बॉलिवूडचा पहिला मराठमोळा सुपरस्टार !
अमिताभ बच्चन यांचं अँग्री यंग मॅनचं पर्व संपल्यानंतर अनेकांनी त्या प्रांतात शिरण्याचा प्रयत्न केला पण कोणाला फारसं जमलं नाही. ती गादी नव्वदच्या उत्तरार्धात कोणी यशस्वीपणे चालवली असेल तर ती नाना पाटेकर यांनी !!
बॉलिवूडमध्ये अनेक मराठी लीड अभिनेत्री झाल्या, अनेक सशक्त अभिनेतेही दिले पण “हीरो” कधी झाला नव्हता … जिथे कलाकार आपली नावं बदलून कुमार वगैरे लावत होते तिथे “नाना पाटेकर” असं अस्सल मराठमोळं नाव घेऊन एका अभिनेत्याने केवळ आणि केवळ आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर राज्य करून दाखवलं !!!
उमेदीच्या काळात बॉलिवूड मध्ये ज्येष्ठांचा भूमिका नाना यांच्या पदरी पडल्या पण मेहुल कुमार यांच्या तिरंगानं नाना पाटेकर यांना Pan India Star केलं. पंजाबी आणि मुस्लिम नायकांची अलिखित मक्तेदारी असणाऱ्या हीरो पदावर नाना पाटेकर स्वार झाले. एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या घेणारा आणि बॉक्स ऑफिसवर हमखास चालणारं खणखणीत नाणं अशी ओळख नाना यांची झाली. आपल्या डायलॉग डिलिव्हरी साठी आणि खास स्टाइल साठी ओळखले जाणारे अभिनेते राज कुमार यांच्या समोर भलेभले कलाकार उभे राहताना चार वेळा विचार करायचे. पण तिरंगा मध्ये नाना यांनी राजकुमार यांच्यापेक्षा जास्त भाव खाल्ला !! विधू विनोद चोप्रा यांच्या परिंदा मधला खलनायक अण्णा जितका गाजला तितकाच , क्रांतिवीर मधला “देख ये हिंदू का खून है ये मुसलमान का… “ डायलॉग म्हणणारा त्यांचा नायक ही देशभर भावला !
हिंदी चित्रपट सृष्टीत नाना यांची लोकप्रियता इतकी अफाट झाली होती की त्या काळात नाना पाटेकर बॉलिवूड मधले Highest paid Star म्हणून ओळखले जात!! मोठे अभिनेते नाना नायक असणाऱ्या सिनेमात दुय्यम भूमिका करायला तयार व्हायचे कारण सिनेमा नानाच्या नावावर चालणार हे निश्चित असायचं! कोहराम सारख्या सिनेमात तर खुद्द अमिताभ बच्चन देखील नाना समोर दुय्यम वाटले !!! प्रयोग करायला हा माणूस कधीच कचरला नाही … अँग्री यंग मॅन ची इमेज सेट असताना त्यांनी खामोशी द म्युजिकल मध्ये मूक बधीर बाप रंगवला! जितका रागीट नायक गाजला तितकाच त्यांचा विनोदी अभिनय सुद्धा लोकप्रिय झाला. वेलकम मधला उदय अण्णा सोशल मीडियाच्याकाळातही पॉप्युलर झाला. जबरदस्त असं कॉमिक टायमिंग नाना यांच्याकडे होतं, straight faced humour हा तर त्यांचा हातखंडा!
बॉलीवूडच्या लेखी अजिबात हीरो मटेरियल नसणाऱ्या या माणसानं अखेरपर्यंत आपल्या अभिनय शैलीनं अधिराज्य गाजवलं…
#NanaPatekar #Bollywood
Jeffrey Archer unlocked the door to English fiction for me and redefined what a story could do….
Farewell to the master of the ultimate twist.
RIP #JeffreyArcher
टू द पॉईंट विथ कमलेश सुतार
विलीनीकणाच्या चर्चा, रोहित पवारांची अस्वस्थता, रेवतीचं लग्न आणि अजितदादांची आठवण
NCP SP च्या खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष मुलाखत
आज रात्री 8.52 वाजता
फक्त झी 24 तासवर
@kamleshsutar
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची काही हिंदी न्यूज चॅनेल्सकडून बदनामी केली जात असताना, Zee 24 Taas पहिल्या दिवसापासून या आंदोलनाचं सातत्याने ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आवाज थेट जनतेपर्यंत पोहोचवत आहे.
त्याचबरोबर Mumbai Tak देखील विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधून,आंदोलनामागचं वास्तव काय आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने जनतेसमोर मांडत आहे.
लोकशाहीत पत्रकारितेचं खरं काम म्हणजे सत्तेची बाजू घेणं नव्हे तर जनतेचा आवाज निर्भीडपणे मांडणं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि सत्य जनतेसमोर आणण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेबद्दल Zee 24 Taas आणि Mumbai Tak यांचे मनापासून आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन!
अशीच निर्भीड,निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता सुरू राहो हीच शुभेच्छा!
@zee24taasnews@mumbaitak@AbhijitKaran25@kamleshsutar
Sachin Ahir’s move from Shivsena UBT to Shinde is a massive red flag for Aaditya Thackeray. Back in 2019, Ahir was strategically brought in—and sitting MLA Sunil Shinde was adjusted in the upper house —just to clear a safe path for Aaditya. Losing Ahir now isn’t just another defection; it directly jeopardizes Aaditya’s 2029 prospects.
महाराष्ट्र गौरव पुरस्कार!
झी २४ तास या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' सोहळ्याला उपस्थित राहिलो. यावेळी सर्वांशी संवाद साधून, आपल्या उत्तुंग कार्याने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला मा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी, आमदार अमित साटम जी, राष्ट्रवादी (श.प.) गटाचे नेते हर्षवर्धन पाटील जी, झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
@zee24taasnews@PratapSarnaik@AmeetSatam@Harshvardhanji@kamleshsutar
#Zee24taas #Shivsena #SiddheshKadam
🔸CM Devendra Fadnavis at 'Zee 24 Taas Maharashtra Gaurav Puraskar 2026'. Zee 24 Taas Editor Kamlesh Sutar interviewed CM Fadnavis on the occasion.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी झी-24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर झी-24 तास के संपादक कमलेश सुतार इन्होंने मुख्यमंत्री फडणवीस इनका इंटरव्यू लिया।
🕣 8.30pm | 26-5-2026📍Mumbai | रा. ८.३० वा. | २६-५-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis@kamleshsutar@zee24taasnews
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraGaurav
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण केले.
🔸झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार
🏆 रितेश देशमुख - अभिनेता
🔸झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार:
🏆गिरीजा ओक-गोडबोले - कला
🏆सचिन कुमावत - लोकसंगीत
🏆सिद्धेश लोकरे - शिक्षण क्षेत्र
🏆जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था (संस्थापक - निलेश सांबरे आणि भावनादेवी सांबरे)
🔸 महाराष्ट्र युवा उत्कृष्टता पुरस्कार
🏆 जश विरा - (उद्योजकता आणि समाजशास्त्र क्षेत्र)
🔸 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पुरस्कारार्थी :
🏆मीनल पटवर्धन - इन्वेड ॲग्रो लिमिटेड
🏆नितीन लुंकड - नितीन ॲग्रो प्रोड्कट्स
🏆राहुल बाकरे - उर्ध्वम एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि.
🏆रमेश चौधरी - एमआर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि.
🏆डॉ. स्वप्नील धर्माधिकारी - धर्माधिकारी आयुर्वेद क्लिनिक
@Dev_Fadnavis@zee24taasnews@kamleshsutar@Riteishd@Girijaa_oak@sidiously_@jashvira9
#Maharashtra #MaharashtraGaurav #Zee24Taas #AwardCeremony