Honouring the legacy of 'Punyanagarikar Murlidhar Baba Shingote!
Glad to attend the naming ceremony of the 'Punyanagarikar Murlidhar Baba Shingote Chowk' in Mumbai today.
The life of Baba Shingote is an inspirational journey of sheer grit and determination. Coming to Mumbai from a background of severe poverty, he took up various jobs to survive, eventually starting as a humble newspaper seller. Through his tireless efforts, he went on to build a media legacy, launching multiple newspapers across various languages. His newspapers became a voice for the common man, resonating with every section of society. Despite his success and achievements, he stayed rooted in simplicity. This Chowk stands as a fitting tribute to his life and will honour his inspiring memory.
Minister Mangal Prabhat Lodha ji, Mumbai Mayor Ritutai Tawde and other dignitaries were present.
@MPLodha@TawdeRitu@punyanagari
#Maharashtra #Punyanagarikar #BabaShingoteChowk
मानखुर्द येथील जनता नगर झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पाच लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींवर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्वतः मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
या दुर्घटनेबाबत समजताच मी स्वतः संबंधित पालिका अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. तसेच गरज पडल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिले. यासोबतच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री महोदयांनी ५ लाखांची मदतही जाहीर केली आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असून, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
मुंबई आणि पुण्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबई मिसिंग लिंकवरील पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज पहाटे ४ वाजल्यापासून वळवण्यात आली आहे.
सध्या रस्त्यावर पडलेली दरड दूर करून हा मार्ग पुन्हा सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न एमएसआरडीसी आणि हायवे पोलीसांकडून सुरू आहेत. मात्र सातत्याने कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे यात काही अडचणी येत आहेत.
यासोबतच मुंबई - पुणे रेल्वे मार्गावर ठाकूरवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून गरज असल्याशिवाय मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करू नये असे आवाहन मी आपल्याला करतो.
राष्ट्रासाठी समर्पित जीवन, नि:स्वार्थ सेवा आणि अखंड भारताचा दृढ संकल्प यांचे प्रेरणास्रोत म्हणजे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी.
त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते.
#DrShyamaPrasadMukherjee #जयंती #SyamaPrasadMukherjee #BJP
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन करावे.
(विधानसभा, मुंबई | दि. 6 जुलै 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
Remembering a true nationalist who devoted his entire life to safeguarding India's unity and integrity, the founder of Bharatiya Jana Sangh, Dr. Syama Prasad Mookerjee, on his Birth Anniversary!
राष्ट्रीय अखंडतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे, भारतीय जनसंघाचे संस्थापक, आमचे प्रेरणास्थान 'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#डॉ_श्यामाप्रसाद_मुखर्जी #DrSyamaPrasadMookerjee #Maharashtra
Salutations to the founder of the Bharatiya Jana Sangh and a steadfast symbol of India's unity and integrity, Dr Syama Prasad Mookerjee, on his Birth Anniversary!
राष्ट्रीय अखंडतेचे मूर्तिमंत प्रतीक, भारतीय जनसंघाचे संस्थापक, आमचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#डॉ_श्यामाप्रसाद_मुखर्जी #DrSyamaPrasadMookerjee #Maharashtra
Remembering Pradnyachakshu Shri Sant Gulabrao Maharaj, the ardent devotee of Shri Sant Dnyaneshwar Maharaj, on his Birth Anniversary!
वेद, शास्त्र आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, ज्ञानेशकन्या, प्रज्ञाचक्षु 'श्री. संत गुलाबराव महाराज' यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#संत_गुलाबराव_महाराज #ज्ञानेशकन्या #प्रज्ञाचक्षु #GulabRaoMaharaj #Maharashtra
Do read this article by Hon PM Narendra Modi Ji, reflecting on an ardent nationalist and the founder of the Bharatiya Jan Sangh, Dr. Syama Prasad Mookerjee, whose commitment to national unity continues to inspire generations.
@narendramodi#Maharashtra#DrSyamaPrasadMookerjee #125thBirthAnniversary
राष्ट्रीय अखंडतेचे मूर्तिमंत प्रतीक, भारतीय जनसंघाचे संस्थापक, आमचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 'भारताची एकता आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन' हा विशेष लेख नक्की वाचा.
@narendramodi
#Maharashtra #DrSyamaPrasadMookerjee #125thBirthAnniversary