TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला त्यात अनेकाना खूप छान मार्क मिळाले त्यावर शंका नाही (अपंग उमेदवार )चुकीच्या पद्धतीने लेखनिक वापरून मार्क मिळवले तर त्यावर शंका आहे.
सर्वात महत्त्वाचे..
2023 मध्ये IBPS परीक्षा घेतली त्याचा निकाल लावताना उमेदवाराचे नाव, जन्मतारीख ,लिंग, रोल नंबर,जात, समांतर आरक्षण,अभियोग्यता मार्क, बुद्धिमत्ता गटातील मार्क,200 पैकी एकूण मिळालेले मार्क असा निकाल दिला होता म्हणून त्यात पारदर्शकता जास्त होती.
त्या उलट
2025 (TAIT 3) परीक्षा IBPS घेतली मात्र निकाल लावताना नॉर्मलाझेन न करता नाव, रोल नंबर,एकूण मार्क
अस जाहीर केलं म्हणून निकालात पारदर्शकता कमी दिसत आहे.
या निकाल लावण्याच्या पद्धतीवर शंका आहे म्हणून हा निकाल पूर्वीसारखा लावावा ही मागणी घेऊन पुढील दिशा ठेवली जाईल.!
190 पासून ते 00 पर्यंत मार्क मिळाले त्या यादी समोर कॉलम जोडून पूर्वीसारखा निकाल लावलाच पाहिजे ही मागणी आहे.
लढू आणि जिंकू.!!
#TAIT3_निकाल #घोटाळा #TAIT_निकालपारदर्शक_लावा
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks@Dev_Fadnavis@RealBacchuKadu@RahulAsks@ShrimantManey@Dhananjay4INC @degree_holders @abpmajhatv@AbhijitKaran25@_prashantkadam@TulsidasBhoite@Sujat_Ambedkar@AnandrjAmbedkar@imshivrajmore@INCHarshsapkal@AbhiPawarBJP@GMinakshi_Sakal@lokmat@SakalMediaNews
काल TAIT परीक्षांचा निकाल लागला असून राज्यात टॉप करणारा उमेदवार 190 मार्क घेऊन पहिला आला त्याला गेल्या TAIT मध्ये 84 मार्क होते अन् आता इतका अभ्यास केला की राज्यात पहिला आला...!
"मनोज कुमार आठवला" पण IBPS निकालाची OMR,answer key काहीच देत नाही निकालाचे नॉर्मलाईशेन केलं नाही.187 उमेदवाराला परीक्षेत 00 मार्क मिळाले हे शक्यच नाही.
परीक्षांच्या पूर्वी अनेक गुण वाढवून देऊ म्हणून एजेंट कॉल करत होते पण सढळ पुरावा मिळाला नसल्याने आम्ही शांत होतो पण आता हळूहळू हातात पुरावे लागत आहेत,लवकरच निकालावर कोर्टात जाऊ..!
काही तरी गोडबंगाल आहे.!!!
मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले त्यांचे अभिनंदन!!!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Dev_Fadnavis@AbhijitKaran25@RahulAsks@Prksh_Ambedkar@AjitPawarSpeaks @degree_holders @Dhananjay4INC@abpmajhatv@VBAforIndia@GMinakshi_Sakal@lokmat@ShrimantManey@TulsidasBhoite@INCHarshsapkal
#tait3_निकाल_जाहीरकरा
नरेंद्र मोदी 25 लोकसभा सीटों के कारण प्रधानमंत्री बने हैं।
चुनाव आयोग हमें डेटा इसलिए नहीं दे रहा, क्योंकि उनको डर है कि हमने जो महादेवापुरा में किया, वही बाकी लोकसभा सीट में कर देंगे तो देश के लोकतंत्र की सच्चाई बाहर आ जाएगी।
हमारे पास आपराधिक सबूत हैं, लेकिन चुनाव आयोग देशभर में सबूत को खत्म करने में लगा है।
चुनाव आयोग, BJP से मिला हुआ है और उनकी मदद कर रहा है।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
#RahulExposesVoteChori
१ ली पासून तीन भाषा शिकवण्याची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हा सोपा गूगल फॉर्म भरा. मराठीसाठी, लहान मुलांच्या भविष्यासाठी एवढे तर आपण नक्कीच करू शकतो. #मराठी#महाराष्ट्रप्रथम
https://t.co/q7XpAQ9UqH
एक सर्वे असं सांगतो की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मराठी शाळांचा पट हा २० च्या खाली आहे… यात बहुतांशी शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत!
म्हणजे तिथे हा सरकारचा तिरपांगडा २० या आकड्याचा खेळ कळतो!
काहीही करून हिंदी घुसवायची हे खूप आधीपासून ठरलंय! आता जे चालू आहे ते निव्वळ राजकारण आणि मराठी जनांची बनवाबनवी!
त्यात आपल्याकडे पण खुळे आहेतच जे हिंदीला राष्ट्रभाषा म्हणतायेत!
महाराष्ट्राची भाषा म्हणजे, आपल्या शिवरायांची, आपल्या बाबासाहेबांची, आपल्या महात्मा फुलेंची…
माय मराठी!
मराठी भाषेवर ज्यांचा जिव आहे त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, संघर्ष करावा लागेल अशीच परिस्थिती आहे!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा संघर्ष असू शकतो… हेच दुर्दैव!
गड्यांनो, आता महाराष्ट्रधर्म वाढवायला आपल्याला मराठी वाढवावीच लागेल…
आणि सोबत हे बिंबवावं लागेल की…
भारत म्हणजे…
एक देश, अनेक भाषा, अनेक संस्कृती!!!
#मराठीभाषा #महाराष्ट्र
अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाहीय…
किंवा खरंतर कुठल्याच इतर भाषेला नाहीये!
त्या वाढतील की त्यांच्या त्यांच्या… त्या त्या भाषेच्या लोकांनी आपल्या भाषेचा मक्ता जरूर घ्यावा! त्यात गैर काहीच नाही…
मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे!
हिंदी मोडकी तोडकी येतेच आहे की सगळ्यांना!
पण मराठी मोडकी तोडकी येऊ नये हा मुद्दा आहे…
हा प्रांतवाद तर त्याहून नाही… (असं समजणाऱ्यांना थोडं उशिरा कळेल किंवा कदाचित कळणारच नाही!)
भारत हा आपला देश आहे आणि या देशातल्या सगळ्या भाषा आपल्याच आहेत! पण मावशी जगवायला आणि वाढवायला ‘आईला’ कोणी मारत नाही!
भाषावार प्रांतरचना झाली आणि आपली भाषा, आपली संस्कृती जपण्याचा अधिकार सर्व राज्यांना मिळाला…
या सगळ्याच्या पलीकडे…
जरा लक्षात घ्या…
लहान मुलांच्या मेंदूला आपण किती ताण देणार आहोत?
एखाद्याची मातृभाषा मालवणी किंवा खानदेशी आहे तर त्या बिचाऱ्याला तुमची ती ‘प्रमाण’ मराठी भाषा शिकणं ही सुद्धा एक लढाईच आहे… आणि शिवाय डोक्यावर इंग्रजी आहेच… आता हिंदी कुठून काढली??? आणि कशासाठी? ती शिकायची आहेच की नंतर… आपण सगळे शिकलोच की!
पण आधी मराठीची गोडी लागूद्या मग बघू की इतर भाषांचं…
मराठी भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकणार आहे… आपल्या मराठी रूढी, परंपरा सारंकाही टिकणार आहे!
पुन्हा एकदा सांगतो…
एक देश, एक भाषा चा अजेंडा खपवून घेतला जाणार नाही!
(आता खाली येऊन तु हिंदीत काम करणार का? कधीच हिंदी बोलणार नाही का वगैरे असले निर्बुध्द मुद्दे मांडू नका)
आपण काम कुठेही करू… कुठल्याही राज्यात अथवा देशात राहू… पण माय मराठी ही माय मराठीच!
आणि मराठी कायम वाढत राहो, आपल्यालाही वाढवत राहो…
#मराठी #भाषा #महाराष्ट्र #होय_मी_मराठी
त्याच दरम्यान mpsc मुख्य परीक्षा आणि TAIT परीक्षा काही उमेदवारांच्या एकाच तारखेत आलेल्या आहेत तर ded,bed व इतर स्पर्धा परीक्षा TAIT 3 परीक्षा एकाच वेळेत आलेल्या असून नेमक कोणता पेपर द्यावा ही मुलांच्या समोर खूप मोठी समस्या निर्माण झालेली असून ही सर्व बाब प्रशासनाच्या लक्षात
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी High Alert घोषित करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत TAIT 3 परीक्षा उद्यापासून सुरू होणार असून त्यात परिषदेकडून चॉईस दिल्या पेक्षा तिसरे परीक्षा सेंटर आलेले असून
@dadajibhuse@Prksh_Ambedkar
सगळ्यात हास्यास्पद बाब म्हणजे अवजड वाहतुकीस बंदी आहे! वाहतूक पोलीसांचे प्रत्येक चौकाचे दर ठरलेले आहेत आणि त्याची वसूली कोणी करायची त्यासाठी प्रत्येक चौकीचा वाहतूक पोलीस ठरलेला आहे. माझं ओपन चॅलेंज आहे माझा दावा खोटा आहे असं पोलीसांनी सांगावं. वाहतूक पोलीस अवजड वाहतुकीस रेड कार्पेट टाकत असतील तर तुमच्या आमच्या डोक्यात थोडीफार भुकटी गेल्याने काय फरक पडतो सर! आम्ही तर किरकटवाडीतील नागरिक दररोज प्रत्येकी किमान पावशेर तरी भुकटी खातो या डंपरची 😡 @CPPuneCity@PuneCityTraffic@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@supriya_sule
#पुणे
डंपरमध्ये खडीचा चुरा भरून वाहतूक सुरू आहे. त्यावर कापड टाकले जात नसल्याने हा मातीचा चुरा उडून आमच्या डोळ्यात जात आहे. पोलिसांच्या डोळ्याला या गाड्या दिसत नाहीत, पण सिंहगड रोडवर हा त्रास खूप वाढला आहे. पण कारवाई केली जात नाही.
@PuneCityTraffic@CPPuneCity#pune#punenews
रामकृष्णहरि!
सर्वप्रथम या विजयाबद्दल कर्जत-जामखेडमधील मतदारांपुढं नतमस्तक होऊन या विजयाचा मी नम्रपणे स्वीकार करतो. आपला विश्वास आणि त्यांचं प्रेम मी कदापि विसरणार नाही.
हा विजय माझा नाही तर कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीचा, इथल्या स्वाभिमानी जनतेचा, सामान्य माणसाचा, निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी, मित्र, माझं कुटुंब, ‘मविआ’तील घटक पक्षांचे कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या राज्यभरातील अनेकांनी दिलेला आशीर्वाद आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि महाराष्ट्र धर्माचा हा विजय आहे.
या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं. गेली पाच वर्षे कर्जत-जामखेडला माझ्या कुटुंबासारखं जपलं, प्रत्येक संकटात साथ-सोबत केली. आयुष्याचा पाया रचणारं शिक्षण, विकासाला गती देणारे रस्ते, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, पर्यटनाला चालना देणाऱ्या अध्यात्मिक स्थळांचा विकास, मतदारसंघात निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणं, महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करुन सक्षम बनवणं, त्यांना व्यवसायाच्या नवनव्या संधी उपलब्ध करुन देणं ही कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोविड आणि लंपीसारख्या संकटात इथल्या मायबाप जनतेसोबत ठामपणे उभा राहिलो. दुष्काळात पाणी पुरवणं असो की पीक विमा मिळवून देणं असो या गोष्टी कर्तव्यभावनेतून प्रामाणिकपणे केल्या. ‘एमआयडीसी’साठी आणि या माध्यमातून युवांना रोजगार निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न तर कर्जत-जामखेडकरांना माहितच आहेत. कर्जत-जामखेडच्या मायबाप जनतेने माझ्या प्रत्येक कामात तन-मनाने साथ दिली. माझ्यावर विश्वास ठेवला. संघर्षाच्या कठीण काळात पाठीशीच नाही तर खांद्याला खांदा लावून उभं राहिले, हे मी कधीही विसरणार नाही. ही निवडणूक कसोटी पाहणारी होती. पक्ष फुटला असताना आणि आदरणीय पवार साहेब हे ८५ व्या वर्षी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि विचारांसाठी संघर्ष करत असताना त्यांना साथ देण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्माचा विचार जपण्यासाठी मलाही राज्यभर अनेक सभांसाठी जावं लागलं. या काळात माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदारसंघातील प्रचाराची धुरा स्वतः ‘रोहित पवार’ असं समजून माझ्या कर्जत-जामखेडच्या मायबाप जनतेने आपल्या खांद्यावर घेतली, हे तुमचं ‘प्रेम’ मी कदापि विसरणार नाही. माझा प्रत्येक क्षण हा तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या भल्यासाठी, कर्जत-जामखेडच्या विकासासाठी असेल, किंबहुना कर्जत-जामखेडचं कल्याण हेच माझं कल्याण, असं मी मानतो. त्यादृष्टीनेच भविष्यातही काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.
आता निवडणूक संपली, राजकारण संपलं. यापुढं मला मत दिलेल्या मतदारांचाच नाही तर मत दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांचा मी लोकप्रतिनिधी आहे. म्हणूनच काम करताना जात, धर्म, गरीब, श्रीमंत, पक्ष असा कोणताही भेदभाव माझ्याकडून कधी झाला नाही आणि यापुढंही कदापि होणार नाही. आता केवळ कर्जत-जामखेडचा विकास हेच माझं ध्येय आहे. या कामात माझ्या कर्जत-जामखेडची मायबाप जनता माझ्या पाठीशी राहिलच, यात कोणताही संशय नाही. माझे राजकीय विरोधक प्रा. राम शिंदे साहेब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनीही केलेली टीका, एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप हे सर्व विसरुन कर्जत-जामखेडच्या विकासासाठी एकत्र यावं. निवडणूक संपल्यामुळं राजकारणाला पूर्वविराम देऊन विकासाचा, समाजकारणाचा, महिला भगिनींना सन्मान देण्याचा, युवांना रोजगार देण्याचा, शेतकऱ्यांच्या घामाला मोल देण्याचा नवा अध्याय आपण एकत्रितपणे लिहू. प्रा. राम शिंदे साहेब हेही आणखी चार वर्षे आमदार असल्याने राजकीय मतभेद विसरुन केंद्र व राज्य सरकारकडून अधिकाधिक निधी आणण्याकामी त्यांनीही सहकार्य करावं, असं मी त्यांना आवाहन करतो.
ज्या कर्जत-जामखेडने मला राज्यात ओळख दिली, काम करण्याची संधी दिली, विश्वास दिला, संघर्ष करण्याची प्रेरणा दिली त्या मतदारसंघाला नवी ओळख निर्माण करुन देण्याचा आणि विकासाचा एक स्वतंत्र चेहरा देण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिलाय आणि तो यापुढंही राहील. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून कर्जत-जामखेड मतदारसंघ हा राज्यात विकासाचं एक नवं मॉडेल निर्माण करण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मी काम करत असून याकामी यापुढंही सर्वजण सहकार्य करतील, असा विश्वास आहे.
निवडणुकीच्या काळात माझ्याकडून चुकून, जाणते-अजाणतेपणाने कुणाचं मन दुखावलं असेल, कुणाविषयी चुकीचा किंवा अपशब्द वापरला गेला असेल, काही चुकीची कृती घडली असेल किंवा कुणाचा अवमान झाला असेल तर या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि विजयाबद्दल आभार न मानता कायमच कर्जत-जामखेडकरांच्या ऋणात राहणं मला आवडेल!
रामकृष्णहरि!
कोविडच्या काळात केलेलं राजकारण विसरू नका
मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे न देता पीएम केअर मध्ये पैसे देण्यासाठी राजकारण केलं होतं
रेमडेसिव्हिरचा तुटवडा होता, त्याची किंमत वाढवून लोकांना ते घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात होता
महाराष्ट्रातील स्थिती बिगडावी याच्यासाठी प्रयत्नशील होते
हे सर्व आठवणीत आणून देण्यासाठी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा
राजकारणी म्हणून महाराष्ट्रात अनाजीपंतनंतर दुसरा कोण कपटी,कारस्थानी आणि स्वार्थी नेता असेल तर तो राम शिंदे आहे.
स्वतः अनेक वर्ष आमदार मंत्री असून काहीच काम केली नाहीत पण फक्त विद्यमान आमदार म्हणून रोहित पवारांना कोणत्याही कामाचं श्रेय जाऊ नये या माणसाने ज्या कामातून लोकांना रोजगार मिळणार होता अशा MIDC च्या कामामध्ये आढकाठी घातली.
कर्जत जामखेडमध्ये अनेक मंदिरांच्या,एका किल्ल्याच्या विकासासाठी रोहित दादांनी निधी आणला होता म्हणून या माणसाने त्यावर स्टे आणला ती काम बंद पाडली.रोहित पवारांना श्रेय जाईल म्हणून मंजूर झालेल्या आणि लोकांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या अनेक पाणीपुरवठा योजना बंद पाडल्या एवढंच नाही तर आज जामखेड तालुक्यात रोहितदादांनी महाविकास आघाडी सरकार काळात नव्वद कोटी रुपये मंजूर करून आणलेलं SRPF केंद्र बांधून पूर्ण केलं तर त्या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्याला सुद्धा पोलीस बंदोबस्त लावून रोहित दादांना उदघाटन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
कर्जत जामखेडची जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत आहे लिहून ठेवा राम शिंदेचा दुसरा पराभव आजच झाला आहे!