संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली आहे. ती ओळख मिटता कामा नये, यासाठी कायम प्रयत्नशील राहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. चला एकत्र येऊ या, लोकशाहीचे रक्षण करु या! सर्वांना 'भारतीय संविधान दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#भारतीय_संविधान_दिवस
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी कडून सर्व देश बांधवाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐✨💥
#Diwali2025
सर्व जिल्हाध्यक्ष व महासचिव यांना कळविण्यात येते की,आपल्या जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती झाली तेंव्हा पासून ते आजपर्यंत जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने केलेल्या संघटनात्मक कामकाजाचा अहवाल तयार करावा.
#MTAforIndia
बंजारा, धनगर व तत्सम जातींना आदिवासी मध्ये कोणत्याच॔ पध्दतीने प्रवेश देऊ नये या मागणी करीता दिनांक-13 ऑक्टों 2025 ला चंद्रपूर जिल्ह्य़ातील आदिवासी समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश महामोर्चा.
#आदिवासी_एल्गार#आरक्षण_बचाओ_मोर्चा@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
वणी नगरपरिषद निवडणूक विषयी आदिवासी चर्चा सत्र सभेत. वणी नगराध्यक्ष अनुसूचित जमाती राखीव महिला जागा संदर्भात महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे अध्यक्ष आणि महासचिव व पदाधिकारी उपस्थित होऊन मार्गदर्शन केले.
#Election
बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ दिल्यास, खऱ्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा येईल आणि आरक्षणाचा मूळ उद्देशच सफल होणार नाही. बंजारा समाज हा मूळतः आदिवासी समाज नाही. त्यांच्या चालीरीती, संस्कृती आणि इतिहास आदिवासी जमातींपेक्षा वेगळे आहेत.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
संपूर्ण जिल्हाध्यक्ष , पदाधिकारी, व कार्यकर्ता यांना सूचित करण्यात येत आहे कि,सद्या चालू असलेल्या हेंद्राबाद गॅझेट धरतीवर बंजारा समाज आदिवासी समाजात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. @MTAforIndia खपवून घेणार नाही त्याबद्दल आपण आपआपल्या जिल्हात बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा.
आज मानवतेला निसर्गाशी संतुलित संबंध राखणारी जीवनशैली हवी आहे, जी आपण आदिवासी समुदायांकडून शिकली पाहिजे. भारतीय आदिवासींच्या विशेष संवैधानिक हक्कांचे संरक्षण करण्याची आणि या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्याची आपल्याला गरज आहे.
#जागतिक_आदिवासी_दिन#worldindigenouspeopleday@UN
विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा
#14april2025
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर मा.प्रा. अशोकजी उईके साहेब, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगडे,करण देवतळे सर,आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर यांचे स्वागत करतांना, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी चे जिल्हाध्यक्ष बबन पेंदोर.
@drashokuike_mla@collectorchanda
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अद्वितीय योद्धा, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
महाराजांचा पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेसाठी केलेला संघर्ष सदैव प्रेरणादायी राहील.
जय भवानी! जय शिवाजी!
#ShivajiMaharaj#MTAforIndia#maharashtra
सर्व जिल्हाध्यक्ष व महासचिव यांना कळविण्यात येते की,आपल्या जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती झाली तेंव्हा पासून ते आजपर्यंत जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने केलेल्या संघटनात्मक कामकाजाचा अहवाल तयार करावा.
#MTAforIndia
महाराष्ट्र ट्रायबल आघाडी च्या सर्व जिल्हाध्यक्ष व महासचिव यांना कळविण्यात येते की,आपल्या जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती झाली तेंव्हा पासून ते आजपर्यंत जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने केलेल्या संघटनात्मक कामकाजाचा अहवाल तयार करावा.
बिरसा मुंडा म्हणजे स्वातंत्र्यलढ्याचे नायक. जे युद्ध ते ब्रिटिश साम्राज्याशी लढत होते. तेच जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचा लढा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना लढावं लागतंय. आज #धरती_आबा_बिरसा_मुंडा जयंतीनिमित्त अभिवादन...💐
#भगवान_बिरसा_मुंडा