एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
युवा शेतकरी नेते रविराज साबळे यांना पोलिसांकडून दिला जाणारा नाहक त्रास तात्काळ थांबला नाही, तर आम्हाला रविराज यांच्या समर्थनात उतरावे लागेल. संविधानाच्या चौकटीत राहून रविराज आपले आंदोलन करत असताना काल त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन रात्री सोडण्यात आले. तसेच आज सकाळी सहा वाजता १५-१५ पोलीस पाठवून त्यांना परत ताब्यात घेतले. हे अत्यंत अन्यायकारक आहे. लोकशाही मूल्यांची ही गळचेपी तत्काळ थांबवा, अन्यथा युवकांचा हा उद्रेक तुमची राख केल्याशिवाय राहणार नाही.
#ravirajsabalepatil #cjpprotest #teamgabbar
नपुंसक सरकारचा जाहीर निषेध ज्या माणसाला स्लिप डिस्क चा त्रास आहे त्या माणसाला नरड दाबून उचलून पोलीस घेऊन गेले.
या संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे.देशात हुकूमशाही आली आणि तुमचा आवाज दाबला जातोय
#Maharashtra#Genz#marathinews#wesupport#रविराज_साबळे_पाटील
दिल्ली पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या युवा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत, आज मराठा क्रांती मोर्चा प्रमुख मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे बीडचे खासदार @bajrangsonwane_ यांनी जंतर-मंतर आंदोलनस्थळी भेट दिली.
या लढ्यात तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत, जंतर-मंतरवरून उठणारा हा क्रांतीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार, असा शब्द त्यांनी यावेळी दिला! ✊🔥
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
तेलंगणा तेल्लापूर येथे #भाजपा च्या गुंडांकडून महात्मा ज्योतीबा फूले यांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला गेला👎🏻
पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला पण संघी पिलावळींनो लक्षात असु द्या, महापुरुषांची विटंबना करून महान विचार मारणार नाहीत
जाहीर निषेध 🏴🏴🏴
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे
शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल
DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
परीक्षेला काही दिवस उरलेत आणि सरकार अजूनही निवडणुकीच्या युती आघाडीत अडकलेलं आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.या मुजोरी आणि निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.आता निर्णय घ्या नाहीतर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू @CMOMaharashtra
अर्ज_ विनंती_ पाठपुरावा आता खूप झाला
अजूनही PSI वय वाढीचा GR येताना दिसत
नाही🙏
त्यामुळे रस्त्यावर उतरून आपली मागणी
करणे या शिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक
नाही
विद्यार्थी विरोधी शासनाचा जाहीर निषेध🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
शासनाचा हा कसला न्याय? पोलीस शिपायांना वयोमर्यादेत सूट, मग #PSI पदासाठीच का अडवणूक? जाहिरातीला ७ महिने उशीर आणि वयोमर्यादा गणनेचा चुकीचा दिनांक यामुळे हजारो विद्यार्थ्यी चिंताग्रस्त आहेत.
मा. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis, विद्यार्थ्यांनी ५-६ महिने पाठपुरावा करूनही शासन ढिम्म का? अनेक मुले कुटुंबाची बिकट परिस्थिती असताना चिकाटीने अभ्यास करत आहेत. त्यांच्या मेहनतीचा सरकार का विचार करत नाही ? तात्काळ १ वर्षाची सवलत द्या आणि वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ पासून ग्राह्य धरा!
विद्यार्थ्यांच्या मागणीला आमचा संपूर्ण पाठींबा आहे.
#MPSC #PSIवयवाढ #JusticeForMPSCStudents