रिसेंटली माझ्या एका अभ्यासाचा भाग म्हणून जॅसन हिकलचं 'द डिव्हाईड' हे पुस्तक वाचलं. जगातले गरीब देश वर्षानुवर्षे गरिबीशीच का लढतायेत, याचं बऱ्यापैकी उत्तर आहे यात. 'डेव्हलपमेंट' हा हेन्री ट्रुमननं गाजावाजा करत आणलेला शब्द गरीब देशांसाठी कसा ट्रॅप बनला, हे वाचणं इंटरेस्टिंग आहे.
जे शिवसेना, राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्षासोबत झालं, ते आता तृणमूलसोबत होतंय. पक्ष नव्यानं उभे राहतीलही, पण धोकादायक गोष्ट अशी आहे की, संविधानाला बांधील असलेल्या संस्था अशा तोडफोडींसोबत उभ्या राहतायत. आणि याहून धोकादायक म्हणजे, या सगळ्याचं नॉर्मलायझेशन होतंय. #Politics
सोशल मीडियाचा किती विधायक वापर होऊ शकतो, हे अनिल साबळे यांच्या कामाकडे पाहून कळून येईल. सरांचं काम बीबीसी मराठीवर डॉक्युमेंट होऊ शकलं, याचं समाधान आहे. थँक्स, @AshayYedge आणि @ganeshapol यासाठी.
आमच्या रोहा तालुक्यातील कातकरी समाजातील सपना वाघमारे लंडनला शिक्षणासाठी जाणार, ही गोष्ट एरव्ही किंवा इतरत्र फारशी दखलपात्र नसेलही, पण जो समाज आजही अत्यंत बेसिक गोष्टींसाठी झगडतोय, तिथं सपनाची भरारी फार मोठी गोष्ट आहे. थँक्स, @alpeshreport या स्टोरीसाठी.
New wisdom from the NCP (SP) spokesperson.”Preventing toxic liquor tragedies is the responsibility of social activists."
So what exactly are political parties, ministers, the government, the police, the Excise Department, and the administration responsible for?
Collecting taxes and outsourcing accountability?
@NCPspeaks@sule_supriya@Jayant_R_Patil@rohitrrpatilncp
#ToxicLiquor #Accountability #NCP #Pune
मला कल्पना नाही, एवढ्यात राष्ट्रीय म्हणवणाऱ्या कुठल्या माध्यमांनी मणिपूरवर इतकं सखोल रिपोर्टिंग केलंय का ते. अर्थात, नॉर्थ ईस्टमधील स्थानिक माध्यमं करतायेतच. बीबीसीचे रघुवेंद्र राव यांचा हा रिपोर्ट आवर्जून पाहा. @raghvendra_rao
https://t.co/FAMATs1FST
आमची बीबीसी मराठीमधील सहकारी दिपाली जगताप हिनं केलेला हा रिपोर्ट नक्की पाहा. आपण चौथी-पाचवी मुंबई वगैरे करण्याच्या एकीकडे गोष्टी करत असताना, मुंबईच्या सीमेवर काय स्थिती आहे पाहा. वेळ काढून रिपोर्ट पाहा. @jdipali
https://t.co/qzUTwtnnCv
तेलंगणा सरकारकडून उच्च शिक्षणातील जातीय भेदभाव रोखण्यासाठी प्रस्तावित 'रोहित वेमुला कायदा' करण्यासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीत विशेष आमंत्रित सदस्य म्हणून अॅड. दिशा वाडेकर यांची निवड. खूप अभिनंदन, दिशा. @WadekarDisha
काँग्रेससोबत भविष्यात जाऊ शकतील असे सगळे छोटे घटक शिंदे आता हातातली सत्तेचा वापर करून आपल्याशी जोडत आहेत. ही त्यांची २०२९ ची तयारी आहे. भाजपला हे कळत नसेल असे नाही.
फक्त योग्य वेळी शिंदेने कळले हे सांगितले जाईल!
‘काजळकाठ’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, यामिनी. 'पहिला कवितासंग्रह' असं मुद्दाम म्हटलंय, कारण पुढेही तुझं लेखन प्रकाशित होत राहो. हा संग्रह नक्की मिळवून वाचेन. तुझ्या जितक्या कविता मी वाचल्यात-ऐकल्यात, त्या सगळ्याच अर्थपूर्ण वाटल्यात. @poetyamini