'शिवराज्याभिषेक दिना'च्या पवित्र आणि सुवर्ण क्षणी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
याप्रसंगी, राज्याचे ज्येष्ठ मंत्री माननीय श्री. गणेशजी नाईक साहेब, आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर, आमदार श्री. महेशजी बालदी यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या भूमीत, जिथे स्वराज्याची राजधानी 'किल्ले रायगड' दिमाखात उभा आहे, त्याच भूमीत आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराजांचे हे भव्य स्मारक साकारले जाणे, ही आम्हा सर्व रायगडकरांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे!
विमानतळावर येणारा-जाणारा प्रत्येक प्रवासी या स्मारकातून छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य आणि प्रेरणादायी इतिहासाची ऊर्जा घेऊन प्रवास करेल, असा मला ठाम विश्वास आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी मानाचा मुजरा!
जय शिवराय!
@Dev_Fadnavis
#शिवराज्याभिषेक #छत्रपतीशिवाजीमहाराज #रायगड #शिवराज्याभिषेकदिन #AditiTatkare #NaviMumbaiAirport #navimumbai
देशाचे जबाबदार नागरिक म्हणून इंधनाच्या बचतीसाठी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहनास प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद देणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. याच कर्तव्याच्या भावनेतून आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्याच प्रेरणेने यापुढे मी कोणतेही एस्कॉर्ट वाहन सोबत न घेता प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, शक्य तितक्या बैठका, कार्यक्रम व इतर कामकाज ऑनलाइन माध्यमातून करण्याच्या, प्रवास टाळण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. माझी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती आहे, आपणही इंधनाची जास्तीत जास्त बचत करावी, शक्यतो "वर्क फ्रॉम होम" करावे किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. आव्हानात्मक काळाचा एकजुटीने सामना करूया, सशक्त भारत घडवूया !
#pmmodi #FuelConservation #SashaktBharat #AditiTatkare #WCDMaharashtra
जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी १०वीच्या निकालातून सिद्ध करून दाखवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारत या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे. यंदा पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापाठोपाठ मुंबई उपनगर येथील ८८, अहिल्यानगर येथील ८०, बीड येथील ४७, ठाणे जिल्ह्यातील ४२, सोलापूर येथील ३९ आणि कोल्हापूर येथील ३४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष कौतुक म्हणजे कोल्हापूरमधील एका विद्यार्थ्याने ९५.२०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून बीडच्या विद्यार्थ्याने ९४% गुणांची नोंद केली आहे. यासोबतच पुणे, सोलापूर, मुंबई आणि धाराशिव येथील अनेक विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत गुणवत्तेचा झेंडा फडकवला आहे.
बालगृहातील या मुलांसाठी आमचा विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, ऑनलाईन सेशन्स, शिक्षकांचे विशेष वर्ग आणि समुपदेशन अशा सुविधा पुरवल्या गेल्या, ज्याचा मोठा फायदा या निकालात दिसून आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास कटिबद्ध असून, त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहू. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
#AditiTatkare #SSCResults #MaharashtraGovernment #WCD #SuccessStory #EducationForAll #MaharashtraEducation
रायगडमधील अंगणवाडी ताईंची गरुडझेप!
"शिक्षणाला वयाचं बंधन नसतं आणि जिद्द असेल तर कोणतंही ध्येय गाठता येतं" हे आपल्या रायगडमधील अंगणवाडी ताईंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. जिल्हा परिषद रायगड आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या 'शिक्षणाची पुन:संधी' उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील तब्बल ४५७ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस १० वीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या आहेत. ही बातमी ऐकून मनस्वी आनंद झाला.
आपल्या या भगिनींनी अंगणवाडी केंद्रातील लहान बालकांचे संगोपन, गरोदर माता व बालकांच्या आरोग्याची काळजी आणि इतर सर्व शासकीय जबाबदाऱ्या चोख पार पाडून, वेळात वेळ काढून अभ्यासासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या या जिद्दीला आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे. १८१ सेविका आणि २७६ मदतनीस भगिनींनी मिळवलेले हे यश म्हणजे, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल आहे.
यशस्वी झालेल्या सर्व भगिनींचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
#raigad #अलिबाग #अंगणवाडीसेविका #sscresult #AditiTatkare #maharashtra #wcddepartment
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांत तात्काळ पंचनामे करून बाधितांना मदत पोहोचवावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे व सर्व स्थानिक प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, कोणताही धोका उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनास संपर्क साधावा. या संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी असून, आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे.
तळा तालुक्यातील मौजे फळशेत येथे वीज कोसळून वेदांत साळुंखे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व दुःखद आहे. या दुर्दैवी घटनेस बळी पडलेल्या चिमुकल्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
या घटनेत त्याचा भाऊही जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय, माणगांव येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने उपजिल्हा रुग्णालय, माणगांव येथे भेट दिली. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्याच्या प्रकृतीची माहिती घेत सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी शासन आपल्या पाठीशी आहे अशी भावना यावेळी मी व्यक्त केली.
#रायगड #तळा
माझ्या आयुष्यातील यशाची प्रत्येक पायरी आईच्या प्रेमातून आणि संस्कारातून साकारली आहे.
मला घडवणारी माझी शारदा, माया करणारी माझी वरदा!
#mothers#mothersday
महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणारे थोर नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांना स्मृतिदिननिमित्त विनम्र अभिवादन.
महाराष्ट्रातील महिलांच्या व बालकांच्या पोषणासाठी, विकासासाठी सुधाकरराव नाईक यांनी स्वतंत्र " महिला व बालविकास विभाग" स्थापन केला. इतकंच नव्हे, तर त्यांच्याच नेतृत्वात "राज्य महिला आयोग" स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत असतानाच, त्यांचे कार्य अधिक समर्थपणे पुढे नेण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया !
#सुधाकरराव_नाईक
काही वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये रायगड जिल्ह्यातील अल्पवयीन मातांबाबत १६,५५७ हा आकडा प्रसिद्ध केला आहे, तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आकडा आहे.
हा आकडा रायगड जिल्ह्यातील, जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग येथे एप्रिल २०२१ ते मार्च २०२६ अखेर प्रसुती झालेल्या मातांची एकूण संख्या आहे. त्याचबरोबर, माझी जी प्रतिक्रिया या बातमीसोबत जोडली जात आहे, ती आजची नसून १ मे २०२६ रोजी बालविवाह रोखण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली आहे.
बालविवाहाची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी 'महिला व बालविकास विभाग', सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्थानिक जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे आणि आम्ही आमचे काम अधिक जोमाने सुरूच ठेवणार.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@MahaDGIPR
"बुद्धं शरणं गच्छामि"
शांती, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारे, दयेचे सागर तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
सह्याद्रीच्या कड्यांसारखा कणा आणि संतांच्या वाणीसारखी सात्विकता जपणारा आपला महाराष्ट्र!
महिलांचे सामर्थ्य आणि बालकांचे हसू हेच आपल्या राज्याच्या समृद्धीचे लक्षण आहे. या वैभवशाली राज्याची सेवा करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजते. समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्राच्या संकल्पासह, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #maharashtradin #AditiTatkare
आपल्या कष्टाने केवळ स्वतःलाच नाही, तर संपूर्ण कुटुंबाला आणि राज्याला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या प्रत्येक कष्टकरी महिलेला 'जागतिक कामगार दिना'निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
राज्यातील माता-भगिनींच्या श्रमाचा सन्मान करणे आणि त्यांना सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व कामगार बांधवांना व भगिनींना सलाम!
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन #AditiTatkare #maharashtra
निर्णय महायुतीचे, महाराष्ट्राच्या हिताचे !
आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महायुती सरकारची भविष्यवेधी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.
#maharashtra #cabinetmeeting #development #Adititatkare
हनुमान जयंतीच्या मंगलदिनी म्हसळा, श्रीवर्धन आणि माणगाव तालुक्यातील विविध धार्मिक उत्सव आणि विकासकामांच्या सोहळ्यांना उपस्थित राहून नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. यावेळी, म्हसळा येथे मारुतीरायाचे दर्शन घेऊन हनुमान जन्मोत्सवात सहभागी झाले. घोणसे आणि पानवे येथे नव्या सभामंडपांचे भूमिपूजनही केले.
कुडतुडी, चिरगाव, सडकेचीवाडी आणि चिराटी या गावांना भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला व त्यांच्या आनंदांत सहभागी झाले. तसेच, श्रीवर्धनमधील गुळघे येथे पार पडलेल्या अभूतपूर्व अशा हनुमान मंदिर लोकार्पण सोहळ्यात सहभागी होत सर्वांना शुभेच्छा दिल्या. माणगावमधील विविध उत्सवांनाही यावेळी हजेरी लावली. प्रभू हनुमंताच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली, आपल्या मतदारसंघाच्या विकासाची ही घोडदौड अशीच अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प यानिमित्ताने केला.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे विहिरीत कार कोसळून ६ विद्यार्थ्यांसह एकूण ९ जणांचे अपघाती निधन झाल्याची बातमी मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. स्नेहसंमेलनाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या या विद्यार्थ्यांवर, त्यांच्या पालकांवर काळाने घाला घातला. मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील आहेत.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांना सद्गती लाभो, हे दुःख सहन करण्याची शक्ती इंदोरे ग्रामस्थांना, मृतांच्या कुटुंबीयांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली !
हनुमान जयंतीचे औचित्य साधून रोहा आणि तळा तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित उत्सवांना उपस्थित राहिले आणि पवनपुत्र श्री हनुमंताचे दर्शन घेतले. रोह्यातील एम.आय.डी.सी. स्टॉप हनुमान मंदिर आणि मुख्य मारुती मंदिर येथे नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर सवाने, गौळवाडी वाली, तांबडी खुर्द, हाळ, विरजोली आणि कवळठे या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली व त्यांच्या आनंदांत सहभागी झाले.
या दौऱ्यात मौजे गोपाळवट येथे नूतन सामाजिक सभागृहाचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. हे सभागृह गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक हक्काचे केंद्र ठरेल, असा मला विश्वास आहे. तसेच तळा तालुक्यातील मांदाड आणि कुंबेट येथेही मारुतीरायाचे आशीर्वाद घेतले. भक्तीच्या जोडीला विकासाची ही वाटचाल अशीच सुरू राहो, हीच ईश्वरी चरणी प्रार्थना!
#AditiTatkare #HanumanJayanti #Roha #Tala #Raigad #हनुमानजयंती
"महायुती" म्हणून ताकदीने लढणार !
बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी पवार यांच्या नेतृत्वात "महायुती" म्हणून ताकदीने लढणार आहोत. बारामतीतून आदरणीय श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार व राहुरीतून श्री.अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी महायुती म्हणून एकजुटीने लढू.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde