Official Twitter account of Divisional Information Office,#KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MAHADGIPR
‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू…
याबाबतचे सविस्तर वृत्त पाहण्यासाठी महासंवादच्या पुढील लिंकला भेट द्या - https://t.co/TRurMG8bCT
#प्रशिक्षण#प्रवेशप्रक्रिया
जागतिक पर्यावरण दिन (५ जून) च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातारवणीय विभागाच्या वतीने रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढविण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत पर्यावरणपूरक डायरी, पाण्याची बॉटल, किचेन, चिनी मातीचे कप, व्हिजिटिंग कार्ड होल्डर, पेपर होल्डर आदींचा समावेश असलेल्या वस्तूंचे किट तयार केले आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@Pankajamunde
#जागतिकपर्यावरणदिन
#WorldEnvironmentDay
राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत #मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
#कृषी आणि #आपत्तीव्यवस्थापन विभागांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे :
🔹शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.
🔹विजेच्या कडकडाटाच्या वेळी स्वतःसह व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
🔹झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.
#पाऊस
#वादळीपाऊस
#हवामानअंदाज
#Monsoon
#WeatherUpdate
#IMD
📢 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘जनगणना २०२७ ची तयारी’ या विषयावर जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
🔔 ‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे, २०२६ या कालावधीत रोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ (News on AIR) या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल.
🔔 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचलनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित होणार आहे.
#दिलखुलास
#जयमहाराष्ट्र
#जनगणना२०२७
#Census2027
#CensusofIndia
@CensusIndia2027
महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी आज श्रीमती आर. विमला यांच्याकडून निवासी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. श्रीमती सिंघल यांनी यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या सचिव, सातारा जिल्हाधिकारी आदी पदांची जबाबदारी सांभाळली आहे.
🔔 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांच्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग पाहा.
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी नवी आव्हाने, डिजिटल व्यवहारांबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. निवेदक सुचेता गरुडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
#जयमहाराष्ट्र
मुंबई #कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार (#एमएनआय) म्हणून घोषित करण्यात आला असून पणन मंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी येथील कार्यालयात जाऊन स्वीकारला.
नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बाजाराचे प्रशासन आता नव्या कायदेशीर तरतुदींनुसार चालविण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला.
#APMC
@JaykumarRawal
#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ४,५०० कोटी रुपये) कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून ३० टक्के हिस्सा म्हणून सुमारे २१५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे १,९२९ कोटी रुपये) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील रस्ते, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्याच्या ‘एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पांसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) यांच्याकडून प्रत्येकी १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसहाय्य दोन टप्प्यांत घेण्यासही मंजुरी दिली आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय
मुंबईतील हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा घटक म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आता या समूह विद्यापीठात प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, कफ परेड, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, चर्चगेट आणि श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय,वांद्रे-पश्चिम, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्लु असोमुल्लु विज्ञान महाविद्यालय, वांद्रे-पश्चिम आणि थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचा समावेश होणार आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय
परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.
या महामंडळांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जातात. या महामंडळांसाठी व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक-प्रशासन, सहायक व्यवस्थापक-वित्त व लेखा ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास तर मल्टी टास्किंग स्टाफची सेवा बाह्यस्त्रोतांद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी या तीनही महामंडळांना वार्षिक अंदाजे रु.१.१८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
#CabinetDecision
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मे २०२६ या अंकाचे प्रकाशन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव तथा अतिथी संपादक आप्पासो धुळाज यांच्या हस्ते करण्यात आले.
‘आपलं मंत्रालय’च्या नव्या अंकामध्ये विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीतील तंत्रज्ञान, सामाजिक संवेदनशीलता आणि सर्वसमावेशक विकासाचा वेध घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध विषयांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे; तसेच सांस्कृतिक, भावनिक आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारे लेखही वाचकांसाठी विशेष आकर्षण ठरणारे आहेत.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, कक्ष अधिकारी प्रशांत वामन, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे सल्लागार कार्तिक पांडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त आणि अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://t.co/KafWX7eSEp
#आपलंमंत्रालय
#रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
बैठकीत रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या जतन संवर्धन व विकासकामांची माहिती देण्यात आली. शिरकाई मंदिर, महादरवाजा आणि वाघ दरवाज्याच्या संवर्धनाची कामे सुरू असून राणी वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. तसेच हत्ती तलाव व फुटका तलाव परिसरातील गाळ काढणे आणि गळती रोखण्याची कामेही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, रायगडावरील स्वच्छतागृहे, त्यांची देखभाल आणि पाणीपुरवठा यासंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच रायगड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@ShelarAshish@YuvrajSambhaji
मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनाने खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील या खरेदी करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, एअर इंडिया कंपनीचे वाणिज्य अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@shambhurajdesai@Shivendraraje11