योगाने जोडले जग...
योग निरोगी जीवनाचा मंत्र...
योग म्हणजे संतुलित जीवन...
योग हीच जीवनशैली...
शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल साधत, प्रत्येक दिवस योगमय बनवूया...
आंतरराष्ट्रीय योग दिन
#InternationalYogaDay#YogaForLife#HealthyLifestyle#YogaDay#ncp
आज जागतिक योग दिन!
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी योग ही एक प्रभावी साधना आहे. योग केल्यानं एकाग्रता वाढते, पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी, एकरूप होण्यासाठी देखील योग करणं हा योग्य मार्ग आहे. चला, योग करू, आरोग्य सुदृढ बनवू!
#InternationalYogaDay
माननीय मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis जी आपण मागच्या अधिवेशनात स्व.अजित दादांच्या स्मारकाची घोषणा आपण केली होती.
स्मारक नेमकं कधी होणार ?
कुठे होणार ?
कधीपर्यंत होणार ?
याची माहिती या अधिवेशनात द्यावे ही विनंती
आपली आणि दादांची मैत्री सर्वश्रुत होती.स्व.दादांचे स्मारक फक्त घोषणा न राहता ते लवकर व्हावे ही दादा प्रेमी म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे.
भारताच्या आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
अत्यंत साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचलेल्या मा. द्रौपदी मुर्मू जी यांचा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श आहे. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी बजावलेली जबाबदारी आणि संविधानिक मूल्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि निरंतर यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते. देशसेवेचं त्यांचं कार्य असंच अविरत सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@rashtrapatibhvn
विदर्भाच्या प्रश्नांना राज्याच्या केंद्रस्थानी आणणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचं दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शिक्षक चळवळीला बळ देण्यापासून ते विदर्भाच्या विकासासाठी सातत्यानं त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली!
केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांचे वडील श्री. किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन झाले.
या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.
१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात जुलमी ब्रिटिश राजवटीविरोधात सशस्त्र लढा उभारणाऱ्या महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीदिनी भावपूर्ण आदरांजली!
#झाशीची_राणी_लक्ष्मीबाई#RaniLakshmibai
आपल्या अष्टपैलू अभिनयाने आणि बहारदार गायकीने सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ गायक-नट प्रसाद सावकार यांच्या निधनाने मराठी कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे.
प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
स्व. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर जपलेल्या विकासाभिमुख, जनसामान्य केंद्रित आणि कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत, तसेच राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि युवा नेते मा. खासदार श्री. पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वास व्यक्त करत, माजी खासदार स्व: दत्ता मेघे यांचे चिरंजीव युवा नेते श्री. अर्जुन मेघे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक यांनी श्री. मेघे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री. अर्जुन मेघे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी बळकट होणार असून, स्व.अजितदादा पवार यांनी रुजविलेल्या विकास, जनसेवा आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या विचारांना नवी ऊर्जा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात श्री. मेघे यांचे मनःपूर्वक स्वागत आणि भावी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
या वेळी मा. आ. श्री. संजय खोडके, राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्री.धीरज शर्मा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री. उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते श्री. सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस श्री.लतिफ तांबोळी, युवक विभागीय अध्यक्ष श्री. निखिल ठाकरे, युवक प्रदेश सरचिटणीस श्री. अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात रुजवणाऱ्या, शौर्य, दूरदृष्टी आणि संस्कारांचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!
त्यांचा आदर्श प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी राहील.
#RajmataJijau#Punyatithi#राजमाताजिजाऊ#जिजाऊ
“तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने,
प्रकाशात न्हाती मने ही प्रवाही l
तुला वंदिताना सुखी अंग अंग l
खरा धर्म आता शिवचाच पाही ll
राजमाता जिजाऊ साहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा 🙏#जय जिजाऊ