव चव्हाण, मा. आमदार दिनकर माने, मा. आमदार राहुल मोटे, सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी आदींसह अनेक मान्यवर, गावकरी उपस्थित होते.
#earthquake #भूकंप #Killari #किल्लारी #dharashiv #latur #लातूर #धाराशिव