📌 महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२६
विलास नवनाथ घुले खून प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा.
मतदारसंघातील विलास नवनाथ घुले यांच्या २० जून रोजी झालेल्या हत्येप्रकरणी सभागृहात आवाज उठवला. सीसीटीव्हीमध्ये आरोपी स्पष्ट दिसत असतानाही नऊपैकी फक्त तीन आरोपींना अटक झाली आहे. उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
#खूनप्रकरण #कठोरकारवाई #विलासनवनाथघुले #कारवाई #महाराष्ट्रविधिमंडळअधिवेशन2026
📍परिचय मंगल कार्यालय, अंबाजोगाई
परिचय मंगल कार्यालय, अंबाजोगाई येथे श्री. स्वप्निल सिद्धांती यांचे चिरंजीव ��िन्मय यांच्या व्रतबं�� (मुंज) संस्कार सोहळ्यास उपस्थित राहिले. या मंगल प्रसंगी सिद्धांती परिवाराची भेट घेत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#अंबाजोगाई #व्रतबंध #मुंज #भेट #शुभेच्छा #संवाद #namitamundada
📍अंबाजोगाई
रमजान ��द सणानिमित्त आज अंबाजोगाई शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरी सदिच्छा भेटी देऊन त्यांच्या आनंदात मनापासून सहभागी झाले. तसेच, कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईद हा केवळ सण नाही, तर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश देणारा उत्सव आहे. समाजात एकता, आपुलकी आणि सौहार्द कायम राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
#eidmubarak #रमजान #ईद_मुबारक #शुभेच्छा
📍राजस्थानी मंगल कार्यालय, अंबाजोगाई
रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आयोजित दावत-ए-इफ्तार कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. संयम, श्रद्धा आणि परस्पर आदराचा संदेश देणाऱ्या या पवित्र महिन्यामुळे समाजातील सौहार्द अधिक दृढ व्हावे, हीच सदिच्छा.
या प्रसंगी अंबाजोगाईचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा, श्री. अक्षय मुंदडा तसेच अंबाजोगाई व परिसरातील मुस्लिम बांधव मो��्या संख्येने उपस्थित होते.
#अंबाजोगाई #रमजान #दावतेइफ्तार #सामाजिकसौहार्द
#राजस्थानी_मंगलकार्यालय
📍अंबाजोगाई
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, या भावनेतून जागतिक महिला दिन व माझ्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व माधवबाग क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने केज विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी रक्त तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे ��योजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये अत्यल्प शुल्कामध्ये विविध आरोग्य तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होते.
या प्रसंगी उपस्थित राहून आयोजकांचे अभिनंदन केले तसेच नागरिकांशी संवाद साधला.
#अंबाजोगाई #आरोग्याशिबीर #HealthCamp #WomensDay #CommunityHealth
📍 आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबा���ोगाई
८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास उपस्थित राहिले.
केज विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या बचत गटांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या SEED (Scheme for Economic Empowerment of Denotified, Nomadic and Semi-Nomadic Communities) या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात आली आहे.
या योजनेतून प्रत्येक महिला बचत गटाला
RF – (Revolving Fund) फिरता निधी : ₹२५,०००
EPA – (Entry Point Activity) सामाजिक उपक्रमासाठी निधी : ₹२५,०००
असा प्रत्येक बचत गटाला एकूण ₹५०,००० निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत ५० महिला बचत गटांना मिळून एकूण ₹२५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
RF (फिरता निधी) चा उपयोग करून महिला बचत गट पुढीलप्रमाणे विविध लघुउद्योग सुरू करणार आहेत शिवणकामासाठी शिलाई मशीन, पिठाची गिरणी सुरू करणे, मसाला तयार करण्याचा व्यवसाय, शेळीपालन, शेवया तयार करणे तसेच दुग्ध व्यवसाय.
EPA (Entry Point Activity) निधीच्या माध्यमातून गावामध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत गावात सिमेंट बेंच बसवणे, पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे तसेच गावाच्या स्वच्छता व सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे.
भविष्यात या महिला बचत गट��ंनी नियमित बचत व व्यवसायातून उत्पन्न वाढविल्यास मोठे व्यवसाय उभारण्यासाठी बँकेमार्फत कर्जसुविधा मिळू शकते. तसेच योग्य नियोजन केल्यास शासनाच्या विविध योजनांमधील लाभांचाही उपयोग करता येईल.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी मोठी चालना मिळणार आहे.महिलांनी एकत्र येऊन बचत, उद्योग आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग निवडाव��, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती अश्व��नी सोनवणे-जिरंगे मॅडम, श्रीमती शोभा लटपटे (बालविकास प्रकल्प अधिकारी, केज), श्रीमती शुभांगी शिरसागर (बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंबाजोगाई) व इतर मान्यवर उपस्थित होते.
#MahilaSashaktikaran #WomenEmpowerment #SelfHelpGroups #VasundharaSevaPratishthan
#केज
आरोग्य, जलसंधारण व महिला सक्षमीकरण योजनांबद्दल सरकारचे अभिनंदन; अंबाजोगाईत ‘उमेद मॉल’ची मागणी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्य, जलसंधारण व महिला सक्���मीकरण योजनांबाबत शासनाचे अभिनंदन केले. रेअर ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी मो��त उपचार व कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसीमुळे परवडणारे उपचार उपलब्ध होत असल्याचे नमूद केले.
तसेच जलसंधारणातील कामगिरीमुळे महाराष्ट्राला ‘बेस्ट स्टेट’ नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. उमेद अभियानातून ६.६ लाख महिला बचत गट, ६४ लाख कुटुंबांना बँक क्रेडिट व २६ लाख ‘लखपती दीदी’ तयार झाल्याचे सांगत अंबाजोगाईत ‘उमेद मॉल’ सुरू करण्याची मागणी केली.
#MaharashtraVidhimandal #ArthsankalpAdhiveshan #ArogyaYojana #Jalsandharan #UmedAbhiyan #MahilaSakshamikaran #UmedMall #Ambajogai
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात आणि संबंधित गुत्तेदारांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी सभागृहात केली.
#महाराष्ट्रविधिमंडळ#अर्थसंकल्पीयअधिवेशन2026 #जलजीवनमिशन #पाणीपुरवठायोजना #केज
📍 आर्यवीर मंगल कार्यालय, अंबाजोगाई
अंबाजोगाई मार्केट कमिटीचे संचालक श्री. राजुशेठ भन्साळी यांच्या चिरंजीव धनराज यांच्या विवाह प्रीत्यर्थ आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून , उभयतांच्या सुखी, समृद्ध आणि मंगलमय वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या.
या प्रसंगी आदरणीय श्री. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) आणि अक्षय मुंदडा हे देखील उपस्थित होते.
#विवाहसोहळा #वैवाहिकसमारंभ #अंबाजोगाई #आर्यवीरमंगलकार्यालय #आशीर्वाद #नववधूवरांना_शुभेच्छा
#आनंदसोहळा #मंगलमयवैवाहिकजीवन
📍 अंबाजोगाई
🪷 भाजप पक्षप्रवेश
अंबाजोगाई येथील युवा कार्यकर्ते श्री. उज्जैन बनसोडे, श्री.महेश उर्फ गुड्डू जोगदंड, श्री.योगेश माने, श्री.गौतम शिंदे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भारती�� जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली.
या प्रवेशप्रसंगी आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या उपस्थितीत सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
#अंबाजोगाई #भाजप #पक्षप्रवेश #युवा_शक्ती #BJP #PoliticalJourney #TeamBJP #namitamundada #BJPMaharashtra #Leadership #सशक्तयुवा
📍 अंबाजोगाई
🪷 भाजप पक्ष प्रवेश
दक्ष पोलीस मित्र परिवार फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या अध्यक्षा सौ. सरिता सचिन बैरागी यांनी आपल्या म���िला सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा क्षेत्रात सक्रिय योगदान देत असलेल्या या महिला कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशनामुळे भाजपला नवचैतन्य प्राप्त झाले असून पक्षशक्ती आणखी बळकट झाली आहे.
या प्रवेशसोहळ्यात कल्पना व्यंकट चौधरी, ताई रमेश्वर इंगळे, मंगल सुरेश इंगळे, वच्छला बजरंग शिनगारे, लक्ष्मी अरुण मंत्री, शिंदु शाम मंडे, शिवकन्या आका��� शिंदे, प्रतिभा अविनाश शिंदे, आरती शंकर कटप, पंचफुला बबन कांबळे आणि तेजस्विनी दुर्वास काटे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
सर्व नव्या��ं प्रवेश केलेल्या भगिनींचे भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये मनःपूर्वक स्वागत करत, त्यांच्या आगामी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या.
#अंबाजोगाई #भाजप #पक्षप्रवेश #महिलासक्षमीकरण #महिलाशक्ती #दक्षपोलीस_मित्रपरिवार #महाराष्ट्र #MahilaSashaktikaran #MahilaShakti #WomenEmpowerment #BJPLeadership #BhartiyaJanataParty
📍अंबाजोगाई
अंबाजोगाई शहरातील ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक श्री. सुदर्शन अप्पा काळे यांनी आपल्या समर्थकांसह ���ज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात मनःपूर्वक स्वागत केले. पक्षाच्या विचारधारेवर ठेवलेला त्यांचा विश्वास आणि समाजहितासाठी काम करण्याची त्यांची तयारी याबद्दल श्री. अक्षय मुंदडा यांच्या समवेत अभिनंदन करत त्यांना पुढील यशस्वी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
@BJP4Maharashtra
#BJP #Ambajogai #PoliticalEntry #अंबाजोगाई #केज #NewBeginnings #partywelcome #namitamundda #भारतीयजनतापार्टी
📍 अंबाजोगाई
🪷भाजप पक्ष प्रवेश
अंबाजोगाई येथील समाजकार्यात सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते श्री. आर्��न मांदळे यांनी आपल्या मित्रपरिवारासह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक दृढ केली. नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करून पुढील यशस्वी राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा प्रधान केल्या.
युवा पिढीची ��र्जा, नवी दृष्टी आणि समाजातील बदलासाठीची तयारी हे कोणत्याही राजकीय संघटनेचे महत्त्वाचे संपत्तीस्थान असते. आर्यन मांदळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे अंबाजोगाई परिसरात पक्षकार्याला निश्चितच नवे बळ मिळणार आहे.
या प्रवेशप्रसंगी आदरणीय श्री. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) आणि अक्षय मुंदडा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4Maharashtra
@MundadaAkshay
#BJP #ambajogai #अंबाजोगाई #BJPGovernment
#केज #namitamundda #भारतीयजनतापार्टी
#BJP4IND
अंबाजोगाई येथील युवा कार्यकर्ते श्री. उज्जैन बनसोडे, श्री. महेश उर्फ गुड्डू जोगदंड, श्री. योगेश माने आणि श्री. गौतम शिंदे तसेच त्यांचे सहकारी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सहभागामुळे स्थानिक संघटन���त्मक बळात निश्चितच महत्त्वाची वाढ झाली आहे.
या निमित्ताने आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्यासह सर्वांचे स्वागत करत त्यांना आगामी राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
#अंबाजोगाई #भाजप #पक्षप्रवेश #युवा_शक्ती #BJP #PoliticalJourney #TeamBJP #namitamundada #BJPMaharashtra #Leadership #सशक्तयुवा
पोलिस मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सपना निखिल डहाळे यांची भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या औचित्याने संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
समाजकार्यासाठी पक्षाचे धोरण आणि कार्यपद्धती उपयुक्त असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे संघटनेला निश्चितच बळकटी मिळणार आहे.
प्रवेश करणाऱ्या सन्माननीय महिला कार्यकर्त्यांमध्ये रमल गोरे, शीतल गायकवाड, रेश्मा मारकळ, सुनिता काळे, राधा बावणे, मंगल जाधव, सविता शिंदे, अरुणा शिंदे, सुनिता साळुंके, अशा देशमाने, शोभा देशमाने, सीता हतागळे, अलका हतागळे, सुनिता जाधव, अश्विनी पिसाळ, रेणुका कुलकर्णी, तारामती घाडगे, कौशल्या कांबळे, वंदना गायकवाड, माया सकट, शकु सोनवणे, सविता डाके, निशा तरकसे, लखन कांबळे आणि निखिल डहाळे यांचा समावेश आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून सर्वांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
@BJP4Maharashtra
#भाजप #BJP #सामाजिकसेवा #राजकीय_सक्षमता #संघटनाशक्ती #महिला_सक्षमीकरण
#namitamundda #ambajogai #केज #भारतीयजनतापार्टी #पक्षप्रवेश #NewBeginnings
#शुभेच्छा #अभिनंदन
📍अंबाजोगाई – प्रभाग क्रमांक १५
🪷भाज�� पक्ष प्रवेश
अंबाजोगाई येथील श्री. सौरभ आनंद कांबळे, रहीम शेख, विनय जगदाळे, अब्दुल शेख, रेहान पठाण, शिवम कसबे, सुशांत भालेराव, ऋतुराज घाडगे, विश्वजीत गंडले, सुमित गायकवाड, चैतन्य शेप, कृष्णा मुंडे, अशोक मोरे, राम मिसाळ, सुमित भगत, अजय कसबे, सागर गोरे, वैभव शिंदे, गणेश चव्हाण, हिमांशू गायकवाड, सुमित मोहिते व प्रीतम गायसमुद्रे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक दृढ केली. नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करून पुढील यशस्वी राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
या प्रवेशप्रसंगी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4Maharashtra
#namitamundda #ambajogai #अभिनंदन #पक्षप्रवेश #केज #NewBeginnings #BJPGovernment #BJPNEWS #भारतीयजनतापार्टी
भगवान बि���सा मुंडा यांचे विचार आजही आपल्याला धैर्य, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा देतात.
📍 अंबाजोगाई
आदिवासी लढ्याचे अग्रणी, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांना १५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
आदिवासी समाजातील नागरिक, विद्यार्थ���, महिला बचतगट, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उत्��्फूर्त सहभागामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी बिपिनदादा शिरसागर, राजाभाऊ वामनराव ठाकूर, प्रा.हनुमंत साळुंखे, तानाजी देशमुख, विशाल केंद्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
#भगवान_बिरसामुंडा #BirsaMunda150 #अंबाजोगाई #बिरसामुंडा१५०वीजयंती #लोकनायक #आदिवासी_गौरव
#धैर्य_स्वाभिमान_संघर्ष #namitamundda #राष्ट्रीयनायक #प्रेरणादायीकार्यक्रम
📍 अंबाजोगाई
अरुच आणि श्री. हर्षदीप जगन सरवदे यांच्या ‘The O2 Clothing’ या नवीन दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून सरवदे परिवाराच्या नवीन व्यवसायाला मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या.
या नव्या व्यवसायाने स्थानिकांना उत्कृष्ट सेवा आणि विश्वासार्ह गुणवत्ता देत प्रगतीची नवी वाट खुली होवो, ही सदिच्छा व्यक्त केली.
#अंबाजोगाई #TheO2Clothing #नवीनदुकानउद्घाटन #व्यवसायउद्घाटन #स्थानिकव्यवसाय #namita_mundada #मनःपूर्वक_��ुभेच्छा #उद्योगप्रोत्साहन