@Swapnil35550095 इथे कांग्रेस चा खासदार झाला असता उत्कर्षा रुपवते आघाडीसाठी याला मदत केली हा निवडून आला रुपवतेनी VBA मधे जाऊन ९५k मतदान घेतल आता काँग्रेसकडे २०२९ ला सिट आली तर मानूस नाही
मंदिरात देव होता, उंबर्यावर लक्ष्मी-नारायणाचा जोडा होता, टिपत असलेल्या कॅमेरामागे दिसत असलेला तो भावूक क्षण होता. ❤️😞
Life end's but love doesn't.
व्हिडिओ क्रेडिट- cinematiccaptures
अखेर प्रत्येकाने आपापला भिडू आणला. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेवर लेकाला पाठवलं. त्याने परिषदेवर मित्राला घेतलं. तटकरेंनीही दुसरी जागा स्वतःकडे ओढली.पटेलांनी जैनांची एंट्री केली. आता भुजबळांना अन्याय झाल्याची भावना असणारच!कारण पक्षात ज्याचे ज्याचे स्टेक्स लागलेत त्यांनी संधी साधली.
तेच अजित दादांनी मावळच्या निवडणुकीनंतर लेकाला कोणतीही जबाबदारी दिली नाही. भुजबळांना मंत्रिपद नाकारलं. दोन्ही पक्ष एकत्र करून तटकरेंच्या जागी अमोल कोल्हेंचा ओबीसी चेहरा समोर आणणार होते. दिल्लीत बहीण सक्रिय झाली की आपसूक बाकी प्लेअर्स बाजूला पडणार होते.2/2
वक्त वक्त की बात हैं 💯
उन्हाळी कांद्याला 5-6 रुपये भाव मिळतोय. निर्यात धोरणातील बदल आणि अवकाळी पावसाने कांदा उत्पादकाला झोपवलंय. नाफेडने 15 रुपयांची हमी दिली. पण अजून खरेदी कागदावरच आहे. आज ओतूर-मंचर पट्ट्यात आहे.
Watch my ground report on @mumbaitak
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच सर्वोत्तम विरोधी पक्षनेते होते. भाई, या माणसाने साध्या हनुमान चालीसा प्रकरणाला जीवनावश्यक प्रश्न बनवून दाखवलं होतं.
आताच्या विरोधी पक्षांनी त्यांचा x खावा जरा.
राज्यात कायदा सुव्यवस्था पुरती बुडालेली असताना षंढ विरोधी पक्ष फक्त सोशल मीडियावर जिवंत आहेत. अजून किती मुद्दे पाहिजेत तुम्हाला😂
@INCMaharashtra@NCPspeaks@ShivSenaUBT_@MaharashtraPwp
आतापर्यंत तीन वेळा लेऑफ मुळे माझा जॉब गेलेला आहे.
पहिला जॉब गेला तेव्हा वडील दवाखान्यात अॅडमीट होते. संध्याकाळी ४ वाजता त्यांना डीस्चार्ज मिळणार होता. वर्क फ्रॉम होम असल्याने १०-१२ दिवस दवाखान्यातूनच काम करत होतो. कंपनीचं काम आणि डिस्चार्जची तयारी करत असताना एक वाजता एचआरचा कॉल आला.
'कंपनी आर्थिक संकटात असल्याने आम्ही काही कर्मचाऱ्यांना कमी करतोय, तुम्हाला एक महिन्याचा पगार देऊ, आजपासून तुम्ही काम थांबवू शकता, तुम्हाला थोड्या वेळात मेल येईल, त्याला अकनॉलेज करा, आम्ही दिलगीरी व्यक्त करतो,' असं बोलून तिने फोन ठेवला. मी फक्त ओके ओके बोलत राहीलो.
थोडा वेळ काहीच समजत नव्हतं, काहीच प्रोसेस करता येत नव्हतं. एकाच वेळी डोक्यात अनेक प्रश्नांचं वादळ उठलं होतं.
१५ दिवसांपूर्वी मॅनेजरने आणि एचआरने अप्रेजल फॉर्म भरून घेतला होता. हा फॉर्म भरायला जवळपास तीन तास लागलेले, सर्व गोष्टी आधी मॅनेजर, नंतर ऑपरेशन हेड आणि एचआरने बारकाईने तपासून घेतल्या होत्या.
माझी संपूर्ण वर्षभरातली कामगिरी पहिल्या तीन मध्ये होती. मॅनेजरने देखील सर्वांसमोर अनेकदा कौतुक करुन त्याची दखल घेतली होती. आपल्याला चांगलं अप्रेजल मिळेल याची पूर्ण मला खात्री होती.
पण आता अप्रेजल दूरच, पुढच्या २ महिन्यांनी आपली सॅलरी देखील येणार नाही हे आता नाईलाजाने स्विकारावं लागणार होतंं.
एचआरने फोन ठेवला तसा धावत हॉस्पिटलच्या अॅडमिन कडे गेलो. मी काही विचारायच्या आधीच त्यांच्याकडून डिस्चार्जची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
'मॅडम, इन्शुरन्स असला तरी काही गोष्टींचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात असं तुम्ही सांगितलेलं होतं, तर ते किती झालेत सांगता का?' एचआरच्या फोननंतर माझ्या खोल गेलेल्या आवाजात मी अॅडमीन मॅडमला विचारलं.
'अरे.. काहीही नाही, टेन्शन घेऊ नको.. हॉस्पीटलने ते चार्जेस वेव ऑफ केले आहेत, नॉमिनल होते. संपूर्ण बील कॅशलेस आहे. तुला एक रुपयाही भरावा लागणार नाही.. ४ वाजता पप्पांना घेऊन जाऊ शकतो.' त्या मॅडमच्या या उत्तराने काहीसा धीर मिळाला.
डिस्जार्जची सगळी प्रक्रिया पूर्ण केली. पहिल्या मजल्यावर वडिलांच्या रुममध्ये गेलो. तिथे माझ्याच वयाच्या तीन नर्स मुली वडिलांच्या हाताला लावलेल्या सुया आणि सलाईन काढत होत्या. मी जेवणाचे डब्बे, नातेवाईकांनी खायला आणलेल्या गोष्टी आणि कपड्यांची आवराआवर करुन बॅग पॅक केली. वडीलांना बेडवरून खाली उतरवलं, चक्कर येत नाही याची खात्री करण्यासाठी रुममध्येच २ मिनिटं ते चालले आणि नंतर आम्ही जिन्याने ग्राऊंड फ्लोअरला आलो.
'काका काळजी घ्या,' असं म्हणून १०-१२ दिवस वडीलांची मनापासून काळजी घेणाऱ्या त्या मुलींनी आम्हाला निरोप दिला. वडिलांनी कृतज्ञता म्हणून १००-१०० रुपये त्या मुली नको-नको म्हणत असताना त्यांच्या हातात दिले.
मी बाईकवर आलेलो. मित्राला त्याची फोर-व्हिलर घेऊन बोलावलेलं. तो खाली येऊन थांबला होता. ऑगस्ट महिना असल्याने पाऊस पडत होता, तो दारापर्यंत छत्री घेऊन आला, वडीलांना गाडीत बसवलं, मी ओलं झालेलं बाईकचं सीट पुसून किक मारली आणि त्यांच्या गाडीमागे निघालो.
दवाखाना ते घर - १२ किलोमीटरचं अंतर होतं. नोकरी गेल्याचा विचार, भविष्याची अनिश्चितता, घरी कसं सांगायचं, कोणाला सांगायचं, ते काय रिअॅक्ट करतील, घरच्यांना काय वाटेल, वडील आताच बरे होऊन घरी चाललेत, त्यांना कळलं तर ते काय विचार करतील, मित्रांना सांगितलं तर ते समजून घेतील की हसं करतील, पुढे काय करायचं, नोकरी मिळेल की नाही, कधी मिळेल, लेऑफ झाला म्हणून दुसऱ्या कंपनीत घेतील का असे अनेक प्रश्न तोंडावर लागणाऱ्या पावसाच्या थेंबांप्रमाणे बोचत होते.
घरी पोहचलो तसे शेजारी राहणारे भाऊबंद आणि चुलत्यांच्या घरातील माणसं वडिलांना भेटायला आलेले. मी ओले झालेले कपडे बदलून ५ मिनिटे चुलीसमोर बसलो. अंग आणि ओला झालेला मोबाईल सुकवला.
घरात आता विविध विषयांवर चर्चा सुरु होती, दवाखाना, ICU, अमूक डॉक्टर आमच्या ओळखीचा आहे, तमूक डॉक्टर खूप पैसे घेतो, बरं झालं इन्शुरन्स होता नाहीतर आजकाल दवाखाने आवाक्याबाहेर गेले आहेत, आता पोटभर जेवत जा अशा सगळ्या चर्चा सुरु होत्या.
वडील बरे होऊन घरी आले म्हणून घरात आनंदाचं वातावरण होतं. पाऊस उघडला होता, अधूनमधून झाडाच्या पानांमध्ये अडकलेला एखादा थेंब पत्र्यावर पडत होता. २-३ तास घरात कोंडलेली लहान मुलं बाहेर निघून खेळत होती, पावसामुळे खोळंबलेल्या शेतात गेलेल्या बायका गवताचे भारे घेऊन परतीच्या वाटेवर होत्या, चारा खाण्याची वेळ झाल्याने गोठ्यातून गाई हंबरत होत्या, गंगू-रंगू - आमच्या शेळ्या आणि त्यांची पिल्लंही आवाज देत होते, काळे ढग बाजूला सरुन हळूहळू कोवळं ऊन पडायला लागलं होतं, भेटायला आलेल्यांना चहा देण्याची आईची लगबग सुरु होती, वडीलांचं आजारपण आणि २-३ तास चाललेला पाऊस यामुळे थांबलेलं सगळं पुन्हा पूर्वपदावर येत होतं. मी मात्र एचआरचआरच्या थंड शब्दांनी आणि पावसामुळे भिजल्याने अजूनही गोठल्यासारखा एकटाच चुलीसमोर शांत बसलो होतो.
- वैभव सानप
दादा जिवंत असताना जे त्यांचे झाले नाहीत ते आज दादांना आठवायची नाटकं करुन किळसवाणा PR करतायत.
मेलेल्या माणसाच्या टाळुवरचं लोणी खाणारी ही मतलबी गिधाडं दादांना समजली नाहीत असं नसेल,उलट दादा यांना कायम पुरुन उरला म्हणून यांनीच बदनाम केला.
दादा,Thank You For Everything.😇