Rajpal Yadav is a gifted actor who has given years of unforgettable work to our industry. Sometimes life turns unfair, not because of talent, but because timing can be brutal. He will be part of my film, and I believe this is the moment for all of us..producers, directors, colleagues to stand together. A small signing amount, adjustable against future work, is not charity, it’s dignity. When one of our own is going through a tough phase, the industry must remind him he’s not alone. This is how we show we are more than just an industry.
📌 आंदोलक विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या :
🔹 MPSC Combine परीक्षा 2025 साठी फॉर्म भरण्याची लिंक तात्काळ ओपन करण्यात यावी.
🔹 सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देऊन ४ तारखेला नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
👉 PSI वयोमर्यादा १ वर्ष वाढीचा GR तात्काळ व स्पष्टपणे लागू करण्यात यावा.
🔶 नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनुसार निर्णय घ्यावा
🔶 सर्व परीक्षार्थ्यांना समान व न्याय्य संधी मिळावी
ही केवळ मागणी नाही, तर तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. ✊
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
#PSI वयोमर्यादेसाठी विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत, वेळ कमी असल्याने काल पासून विद्यार्थ्यी पोटतिडीकेने जीआर साठी मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्र्यांना त्यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही अशी स्थिती असल्याचे दिसत आहे.
काल एकीकडे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई महापालिका निवडणुकीसाठी PR करण्यामध्ये मध्ये मग्न होते. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधी उधळायला सरकारकडे वेळ आहे, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्याकडे कसालीही सवड नाही !
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#PSIवयवाढ
#MPSC
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
एवढे निष्ठुर CM आज पर्यंत पाहिले नाहीत. MPSC मुलांचा मुद्दा मार्गी लावण्याला महत्व देण्याऐवजी स्वतःच्या पक्षातली बंडखोरी थांबवण्यासाठी मैदानात उतरलेत म्हणे...... राज्याचे CM आहेत की पक्षाचे तेच कळत नाहीये.
पोरं काय भीक मागत आहे का? चूक प्रशासन करणार आणि अन्याय पोरांवर करता आहात.. जाहिरात 7 महिने उशिरा आल्यामुळे स्पर्धेतून सरकारच बाजूला करत आहे..100+ आमदारांनी विनवणी करूनही मागणी मान्य करत नाही मुख्यमंत्री, हेच का रामराज्य??
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
सतेज पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना काल रात्री फोन #MPSC चे हजारो विद्यार्थी रस्तावर उतरले आहेत तरी ह्या विद्यार्थींचा विषयावर आजच्याच निर्णय जाहीर करा..!
#MPSCआंदोलन
सरकारने तातडीने PSI परीक्षेच्या वयोमर्यादा वाढीचा जीआर काढावा..
सरकारच्या कानाचे पडदे फाटले आहेत काय ?
सरकारला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकु येत नाही काय ?
PSI वय वाढीबाबत तातडीने सरकारने GR काढावा.
विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दडपू शकत नाही... हा आवाज आणखी तीव्र होणार !
काँग्रेस विद्यार्थ्यांच्या सोबत आहे !
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#PSIवयवाढ
#MPSC
#विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
सरकार अतिशय दुटप्पी भूमिका घेते आहे. विद्यार्थ्यांचा छळ करुन सरकारला काय मिळणार आहे ?
पण, जर ७ महिन्यांपासून PSI परीक्षेबाबत विद्यार्थी तुमच्याकडे मागणी करत आहेत, फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे तर मग विद्यार्थ्यांचे हाल का केले जात आहे ?
सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब फाईलवर सही करावी आणि जीआर काढावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
अन्यथा, खबरदार हे आंदोलन इथे थांबणार नाही. न्यायासाठी हे आंदोलन आहे, न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#PSIवयवाढ
#MPSC
#विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
आज #PSI वयोमर्यादा वाढीसाठी विद्यार्थ्यांना पुण्यातील रस्त्यावर उतरण्याची वेळ महायुती सरकारच्या निष्क्रियतेमुळेच आली आहे. लाखो तरुणांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या या सरकारच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात सुरू असलेल्या संवैधानिक आंदोलनात काँग्रेस पक्ष सक्रियपणे सहभागी होईल.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस शेवटपर्यंत खंबीरपणे त्यांच्या सोबत उभी राहील.
पुणे पोलिसांनी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये, ही स्पष्ट व ठाम विनंती.
तरुणांच्या हक्कांसाठी, संधींसाठी आणि न्यायासाठी हा लढा अखेरपर्यंत लढला जाईल.@Dev_Fadnavis
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच.
#PSI_एक_वर्ष_वयवाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही.
याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा.विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर!
वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत.
राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे.
ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत.
निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते,
पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते.
हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही.
सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही,
तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल.
#PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे.
🔥 हा लढा नोकरीचा नाही,
हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
4 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती एकाने Telegram वर प्रसिद्ध केली
ज्यात संबंधित अधिकाऱ्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक सुद्धा होते.
त्यामुळे परीक्षेत गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित टेलिग्राम चैनल वर माननीय आयोगाने कारवाई करायला च हवी.
इलेक्शनच्या वेळी सत्ताधाऱ्यांकडून ३०० GR एका रात्रीत निघतात.
पण गोरगरीब शेतकरी, कामगार, सामान्य कुटुंबातील मुला-मुलींसाठी
या राज्यात एकही GR निघू शकत नाही - हीच आजची दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. १ वर्ष PSI वयोवाढ ही काही सवलत नाही, ती न्यायाची, हक्काची आणि संधीची मागणी आहे.
महिनोन्महिने परीक्षा रखडवून, जाहिराती उशिरा काढून आणि नंतर “वयोमर्यादा संपली” असं सांगणं हे सत्ताधाऱ्यांनी तरुणांच्या भविष्यासोबत केलेलं उघड अन्यायकारक राजकारण आहे.
“फडणवीस शिंदे पवार” टोळीने लक्षात ठेवावं, निवडणुका GR ने जिंकता येतात, पण तरुणांचा रोष दुर्लक्षित करून सत्ता टिकत नाही.
#PSI साठी १ वर्ष वयोवाढ तात्काळ लागू करून राज्यातील लाखो तरुणांच्या संयमाची परीक्षा घेणं थांबवा.
हि मागणी तरुणांच्या भविष्यासाठी आहे. ✊
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
शासनाचा हा कसला न्याय? पोलीस शिपायांना वयोमर्यादेत सूट, मग #PSI पदासाठीच का अडवणूक? जाहिरातीला ७ महिने उशीर आणि वयोमर्यादा गणनेचा चुकीचा दिनांक यामुळे हजारो विद्यार्थ्यी चिंताग्रस्त आहेत.
मा. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis, विद्यार्थ्यांनी ५-६ महिने पाठपुरावा करूनही शासन ढिम्म का? अनेक मुले कुटुंबाची बिकट परिस्थिती असताना चिकाटीने अभ्यास करत आहेत. त्यांच्या मेहनतीचा सरकार का विचार करत नाही ? तात्काळ १ वर्षाची सवलत द्या आणि वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ पासून ग्राह्य धरा!
विद्यार्थ्यांच्या मागणीला आमचा संपूर्ण पाठींबा आहे.
#MPSC #PSIवयवाढ #JusticeForMPSCStudents
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नाहीय,
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय नाही झाल्यास.
विद्यार्थी गांधीवादी लढाई लढतील.🤝✊
अनुच्छेद- 19
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
परीक्षेला काही दिवस उरलेत आणि सरकार अजूनही निवडणुकीच्या युती आघाडीत अडकलेलं आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.या मुजोरी आणि निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.आता निर्णय घ्या नाहीतर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू @CMOMaharashtra