आदित्यच्या बगलबच्यांनी अमित ला बोलता येत नाही असा narrative सेट करण्याचा पोकळ प्रयत्न केला,
पण या तरुणाने असल्या पांचट गोष्टीला भीक घातली नाही…
पहा या पत्रकारला कशी उत्तर दिलीत आणि “मै हिंदू हू” हे पत्रकाराला बोलायला भाग पाडलंय अमित ठाकरेंनी 🔥!!!
अमित ठाकरे जिंकलात....❤️❤️
धनुष्यबाण बाळासाहेबांनी कमावलेले चिन्ह आहे,तर रेल्वे इंजिन राजसाहेबांनी....बाळासाहेबांचा धनुष्यबाण चुकीच्या पद्धतीने लावलाय हे तुम्ही सरवणकर ह्यांना दाखवून दिलेत....बाळासाहेब म्हणत असतील खरंच मी चुकीच्या हातात धनुष्यबाण देऊन निघून आलो...राजला दिला असता तर आज त्याच्या मुलाने पण तो सांभाळला असता...
आज राजसाहेब , त्यांच्या आई, तसेच अमित ठाकरे, सौ. शर्मिला राज ठाकरे, सौ.मिताली अमित ठाकरे आणि उर्वशी राज ठाकरे मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळची क्षणचित्रं.
#Vidhansabha2024
"आमच्या लढ्याला यश मिळालं!!"
आज वर्षानुवर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोल विरोधात दिलेल्या लढ्याला यश मिळालं आहे. टोलमाफी आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या टोलनाक्यांचा मुद्दा हा सर्वप्रथम मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ह्यांनी उचलून धरला.
त्यांच्या नेतृत्वात मुंबईच्या टोलनाक्यांवर महाराष्ट्र सैनिकांनी अनेकदा आंदोलने केली. स्वतः सन्माननीय राजसाहेब ह्यांनी सुद्धा टोलनाक्यांवर वाहनांच्या होणाऱ्या गर्दी विरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला. आज मंत्रीमंडळाच्या अखेरच्या बैठकीत मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाबद्दल राज्यसरकारचे आभार आणि सन्माननीय राजसाहेब व टोल विरोधी आंदोलनात सामील प्रत्येक महाराष्ट्रसैनिकाचे मनःपूर्वक अभिनंदन!!
#RajThackeray #Maharashtra #TollNaka #MNS
मालाड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ १३ ऑक्टोबर रोजी भयंकर घटना घडली. पक्षाचे तरुण कार्यकर्ते आकाश माईन यांच्यावर जमावाने हल्ला केला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले, पुढे रात्री रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेवर पक्षाचे नेते श्री. संदीप देशपांडे यांनी एएनआयशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
#MNSAdhikrut
"आरक्षण देणं शक्य नाही हे सगळ्यांना माहित आहे पण फक्त बोलायची हिंमत फक्त माझ्या हातात आहे. मतांसाठी आज तुम्हाला भूलथापा देत आहेत. माझी इच्छा आहे कोणताही समाज हा हाताला कामाशिवाय राहू नये."
राज ठाकरे ।
१३ ऑक्टोबर २०२४, मुंबईतील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यातून बोलताना
चला महाराष्ट्राचे नवनिर्माण घडवूया !
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व मनसैनिकांनी सज्ज होऊया आणि आपल्या राजाच्या पाठीशी खंबीर उभे राहून उज्वल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया आणि भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेरोजगारी, शिक्षणाचा ढासळता दर्जा, ढासळती कायदा सुव्यवस्था या सर्व नरकासुरांचा यंदाच्या दिवाळी बरोबरीने; विधानसभेमध्ये जिंकून वध करूया !
चला मनसेच्या विकासाच्या रेल्वे इंजिनाला न भूतो न भविष्य अशी गती देऊया.
विधानसभेला नवा महाराष्ट्र घडवूया !
आज नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान मी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे
१) मी माझ्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा मराठवाड्यापासून सुरु केला, जो टप्पा मी आज छत्रपती संभाजीनगरला पूर्ण केला. मी माझा दौरा आवरता घेतला अशा बातम्या माध्यमांमध्ये वाचल्या. मी कुठला दौरा आवरता घेतला? मी माझ्या दौऱ्यातील गॅप्स कमी केल्या, काही ठिकाणी मुक्काम होता, तो मुक्काम न करता पुढच्या ठिकाणी पोहचलो आणि तिथे बैठका घेतल्या इतकंच.
२) सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो जे सगळ्यानी ऐकलं, पण त्याच्या नंतर ज्या बातम्या केल्या गेल्या त्या जाणीवपूर्वक होत्या म्हणजे राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा अशा वाट्टेल त्या बातम्या केल्या. मी २००६ ला पक्ष स्थापनेपासून सांगत आलो आहे की आरक्षण जे आहे ते आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. आणि त्याउपर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरंतर आरक्षणाची गरज नाही. कारण इथे रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत की त्या जर आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींना मिळतील असं बघितलं तर आरक्षणाची मग ते शिक्षण असो की नोकरी यांत आरक्षणाची गरजच पडणार नाही.
३) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्याना आरक्षण द्यावं पण आपल्याकडे जातींना आरक्षण दिलं जातं आणि मग स्वतःच्या राजकारणासाठी जातींचा वापर केला जातो. जरांगे पाटील यांचा खरंतर माझ्या दौऱ्याशी काहीच संबंध नव्हता, पण जरांगेच्या आंदोलनाचा वापर करून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी यांनी राजकारण केलं आणि यातला दुर्दैवाचा भाग म्हणजे मराठवाड्यातील काही पत्रकार ज्यांची नावं मला माहित आहे, त्यातल्या कोणी कशी काँट्रॅक्टस घेतली, कशा गाड्या घेतल्या हे सगळं मला माहित आहे. मी धाराशिवला असताना मला भेटायला लोकं आले होतं त्यांना भडकवायचं काम पत्रकरांनी केलं. मी जेंव्हा वर या म्हणलं तेंव्हा त्यांना खाली घेऊन जाणारे पत्रकार होते...
४) मग पुढे मी जेंव्हा निदर्शन करणाऱ्यांशी बोललो तेंव्हा त्यातल्या दोन जणांचे फोटो शरद पवारांसोबतचे होते. ते फोटो जुने होते असं त्यांचं म्हणणं आहे . तुतारीसोबतचे फोटो जुने कसे असतील? आणि २ जणं उद्धव ठाकरे गटाचे होते. परवा मी नांदेडला होतो तेंव्हा गेस्टहाऊसच्या बाहेर जे घोषणा देत होते त्यांचे फोटो पण शरद पवारांसोबतचे आहेत. काल बीडमध्ये जे झालं त्यात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता.
५) लोकसभेच्या निकालांनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना वाटत आहे की त्यांना मराठवाड्यात भरघोस मतदान जे झालं ते या दोघांकडे बघून झालं, या दोघांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे जे मतदान झालं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातील मतदान झालं. मुस्लिम समाजाने देशभर मोदींच्या विरोधात मतदान इथे किंवा देशभर झालं किंवा दलित बांधवांना संविधान बदलणार असं वाटलं आणि त्यांनी मोदींच्या विरोधात जे मतदान केलं त्यातून हे घडलं आहे. आणि मी मागच्या पत्रकार परिषदेत बोललो तसं संविधान बदलणार हे भाजपचे काही लोकं बोलले आणि त्यातून नरेटिव्ह तयार झालं. आणि त्यांना विधानसभेला पण अशीच खेळी करावीशी वाटली.
६) काल निदर्शनं करणाऱ्या उद्धव गटाच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या लोकांनी चांगला चोप दिला आणि तो जाताना ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा. म्हणजे काय यांना जरांगेच्या आंदोलनाच्या आड स्वतःच विधानसभेचं राजकारण करायच आहे.
७) शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल... पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत.
८) शरद पवारांचं राजकारण जाती-जातीत द्वेष निर्माण करणं हेच आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुरु आहे.
९) यांनी माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या माझं जर मोहोळ उठलं ना तर याना एकही सभा घेता येणार नाही. यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. मी मागे म्हणलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्यामागे विस्थापित आहेत. माझी पोरं काय करतील यांना कळणार पण नाही
https://t.co/12f6xYAuBH?
सस्नेह जय महाराष्ट्र,
काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती.
माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता.
ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या.
बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं.
मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली.
मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.
माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे.
आणि लोकं हे पण म्हणतील तुम्ही मुद्द्याचं बोलताय, तुम्ही गुद्दे पण देताच की... हो आम्ही देतो गुद्दे....
महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिलेत आणि यापुढे देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका.
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे.
महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू.
यांत काही मोजके पत्रकार, त्यांच्या हातातील वर्तमानपत्र असो की एखादं चॅनेल, याचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरायचं सोडून, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर करत आहेत हे उघड झालं.
समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही. मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे आणि त्यातून जो वणवा पेटतोय त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका.
जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा.
आपला
राज ठाकरे
घरोघरी जावून स्वाक्षरी मोहीम ...
नवी मुंबईकरांचा तूफान प्रतिसाद ...
उद्योगांमध्ये 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत ...
मनसेचा रोजगार हक्क सप्ताह ...
सोबत विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे आणि सहकारी ...
#८०टक्के_स्थानिक_तरुणांना_नोकऱ्या
#80PercentJobsForLocal
#स्थानिकांनारोजगार #mns #मनसे
राज ठाकरे यांचा ताफा संभाजीनगरहून पुण्याकडे येत असताना वाटेत काही नागरिकांनी अहमदनगर रस्त्यावर हात दाखवून ताफा थांबवला आणि फोटो साठी विनंती केली.. त्यांच्या ह्या हाकेला मा. राजसाहेबांनी त्वरित प्रतिसाद देत सर्वांना फोटो घेऊ दिले.
#MNSAdhikrut#नवनिर्माण_यात्रा
ओ लवंडे… सकाळी भोंगा वाजवला नेहमीसारखा.. पुढच्यावेळी तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळेस, मी स्वतः येऊन आंदोलन करेन. त्यासोबतच काल शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा गट) शेण खात असताना मी तिथेच उभा होतो.. महाराष्ट्र सैनिक आहोत आम्ही..🚩