#अविस्मरणीय_क्षण
उमेदवारी अर्ज भरतांना उसळलेली गर्दी पाहून लोकशाही - संविधान रक्षणासाठी जनता हाती "मशाल" घेऊन तयार आहे याची साक्ष देत होती. "लोकसभा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच निवडणूक लढतांना हि विराट गर्दी सुखद वाटणारी होतीच, पण त्यांचे प्रेम, जिव्हाळा भावनिक करणारा होता. मुंबईच्या वाढत्या तापमानात उपस्थित राहिलेला जनसागर विरोधकांच्या गोटात गर्मी वाढवणारा आहे. सहकारी व मतदारांनी हि निवडणूक आपल्या हातात घेतली असून विजयाची क्रांतीची "मशाल" पेटवून विकासाला नवा मार्ग द्यायला तयार आहे. सर्वांच्या साक्षीने अर्ज भरला असून सर्वांच्या साक्षीने आभाराचे "हात" जोडून विजयाची "तुतारी" वाजवून "झाडू" ने विरोधक साफ करून गुलाल उधळण करत "मशाल" घेऊन एकजुटीने विजयोत्सव साजरा करू हा विश्वास आहे.
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक, अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.
#ShivsenaUBT #uddhavthackeray #aadityathackeray #LokSabhaElections2024 #NorthWestMumbai
विनाशकारी प्रकल्पापासून कोकणाला मुक्त करायचं आणि कोकणाचं समृद्ध वैभव जपायचं, हेच आता मशालीचं ध्येय!
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत ह्यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. कोकणाचा विकास साधायचा असेल, तर निष्ठावंत आणि कोकणचा हित चिंतणारा खासदार हवा आणि त्यासाठी विनाश मोचक विनायक राऊत हातात मशाल घेऊन उभे आहेत; हा विश्वास ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी व्यक्त केला.
सभेला सौ. रश्मी वहिनी ठाकरे, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई तसेच तेजस ठाकरे उपस्थित होते.
इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून भाजपने मोठमोठ्या कंपन्यांना हाताशी धरून पक्ष निधी उभा केला. त्याबदल्यात त्यांना कोट्यावधींची कामंही मिळवून दिली. जेव्हा हा डेटा लोकांसमोर आणण्याची वेळ आली, तेव्हा भाजपने एसबीआयलादेखील हाताशी धरून हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला. देश कर्जाच्या खाईत लोटला जात असताना पक्षहितासाठी, स्वहितासाठी सुरू असलेल्या भाजपच्या ह्या खेळाचा पर्दाफाश व्हायलाच हवा.
देशाला एकसंध ठेवणारं 'संविधान'
'आम्ही भारताचे लोक...‘ हे ब्रीद संविधानाचा पंचप्राण आणि देशातलं ’सार्वभौमत्व‘ हाच आपला अभिमान!
ह्याच अभिमानासाठी आता लढायचंय, चिरकाल ’प्रजासत्ताक‘ रहायचंय!
भारतीय ’प्रजासत्ताक’ चिरायू होवो!
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🇮🇳
देवेंद्रजी,
आपण ज्या कालखंडाची आकडेवारी इथे दिली आहे, त्या कालखंडात १५ महिने उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होते, हे पण लक्षात असू द्या.
कोव्हिड महामारीने उद्भवलेल्या अडचणींवर मात करून मविआच्या काळात (२०२१-२२ साली) १५,४३९ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक राज्यात आली. कोव्हिड नसताना तुमची गाडी घसरली, आणि १४,१०६ मिलियन डॉलर्सवर आली, असेच हे आकडे बोलतात.
महाराष्ट्रात आलेल्या गत तीन वर्षातील परकीय गुंतवणुकीतील सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडीच्या काळातील आहे.
दुसऱ्याच्या श्रेयावर आपले नाव लिहिणे ही भाजपची जुनीच सवय आहे म्हणा! मग ते राम मंदिर असो वा महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक!
@Dev_Fadnavis
A must read for every Indian. One needs to know how our country is sliding towards dictatorship.
This current regime will take away your rights, freedoms and constitutional guarantees.
This isn’t about government vs opposition, this is about our country, our democracy, our constitution and our freedom in danger.
This goes beyond any other issue.
Will we soon be known as the world’s largest dictatorship?
https://t.co/mnbyPzJypQ
दादर येथील सावंतवाडी संस्थान सभागृह येथे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षातर्फे आयोजित मुंबई व उपनगरांतील शिवसैनिकांचे संमेलन पार पडले. उत्साहात पार पडलेल्या ह्या संमेलनात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
This afternoon, I visited the Delisle Road Bridge, along with MLCs @misunilshinde ji and @AhirsachinAhir ji, and @imsnehalambekar ji to push for the other side of the bridge to start. @mybmc has suggested that it should be ready by 10th November.
We also discussed a pathway on the bridge itself, along with the proposed one outside the road.
सहा दशकांची अभेद्य परंपरा, आमचा दसरा मेळावा!
ज्या दिवसाची प्रत्येक शिवसैनिक आतुरतेने वाट पाहतो तो ‘कुटुंबसोहळा’ आज त्याच उत्साहात, जल्लोषात आपल्या शिवतीर्थावर साजरा झाला. प्रत्येक शिवसैनिकाची निष्ठा, एकजूट हिच संघटनेची ताकद आहे हे पुन्हा एकदा मायबाप जनतेने दाखवून दिले. कुणी कितीही आड आलं तरी महाराष्ट्रात ‘दसरा मेळावा एकच’ हिच भूमिका घेऊन प्रत्येक शिवसैनिक आला आणि विचारांचं सोनं लुटलं. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी पक्षाची भविष्यातील भूमिका मांडत, धगधगत्या विचारांनी उपस्थितांची मने जिंकली.
‘जाणीव‘ ट्रस्टच्या माध्यमातून आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत जी ह्यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित ’माझा बाप्पा‘ घरगुती गणेश दर्शन स्पर्धा २०२३ ह्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल श्री शिवाजी मंदिर, दादर येथे पार पडला. ह्या समारंभास उपस्थित राहून विजेत्या स्पर्धकांचा गौरव केला.
गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि सामाजिक भान जपणारे देखावे सादर करून जगभरातील स्पर्धक ह्या स्पर्धेत सहभागी झाले, ह्या गोष्टीचं विशेष कौतुक आहे!
"बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!" - घटनाबाह्य मुख्यमंत्री
ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता?
खरतर हीच ती गद्दार वृत्ती!
गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय.
ह्या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का?
तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार???
दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय!
नगरमधील युवा नेतृत्व साजन पाचपुते ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.