"हाताचा पंजा"
मार्च 1977ला जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले होते.आणीबाणीमुळे इंदिराजींवर संपुर्ण देशातील जनतेची नाराजी ओढावलेली होती.परंतु कुठल्याही अडचणीच्या प्रसंगातुन मार्ग काढणे इंदीराजींचा स्वभावगुण होता.पुढे जुलै 1977 ला बिहारच्या बेलची या गावात जमिनदारांनी भूमिहीन(1/1)
"भुकेला कुत्रा कधीच इमानदार नसतो...!!!"
हे वाक्य काही लोकांना कठोर वाटेल. पण प्रत्येक कठोर वाक्य हे अपमान नसतं. काही वेळा ते आरशासारखं असतं.आरसा कोणाचाही अपमान करत नाही. तो फक्त वास्तव दाखवतो.
इथे 'भूक' म्हणजे फक्त पोटाची भूक नाही. ती आहे पैशाची भूक, पदाची भूक, सत्तेची भूक, प्रसिद्धीची भूक, मान-सन्मानाची भूक आणि स्वतःच्या फायद्याची भूक.
ज्याला या भुका लागतात, त्याची निष्ठा बाजारात विकली जाते.
जगात दोन प्रकारची माणसं असतात.
एक – जी मूल्यांसाठी जगतात.
दुसरी – जी फायद्यासाठी जगतात.
पहिल्या प्रकारची माणसं संकटातही साथ सोडत नाहीत.
दुसऱ्या प्रकारची माणसं संकट दिसताच, जास्त फायदा दिसताच दिशा बदलतात.
कारण त्यांना सत्य नको असतं...
त्यांना सुरक्षितता हवी असते.
त्यांना तत्त्व नको असतं...
त्यांना फायदा हवा असतो.
चला, एक गोष्ट सांगतो.
एका गावात एक कुत्रा होता. त्याचा मालक गरीब होता. स्वतः अर्धी भाकरी खायचा, अर्धी त्या कुत्र्याला द्यायचा.
एक दिवस गावात श्रीमंत व्यापारी आला. त्याने कुत्र्यासमोर तुपात तळलेली पोळी ठेवली.
कुत्रा शेपूट हलवत व्यापाऱ्याकडे गेला.
दुसऱ्या दिवशी दुसरा व्यापारी आला.
तो त्याच्याकडे गेला.
तिसऱ्या दिवशी तिसरा आला.
तो पुन्हा तिकडे गेला.
"तो कुत्रा वाईट न्हवता... पण त्याची भूक त्याच्या निष्ठेपेक्षा मोठी होती."
आज अनेक नाती तुटत आहेत.
प्रेम कमी झालं म्हणून नाही,
तर स्वार्थ मोठा झाला म्हणून.
मुलं आईवडिलांना सोडतात.
भाऊ भावाला सोडतो.
मित्र मित्राला विसरतो.
शिष्य गुरूला नाकारतो.
कर्मचारी कंपनी बदलतो.
व्यावसायिक भागीदार बदलतात.
लोकं विचार बदलत नाहीत,
फक्त फायदा दिसला की बाजू बदलतात.
मोठ-मोठे संत सांगून गेले,
"लोभ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे."
लोभाला शेवट नसतो.
दहा मिळाले की शंभर हवे.
शंभर मिळाले की हजार हवे.
हजार मिळाले की लाख हवे.
आणि एक दिवस...
माणूस स्वतःलाच विकून टाकतो.
आज विश्वासाची किंमत कमी झाली आहे.
मोठ-मोठे करार लिहून होतात,
पण शब्दावर व्यवहार होत नाहीत.
हात मिळवतात,
पण मनं जोडली जात नाहीत.
हसू असतं,
पण आपलेपणा नसतो.
लोकं बोलतात...
"व्यवहार आहे."
व्यवहार असू द्या हो...
पण त्यासाठी चरित्र विकू नका.
कारण पैसा परत मिळतो.
पद परत मिळू शकतं.
सत्ता बदलत राहते.
पण विश्वास एकदा का गेला...
तर तो पुन्हा जन्माला येत नाही.
इतिहासात मोठी नावं तीच झाली...
ज्यांनी संकटातही निष्ठा सोडली नाही.
लोकांना संपत्ती आठवत नाही.
लोकांना चरित्र आठवतं.
आज समाजात एक नवीन रोग पसरतो आहे.
"संधीसाधूपणा."
जिथे फायदा,
तिकडे मैत्री.
जिथे पैसा,
तिकडे विचार.
जिथे पद,
तिकडे निष्ठा.
अशा माणसांना दिशा नसते.
फक्त संधी असते.
मित्रांनो,
नदीचा प्रवाह बदलला तरी नदी नदीच राहते.
पण माणूस जर रोज प्रवाह बदलत असेल,
तर त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार?
आज मुलं मोठ्यांकडून काय शिकत आहेत?
"जिंकायचं असेल तर काहीही करा."
मी शिकवतो,
हरलात तरी चालेल,
पण स्वतःला विकू नका.
मोठं होण्यासाठी उंची वाढवू नका, चारित्र्य वाढवा.
कारण,
ज्याची किंमत पैशाने ठरते,
तो माणूस श्रीमंत असू शकतो.
पण ज्याची किंमत विश्वासाने ठरते,
तोच खरा मोठा असतो.
लक्षात ठेवा...
भूक वाईट नाही.
पण,
भूक जर विवेक खाऊ लागली,
तर माणूस "माणूस" उरत नाही.
फक्त व्यवहार उरतो.
आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा.
मी माझ्या शब्दाला इमानदार आहे का?
मी माझ्या कुटुंबाशी इमानदार आहे का?
मी माझ्या कामाशी इमानदार आहे का?
मी माझ्या अंतरात्म्याशी इमानदार आहे का?
जर उत्तर "हो" असेल...
तर तुम्ही श्रीमंत आहात.
जरी तुमच्या खिशात एक रुपया नसला तरी.
पोटाची भूक दोन भाकरीने संपते.
पैशाची भूक, बँकेत भरभरून असलं, तरी संपत नाही.
पदाची भूक खुर्चीवर बसल्यानंतर अजून वाढते.
सत्तेची भूक सत्ता मिळाल्यावर अधिक लागते.
प्रसिद्धीची भूक टाळ्या मिळाल्यावर आणखी वाढते.
म्हणूनच...
भूक वाईट नाही...
भुकेचं गुलाम होणं वाईट आहे.
भूक प्रत्येकालाच लागते.
पण ज्याने भुकेवर नियंत्रण ठेवलं,
तो माणूस बनतो.
आणि ज्याच्यावर भुकेने नियंत्रण मिळवलं,
तो आयुष्यभर दुसऱ्याच्या ताटाकडे पाहत राहतो.
म्हणून...
स्वार्थापेक्षा स्वाभिमान मोठा ठेवा.
फायद्यापेक्षा विश्वास मोठा ठेवा.
संधीपेक्षा निष्ठा मोठी ठेवा.
आणि लक्षात ठेवा...
"भुकेला कुत्रा कधीच इमानदार नसतो; पण विवेकाने जगणारा माणूस परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःची निष्ठा विकत नाही...!!!"
निसर्गाच्या कुशीत गेलं की कळतं, सुख हे बाजारात विकत मिळत नाही.
गार वारा, पाखरांची हाक आणि मातीचा सुगंध... एवढंच पुरेसं असतं मन श्रीमंत व्हायला. गावाकडं निसर्ग रोज हाच धडा शिकवतो "कमी असलं तरी समाधान भरपूर असू शकतं." 🍃🌿
#निसर्ग
पहिला पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या काळजात पडलेला आशेचा पहिला थेंब.
आभाळ भरून येतं, मातीचा गंध दरवळतो आणि शिवार नव्या स्वप्नांची पेरणी करायला सज्ज होतं. गावाकडच्या माणसाचं सुख फार मोठं नसतं, पावसाच्या चार सरी, उगवणारं बीज आणि हिरवं होत जाणारं रान एवढंच त्याचं वैभव असतं. 🚜🌱
"निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं शहाणपण ठेवा."
हे वाक्य दिसायला तसं खूप छोटं आहे, पण त्यात संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे.
भगवान श्रीकृष्णाकडे अपार शक्ती होती. त्यांना हवं असतं, तर ते प्रत्येक अपमानाला उत्तर देऊ शकले असते.
पण त्यांनी प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली नाही.
कारण त्यांना माहीत होतं की काही लोकांना उत्तर दिलं, तर त्यांची किंमत वाढते. काही लोकं तुमच्या वेळेसाठी पात्र नसतात.
पूर्वी गावात एखादा मूर्ख माणूस असेल, तर त्याला फक्त ते गावच ओळखायचं.
आज सोशल मीडियामुळे संपूर्ण जग त्याला ओळखतं.
कुणी काहीही लिहितो. कुणी काहीही बोलतो. कुणी अफवा पसरवतो आणि अनेक सुशिक्षित लोकं त्याला उत्तर देण्यात आपला अमूल्य वेळ घालवतात.
आज सोशल मीडियावर अनेक ट्रोल गँग्स दिसतात. त्यांचं उद्दिष्ट सत्य शोधणं नसतं.
त्यांचं उद्दिष्ट असतं:
तुम्हाला चिडवणं
तुमचं लक्ष विचलित करणं
तुमचा वेळ वाया घालवणं
तुम्हाला भावनिक बनवणं.
ते इतरांच्या यशामुळे अस्वस्थ असतात.
तुम्ही शांत असाल, तर त्यांना त्रास होतो.
तुम्ही प्रगती करत असाल, तर त्यांना जास्त त्रास होतो.
म्हणून ते प्रतिक्रिया मिळवण्यासाठी काहीही बोलतात.
एका उद्योगपतीने मोठा व्यवसाय उभा केला.
त्याच्यावर सतत टीका होत होती.
एका पत्रकाराने विचारलं,
"तुम्ही प्रत्येक टीकेला उत्तर का देत नाही?"
त्याने उत्तर दिले,
"जर मी प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यामागे धावू लागलो तर माझ्या गंतव्यस्थानी कधीच पोहोचणार नाही."
गरुड जेव्हा उंच उडतो, तेव्हा काही कावळे त्याला त्रास देतात.
ते त्याच्या पाठीवर बसतात. त्याला टोचतात.
पण गरुड त्यांच्याशी भांडत बसत नाही.
तो आणखी उंच उडतो.
ज्या उंचीवर ऑक्सिजन कमी होतो, तिथे कावळे आपोआप खाली पडतात.
जीवनातही असंच असतं.
काही लोकांशी वाद घालण्याऐवजी स्वतःची उंची वाढवा.
प्रत्येक टीका महत्त्वाची नसते.
डॉक्टर ऑपरेशन करत असताना, बाहेर बसलेल्या लोकांच्या मतांवर निर्णय घेत नाही.
कारण त्याला त्या विषयाचे ज्ञान असतं.
तसंच,
तुमच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला नसतो.
ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिलेला नाही, त्यांच्या मतांचं ओझं का वाहायचं?
एकदा भगवान बुद्ध एका गावात गेले.
लोकांनी त्यांचा अपमान केला.
शिवीगाळ केली.
बुद्ध शांत राहिले.
शिष्यांनी विचारले,
"गुरुजी, तुम्ही उत्तर का दिले नाही?"
बुद्ध म्हणाले,
"कोणी भेटवस्तू आणली आणि मी स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहते?"
शिष्य म्हणाले, "ज्याने आणली त्याच्याकडे."
बुद्ध म्हणाले,
"तसेच त्यांचा राग-अपमान-शिवीगाळ मी स्वीकारला नाही."
आज अनेक लोकं सकाळी उठल्यावर देवाचे नाव घेण्याऐवजी कमेंट सेक्शन तपासतात.
कोण काय बोललं? कोणी लाईक केलं? कोणी कोणाला ट्रोल केलं?
हळूहळू दुसऱ्यांच्या मतांचे गुलाम बनतात.
लक्षात ठेवा,
तुमचं मूल्य लाईक्स, फॉलोअर्स किंवा कमेंट्स ठरवत नाहीत.
अनेकांना वाटते की शांत राहणे म्हणजे हार मानणं.
चूक.
कधी कधी शांत राहण्यासाठी जास्त ताकद लागते. कारण प्रतिक्रिया देणं सोपे असते.
संयम ठेवणं कठीण असतं.
जंगलाचा राजा सिंह असतो.
तो प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत नाही.
जर तो तसे करू लागला, तर त्याचं राजेपण संपेल.
आपल्या जीवनातही असंच आहे.
प्रत्येक वाद, प्रत्येक आरोप, प्रत्येक अफवा, प्रत्येक ट्रोल यांना उत्तर देणं आवश्यक नसतं.
आपल्याकडे मर्यादित वेळ आहे.
मर्यादित ऊर्जा आहे.
प्रश्न असा आहे की ती ऊर्जा आपण कुठे खर्च करतो?
स्वप्नांवर?
कुटुंबावर?
शिक्षणावर?
समाजकारणावर?
की
ट्रोल्सना उत्तर देण्यात?
निरर्थक वादात?
अफवांमध्ये?
एखादा मुलगा गरीब परिस्थितीतही अभ्यास करतो.
लोकं त्याच्यावर हसतात.
तो वाद घालत नाही.
तो अभ्यास करतो.
काही वर्षांनी अधिकारी बनतो.
तेव्हा त्याला काही बोलण्याची गरज राहत नाही.
त्याचं यशच लोकांना उत्तर देतं.
जीवनात तुम्हाला तीन प्रकारचे लोक भेटतील.
पहिला प्रकार: तुम्हाला खाली खेचणारे.
दुसरा प्रकार: तुमच्यासोबत चालणारे.
तिसरा प्रकार: तुम्हाला वर उचलणारे.
पहिल्या प्रकाराला दुर्लक्ष करा. दुसऱ्यांचा आदर करा. तिसऱ्यांचे ऋण माना.
सर्वात मोठे स्वातंत्र्य म्हणजे
"लोक काय म्हणतील" यापासून मुक्त होणे.
ज्या दिवशी तुम्ही हे साध्य कराल, त्या दिवशी तुमचे आयुष्य बदलून जाईल.
जीवन खूप मौल्यवान आहे.
ते प्रत्येक ट्रोल, प्रत्येक अफवा, प्रत्येक निरर्थक वाद यांच्यावर खर्च करण्यासाठी नाही.
लक्षात ठेवा:
काही लोक तुमचे लक्ष वळवून घेण्यासाठी तुम्हाला चिडवतात.
तुमची प्रतिक्रिया हेच त्यांचं बक्षीस असतं. म्हणून कधी कधी सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे, उत्तरच न देणं.
गरुडासारखं उंच उडा. सिंहासारखा आत्मविश्वास ठेवा. बुद्धांसारखे शांत राहा.
प्रत्येक आवाजाला उत्तर देणं आवश्यक नसतं, पण प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं आवश्यक असतं."
ज्या व्यवस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं रक्षण करायचं, तर तिथेच भ्रष्टाचाराने उघडपणे सिंहासन मांडलं आहे.. विद्यार्थी घामाने भविष्य लिहितात, आणि काही भ्रष्ट हात पैशाच्या शाईने त्यावर काळे डाग उमटवतात ही केवळ लाज नाही, तर व्यवस्थेच्या विवेकाला लागलेला कलंक आहे!
#NEET
लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी सर्वप्रथन त्यांना गोष्टीची पुस्तके वाचायला द्या, (चित्ररूप जातक कथा, पंचतंत्र, सिंहासन बत्तीशी, अलीबाबा चाळीस चोर,अरबच्या रात्र कथा, रामायण, महाभारतातील गोष्टीरूप इतिहास इ.) एकदा त्यांना वाचनाची गोडी लागली कि मग त्यांना महापुरुषांच्या
डॉ. श्रीराम लागूंच्या एका भाषणातील अगदी दोन मिनिटांचा हा अंश. आवर्जून ऐका. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय, यावर अगदी सोप्या शब्दात सांगितलंय. आजच्या महाराष्ट्राला या शब्दांची प्रचंड गरज आहे.
“मला सगळं कळतं” म्हणालात की प्रगतीची घसरण ठरलेली..शिकत राहिलात तर वाट आपोआप रुंदावते. उत्साहाची उसळी दोन दिवसांची असते, पण ध्येयासाठी राबणं हाच खरा जगण्याचा गाभा.!❤️
#जगणं
दादा गेल्याने काय हुकलं..? हे PMC-PCMC आणि त्याहीपलीकडे बारामतीला कळायला दोन पंचवार्षिक जाव्या लागतील.. आज 'आबा असते तर मी अमुक ठिकाणी असतो' अशी सांगणारी फौज आमच्या मतदारसंघात आहे..ती दशकभरानंतर तुमच्याकडे असेल.
एक नेतृत्व उभं राहताना सोबत अशी इकोसिस्टम घेऊन उभं राहतं..❤️
१/४
अजूनही काहीतरी गमावण्याची भीती इथल्या सामान्य माणसात आहे.. पण एक वेळ अशी येईल, ज्यावेळी गमावण्यासारखं काहीच नसेल.. तेंव्हा कसली आलीय भीती..? जगभरात क्रांत्यांचा इतिहास हा 'भीती' या एका शब्दाच्या आजूबाजूला खेळत राहिला आहे..❤️