कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आज पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभापती मा. श्री. विशाल शिराळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत जनहितार्थ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
बैठकीतील ठळक घडामोडी:
✅ सायबरटेक कंपनीवर कारवाई: जीआयएस मॅपिंगचे काम अपूर्ण ठेवून १.३० कोटी लाटणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश.
✅ बोअरवेल बिलिंग: नागरिकांच्या पाण्याचे बिल मंडळांवर टाकण्याचा अन्यायकारक प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर.
✅ सुरक्षा: शहरात 'फायर ऑडिट' मोहीम राबवून हॉटेल्सची सुरक्षा तपासणार.
✅ विकासकामे: नालेसफाई, परवाना विभागाचे विकेंद्रीकरण आणि अमृत-२ कामांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाला कडक ताकीद.
लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. कोल्हापूरकरांच्या हितासाठी प्रशासन आता किती गतिमान होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!
#KMCKolhapur #KolhapurNews #KolhapurMunicipalCorporation #PublicInterest #SmartCityKolhapur
आज ५ जून २०२६ रोजी 'जागतिक पर्यावरण दिना'चे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. आपल्या निसर्गाचे रक्षण करणे आणि येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा-पाणी मिळवून देणे या उद्देशाने प्रशासनाने थेट कृतीवर भर दिला आहे.
कसबा बावडा येथील रेणुका मंदिराच्या मागील शंभरफुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना महापालिका आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांच्या शुभहस्ते करंज, बकुळ, महोगनी, कदंब आणि कडुलिंब यांसारख्या २० अत्यंत महत्त्वाच्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. निसर्ग वाढीच्या आधुनिक पद्धतीचा वापर करत, अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा दरेकर यांच्या हस्ते योग्य अशा पाणथळ ठिकाणी 'सीड बॉल्स' फेकण्यात आले. शाहू उद्यान (रंकाळा तलाव परिसर) आणि कसबा बावडा येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या आवारात विविध जातींची झाडे लावण्यात आली. तसेच रेड्याची टक्कर येथील वि. स. खांडेकर शाळा परिसरात सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण झाले. महिला बचत गटांच्या माध्यमातून टेंबलाई विक्रमनगर परिसर येथे ४५ देशी प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करून महिलांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. 'वृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेच्या' वतीने राजेंद्रनगर पाणी टाकी परिसरामध्ये तब्बल १०० देशी वृक्षांचे यशस्वी रोपण करण्यात आले.
झाडे केवळ लावणे नव्हे, तर ती जगवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कोल्हापूरला अधिक सुंदर आणि हरित बनवण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, हेच आजच्या दिवसाचे खरे आवाहन!
याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, नगरसेवक विनायक कारंडे, नगरसेविका सौ. स्वाती यवलुजे, सौ. शुभांगी पाटील, सौ. अर्चना बिरांजे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहायक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, उद्यान विभागाचे सर्व कर्मचारी, महिला बचत गटांचे सदस्य आणि वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#WorldEnvironmentDay #EnvironmentDay2026 #GreenKolhapur #KMCKolhapur #TreePlantation
कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मा. श्री. विशाल शिराळे यांनी आज महापालिकेतील आपल्या मुख्य कार्यालयात आमदार मा. श्री. अमल महाडीक यांच्या शुभहस्ते फित कापून अत्यंत थाटामाटात प्रवेश केला आणि आपल्या कामकाजाचा अधिकृत श्रीगणेशा केला.
या सोहळ्याप्रसंगी महापालिका आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड आणि सभागृह नेते मा. श्री. मुरलीधर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या आर्थिक तिजोरीचे आणि विकासकामांचे योग्य नियोजन करण्याची महत्त्वाची जबाबदारी स्थायी समितीवर असते. मा. विशाल शिराळे यांच्या आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरातील रखडलेले विकासप्रकल्प मार्गी लागतील, शहर विकासाला मोठा निधी उपलब्ध होईल आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर कोल्हापूरकरांना अधिक सक्षम नागरी सुविधा मिळतील, हा ठाम विश्वास आहे. नवनियुक्त स्थायी समिती सभापतींना या पुढील यशस्वी वाटचालीस व जनसेवेच्या प्रवासास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
या गौरवशाली सोहळ्यास आमदार अमल महाडीक, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, सभागृह नेते मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, अनंत खासबागदार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, गटनेत्या सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक जयंत पाटील, विजय जाधव, संजय मोहिते, सौ. अर्चना कोराणे, सौ. राजनंदा महाडिक, नगरसेविका सौ. निलांबरी साळोंखे, सौ. माधुरी नकाते, सौ. माधुरी व्हटकर, सौ. नेहा तेंडूलकर, सौ. पूर्वा राणे यांच्यासह महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि कोल्हापूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SthayiSamitiSabhapati #KMCKolhapur #OfficeOpening #CivicAdministration #MahaYuti
कोल्हापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते मा. श्री. मुरलीधर जाधव यांनी आज महापालिकेतील आपल्या मुख्य कार्यालयात आमदार मा. श्री. अमल महाडीक यांच्या शुभहस्ते फित कापून अत्यंत थाटामाटात प्रवेश केला आणि आपल्या कामकाजाचा अधिकृत श्रीगणेशा केला.
या सोहळ्याप्रसंगी महापालिका आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड आणि स्थायी समिती सभापती मा. श्री. विशाल शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभागृह नेते म्हणून मा. मुरलीधर जाधव यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कुशल नेतृत्वाचा महापालिकेच्या कामकाजाला आणि कोल्हापूर शहराच्या विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी नक्कीच मोठा फायदा होईल. लोकहितैषी आणि सर्वसमावेशक कारभाराच्या जोरावर ते कोल्हापूरच्या जनतेला अधिक सक्षम नागरी सुविधा मिळवून देतील, हा ठाम विश्वास आहे. नवनियुक्त सभागृह नेत्यांना या पुढील यशस्वी वाटचालीस व जनसेवेच्या प्रवासास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
या गौरवशाली सोहळ्यास आमदार अमल महाडीक, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, अनंत खासबागदार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, गटनेत्या सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक जयंत पाटील, विजय जाधव, संजय मोहिते, नगरसेविका सौ. अर्चना कोराणे, सौ. राजनंदा महाडिक, सौ. निलांबरी साळोंखे, सौ. माधुरी नकाते, सौ. माधुरी व्हटकर, सौ. नेहा तेंडूलकर, सौ. पूर्वा राणे यांच्यासह महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि कोल्हापूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SabhagruhNete #KMCKolhapur #OfficeInauguration #CivicLeadership #KolhapurCorporation
कोल्हापूर शहर आणि उपनगरांच्या विविध भागांमध्ये नादुरुस्त पथदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते, ज्याचा नाहक त्रास आपल्या कोल्हापूरकर नागरिकांना सहन करावा लागत होता. ही गंभीर समस्या ओळखून आमदार मा. श्री. अमल महाडीक यांनी महापालिकेला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर ताण न पडू देता, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकीतून शहर उजळवण्याची ग्वाही त्यांनी दिली होती.
आपला हा शब्द पूर्ण करत, आमदार अमल महाडीक यांनी महापालिकेला एकूण २५०० एलईडी दिवे स्वखर्चातून देण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात आयोजित विशेष कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील ५०० एलईडी दिवे महापालिका आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
आमदार अमल महाडीक यांच्या या स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण पुढाकारामुळे शहरातील अंतर्गत रस्ते व उपनगरातील अंधाराची समस्या कायमची दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार महाडीक यांचे कोल्हापूरकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!
याप्रसंगी आमदार अमल महाडीक, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती उप-सभापती सौ. दिपा ठाणेकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, नगरसेवक जयंत पाटील, नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका सौ. सृष्टी जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, माजी नगरसेवक निलेश देसाई, सहायक अभियंता (विद्युत) नारायण पुजारी आणि कनिष्ठ अभियंता अमित दळवी उपस्थित होते.
#AmalMahadik #LEDStreetLights #KMCKolhapur #PublicWelfare #CivicAmenities
बिंदू चौक आणि बिनखांबी गणेश मंदिर परिसरात कोल्हापूर महापालिकेचा मोठा ॲक्शन मोड! 🚧 धडक कारवाई करत ८ डिजिटल बोर्ड आणि ६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून महापालिकेच्या नव्या नियमानुसार हे साहित्य आता कधीच परत मिळणार नाही.
महापौर सौ. रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार शहर कोंडीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या मोहिमेत स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, सहायक आयुक्त स्वाती दुधाने आणि अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोठी कारवाई केली. शिस्तबद्ध कोल्हापूरसाठी कडक पाऊल!
#AntiEncroachment #KMCKolhapur #BinduChowk #UrbanDiscipline #TrafficFreeKolhapur
काल आपण निसर्गाच्या कुशीत वाढलो, आज त्याला जपण्याची जबाबदारी आपली आहे! 🌿✨
एक लहानसे पाऊल, सुंदर भविष्यासाठी! चला, या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करूया आणि प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवूया. येणाऱ्या पिढीला एक सुंदर आणि हिरवेगार जग भेट देऊया. 🌏🌱
जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त एकच संकल्प: झाडे लावा, झाडे जगवा! 🌳
#KMCKolhapur #WorldEnvironmentDay2026 #SaveNature #PlantATree #EnvironmentAwareness
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर (घरफाळा) भरणाऱ्या नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० जून २०२६ पूर्वी चालू मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरल्यास तुम्हाला थेट ६% विशेष सवलत मिळणार आहे!
कर भरण्यासाठी सोपे पर्याय:
✅ ऑनलाईन संकेतस्थळ: https://t.co/73kLXAlqu9
✅ WhatsApp Chatbot: ७२१८६६११८१ या क्रमांकावर 'Hi' असा संदेश पाठवा आणि घरबसल्या कराचा भरणा करा.
वेळेत कर भरून दंडात्मक कारवाई टाळा आणि कोल्हापूरच्या विकासात आपले योगदान द्या. 🏙️✨
अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधावा.
#KMCKolhapur #PropertyTax #SmartCityKolhapur #TaxDiscount #OnlinePayment
कोल्हापूरच्या विकासाला नवी गती! महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी कोल्हापूर महापालिकेच्या तब्बल १३८ कोटींच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. केशवराव भोसले नाट्यगृह, सरस्वती टॉकीज वाहनतळ आणि छ. शाहू समाधीस्थळाची त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश दिले. शहराच्या प्रगतीसाठी प्रशासकीय व राजकीय समन्वय!
#UrbanDevelopment #KMCKolhapur #InfrastructureUpdate #AmrutYojana #KolhapurUpdates
रस्ते आणि पदपथ वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची तांबट कमान ते तलवार चौक परिसरात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम! 💥🚔
महापौर सौ. रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार झालेल्या या धडक कारवाईत:
❌ ६ अनधिकृत डिजिटल बोर्ड जप्त
❌ ९ हातगाड्या जप्त
❌ ३ केबिन्स जप्त
⚠️ महत्त्वाची सूचना: मनपाच्या नवीन ठरावानुसार, जप्त केलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत परत न करता कायमस्वरूपी जप्त केले जाईल. सुव्यवस्थेसाठी अतिक्रमण स्वतःहून हटवा, अन्यथा याहून कठोर कारवाई होईल!
#KMCKolhapur #AntiEncroachment #KolhapurUpdates #CityDiscipline #CleanKolhapur
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या 'पीएम ई-बस' प्रकल्पाची मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
बुद्ध गार्डन येथील केएमटी बस डेपोच्या जागेत या अत्याधुनिक प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ८०% काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील चार्जिंग स्टेशनचा भाग पुढील १५ दिवसांत पूर्ण करून 'जेबीएम' कंपनीकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश. एडमिन बिल्डिंग, वर्कशॉप एरिया आणि इलेक्ट्रिकल पॅनल रूमचे कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होणार. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या उर्वरित निधीसाठी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरू.
लवकरच कोल्हापूरकरांच्या सेवेत आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि हक्काची ई-बस सेवा दाखल होणार आहे! 🌍🔋
#PMeBus #KMCKolhapur #ElectricBus #EcoFriendlyTravel #SmartCityKolhapur
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्कशॉप विभागातील १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी झालेली वाहने, जुने कंटेनर्स आणि स्क्रॅप साहित्याची शासकीय नियमांनुसार विल्हेवाट लावण्यासाठी 'ई-लिलाव' (e-Auction) प्रक्रिया राबवली जात आहे. मनपा सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील यांनी या मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
या संपूर्ण प्रक्रियेची मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला असून, सर्व साहित्याचे मूल्यांकन करून पुढील १५ दिवसांत लिलावाची पुढील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थायी समितीच्या मान्यतेने पारदर्शक पद्धतीने टप्प्याटप्प्याने होणार ई-लिलाव. स्क्रॅप साहित्यातून मनपाच्या उत्पन्नाला मिळणार भरीव हातभार. लिलावातून जमा होणाऱ्या निधीचा वापर शहरासाठी नवीन पाण्याचे टँकर्स खरेदी करण्यासाठी केला जाणार.
#KMCKolhapur #eAuction #ScrapManagement #RevenueGeneration #CityAdministration
नालेसफाई कामांचा थेट आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी हुतात्मा गार्डन आणि शाम सोसायटी परिसरात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
या प्रसंगी उप-आयुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक अभिजीत मोकाशी, विनायक फाळके, नगरसेविका सौ. पुर्वा राणे, आरोग्य निरीक्षक जयंत पवार उपस्थित होते. नाल्यातील सर्व अडथळे, गाळ व केंदाळ तातडीने हटवण्याचे आणि स्वतंत्र पंपाने पाणी उपसा करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. शहर जलमय होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये!
#MonsoonReady2026 #KMCKolhapur #DisasterManagement #CleanKolhapur #PublicAwareness
आज ३ जून २०२६ रोजी महान चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट महर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास उपमहापौर मा. श्री. अक्षय जरग यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कोल्हापूरकरांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
आपल्या अलौकिक कल्पकतेने आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे आणि कोल्हापूरला 'कलापूर' म्हणून जागतिक ओळख मिळवून देणारे बाबूराव पेंटर हे संपूर्ण देशाचे अभिमानस्थान आहेत. त्यांचा ऐतिहासिक आणि कलात्मक वारसा पुढील पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल.
याप्रसंगी उप-महापौर अक्षय जरग, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, चेतन आरमाळ, सुनील गेजगे, दगडू पाटील, राजेन्द्र मगदूम, संजय अतिग्रे, हंबीर मेंगाने, भगवान जठार, दत्ता चौगुले, विशाल पटेकर, पांडू भोळे, तानाजी यमकर, रवींद्र बोरगावकर आणि महापालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#BaburaoPainterJayanti #KmcKolhapur #IndianCinemaHistory #ArtAndCulture #Maharashtra
आज 'जागतिक सायकल दिन'. सायकल चालवणे हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच उत्तम नाही, तर आपल्या कोल्हापूरला प्रदूषणमुक्त आणि हरित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
चला, आजच्या दिवशी संकल्प करूया—जवळच्या अंतरासाठी सायकलचा वापर करूया, इंधन वाचवूया आणि निसर्गाचे रक्षण करूया!
#जागतिकसायकलदिन #WorldBicycle Day #EnvironmentFriendly #HealthyKolhapur #KMCKolhapur
कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध व सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा एकत्र आल्या आहेत. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. निलोत्पल आणि महापालिका आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झाली.
मंजूर आकृतीबंधानुसार आता कोल्हापूर महानगरपालिकेचा स्वतंत्र 'वाहतूक विभाग' कार्यान्वित केला जाईल, ज्यामध्ये विशेष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे पूर्णपणे हटवली जातील. या मोहिमेसाठी कोल्हापूर पोलीस दलामार्फत महापालिकेला आवश्यक पोलीस बंदोबस्त विनामूल्य उपलब्ध करून दिला जाईल. मुख्य रस्त्यांवरील भार कमी करण्यासाठी दिवसा अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घातले जातील. आवश्यकतेनुसार एकेरी मार्ग (One Way), नो-पार्किंग व नो-एन्ट्री झोनची काटेकोर अंमलबजावणी होईल. शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक साइन बोर्ड, थर्मोप्लास्टिक रस्ता चिन्हांकन (पट्टे) आणि नव्या ट्रॅफिक आयलंडची निर्मिती केली जाईल. लोकसहभाग व CSR च्या माध्यमातून रोड डिव्हायडरची स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण केले जाईल. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट जनावरांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत आवश्यक बदल करण्याबाबत संबंधित संस्थांशी समन्वय साधला जाईल.
कोल्हापूरला अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, सहायक आयुक्त जयंत जावडेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, उपशहर अभियंता सुरेश पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, शाखा अभियंता सुरेश पाटील आणि विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.
#TrafficManagement #KMCKolhapur #JointActionPlan #TrafficFreeKolhapur #UrbanPlanning
कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध व सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा एकत्र आल्या आहेत. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. निलोत्पल आणि महापालिका आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झाली.
मंजूर आकृतीबंधानुसार आता कोल्हापूर महानगरपालिकेचा स्वतंत्र 'वाहतूक विभाग' कार्यान्वित केला जाईल, ज्यामध्ये विशेष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे पूर्णपणे हटवली जातील. या मोहिमेसाठी कोल्हापूर पोलीस दलामार्फत महापालिकेला आवश्यक पोलीस बंदोबस्त विनामूल्य उपलब्ध करून दिला जाईल. मुख्य रस्त्यांवरील भार कमी करण्यासाठी दिवसा अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घातले जातील. आवश्यकतेनुसार एकेरी मार्ग (One Way), नो-पार्किंग व नो-एन्ट्री झोनची काटेकोर अंमलबजावणी होईल. शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक साइन बोर्ड, थर्मोप्लास्टिक रस्ता चिन्हांकन (पट्टे) आणि नव्या ट्रॅफिक आयलंडची निर्मिती केली जाईल. लोकसहभाग व CSR च्या माध्यमातून रोड डिव्हायडरची स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण केले जाईल. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट जनावरांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत आवश्यक बदल करण्याबाबत संबंधित संस्थांशी समन्वय साधला जाईल.
कोल्हापूरला अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.
या बैठकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, सहायक आयुक्त जयंत जावडेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, उपशहर अभियंता सुरेश पाटील, शाखा अभियंता सुरेश पाटील आणि विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.
#TrafficManagement #KMCKolhapur #JointActionPlan #TrafficFreeKolhapur #UrbanPlanning
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर केलेल्या ६% घरफाळा सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे!
✅ शहरातील २७,७५६ मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा यशस्वी लाभ घेतला आहे.
✅ या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत १२ कोटी ११ लाख ६० हजार ९४९ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.
शहरातील अजूनही १,४१,५२६ मिळकतधारकांनी आपला चालू वर्षाचा घरफाळा भरलेला नाही. ही ६% सवलत योजना फक्त ३० जून २०२६ पर्यंतच लागू आहे. त्यामुळे मुदती संपण्यापूर्वी तातडीने घरफाळा भरून या आर्थिक सवलतीचा फायदा घ्यावा.
वेळेवर कर भरून आपल्या कोल्हापूर शहराच्या विकासात आपले मोलाचे योगदान द्या! 🤝✨
#KMCKolhapur #PropertyTax #TaxDiscount #OnlineTaxPayment #KolhapurDevelopment
आगामी पावसाळा लक्षात घेता शहरात कुठेही पाणी तुंबून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रमुख व उपनाल्यांची पोकलँड, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने युद्धपातळीवर साफसफाई सुरू आहे. या कामाचा प्रत्यक्ष दर्जा आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आज स्थायी समिती सभापती मा. श्री. विशाल शिराळे यांनी विविध परिसरांचा दौरा केला.
यावेळी उप-आयुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक अभिजित मोकाशी, विनायक फाळके, नगरसेविका सौ. पूर्वा राणे आणि मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
शुक्रवारी स्थायी समिती बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शाम सोसायटी येथील नाल्याची विशेष पाहणी करण्यात आली. येथील पाण्याचा ओव्हरफ्लो रोखण्यासाठी स्वतंत्र पंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करण्याचे निर्देश देण्यात आले. नाल्यामध्ये काही नागरिकांनी केलेली बेकायदेशीर भर पोकलँडच्या साहाय्याने जागेवरच तातडीने हटवण्यात आली. तसेच नाल्यातून गेलेली नादुरुस्त ड्रेनेज पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश ड्रेनेज विभागाला दिले. हुतात्मा गार्डन व इतर परिसरातील नाल्यांमध्ये साचलेला गाळ आणि केंदाळ त्वरित काढून नाले पूर्णपणे प्रवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचणार नाही, याची पूर्ण दक्षता महापालिका प्रशासन घेत आहे. नागरिकांनाही आवाहन आहे की, त्यांनी नाल्यांमध्ये कचरा, माती किंवा प्लॅस्टिक टाकून आरोग्यास व पाण्याचा प्रवाहास अडथळा निर्माण करू नये.
#MonsoonPreparedness #KMCKolhapur #NalaSafai #DrainageCleaning #UrbanManagement
शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठा वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार महापालिकेचे अतिक्रमण विरोधी अभियान अविरत सुरू आहे. आज विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त मोहीम राबवून बिंदू चौक, श्री बिनखांबी गणेश मंदिर ते थेट महाद्वार चौक परिसरात मोठी कारवाई केली.
कारवाईदरम्यान रस्त्याला आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे ८ अनधिकृत डिजिटल बोर्ड आणि ६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या १८ मे २०२६ रोजीच्या नवीन ठराव क्र. ८३ मधील तरतुदींनुसार, जप्त केलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज जप्त केलेले सर्व साहित्य आता कायमस्वरूपी महापालिकेकडे जमा राहील. महापालिकेच्या या कडक भूमिकेमुळे आणि कारवाईच्या भीतीने ११ हातगाडीधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण तातडीने काढून घेतले.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
शहरातील अनधिकृत फेरीवाले, बेकायदेशीर शेड्स आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधातील ही मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाईल. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण स्वतःहून त्वरित हटवावे, अन्यथा जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही. कोल्हापूरला शिस्तबद्ध आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, हे आवाहन!
#AntiEncroachment #KMCKolhapur #KolhapurNews #UrbanDiscipline #TrafficFreeKolhapur