आमचे मार्गदर्शक भाजपा मुंबई सचिव, भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय सदस्य तसेच तामिळनाडू राज्य प्रभारी आदरणीय प्रतीकजी कर्पे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
@CAPratikKarpe
आजच्या या ऐतिहासिक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मानवतेच्या, समतेच्या, न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. हा दिवस आपल्या समाजासाठी परिवर्तनाचा आणि क्रांतिकारी विचारांचा प्रतीक आहे.
#DhammaChakraPravartanDin
संघ शक्ती युगे युगे !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाच्या औचित्याने विजयादशमी पथसंचलन आज पार पडले. घाटकोपरच्या वीर सावरकर नगरच्या पथसंचलनात सहभागी होत विजयादशमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
#RSS100@RSSorg
One of the best moments in my life as a karyakarta to get an opportunity to greet one of the worlds most powerful leader And our Hon PM Shri @narendramodi ji during his Mumbai visit yesterday
Thankful to our popular leader Hon Deputy CM @Dev_Fadnavis ji Hon @BJP4Mumbai President MLA Adv Shri @ShelarAshish ji for giving this opportunity
#ModiFor2029
महाराष्ट्राच्या राजकारणात असं एकच व्यक्तिमत्व होऊन गेलं...जिथे सर्वस्वी जनतेतून न्याय दिला जायचा आणि ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. साहेबांच्या विचारांचा वारसा आजही आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. आज त्यांच्या स्मृतीदिनी नतमस्तक होऊन स्व. दिघे साहेबांना वंदन करूया
#आनंद_दिघे
समाजाला भक्ति मार्गाला लाऊन, समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यातून बाहेर काढत ज्ञान, कर्म मार्गाची शिकवण देणारे "ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत श्रद्धेय श्री भगवान बाबा " यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !!
#BhagwanBaba#JayBhagwan
शिवराम हरी राजगुरू यांचे शौर्य, देशाप्रती बांधिलकी आणि निःस्वार्थ बलिदान आजही असंख्य भारतीयांना प्रेरणा देत आहे. देशाच्या तरूण पिढीसाठी देशप्रेम आणि त्यागाचे प्रतीक असणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#Rajguru#Shivramharirajguru#revolution
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत क्रांतीकारी शाहिरीतून योगदान देणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते.कष्टकरी, दिनदुबळ्या लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला.
त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
#AnnaBhauSathe
कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने भारत मातेचं स्वातंत्र्य आणि गौरव अबाधित ठेवण्यासाठी आपलं सर्वस्व त्याग करणाऱ्या वीरांना नमन ! हा विजय दिवस आपल्या लष्कराच्या असीम शौर्याचं स्मरण आहे. मातृभूमी प्रती समर्पणाची ही प्रेरक गाथा सदैव दीपस्तंभ असेल !🇮🇳
#KargilVijayDivas#Indianarmy
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" अशी गर्जना करणारे ब्रिटिश सत्तेविरोधातील भारतीय असंतोषाचे जनक, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, प्रखर वक्ते, निर्भीड पत्रकार आणि लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#BalGangadharTilak
"हम आजाद हैं और आजाद ही रहेंगे" हा बाणा जपत शेवटपर्यंत स्वतःला इंग्रजांच्या हाती न लागू देणारे भारतीय क्रांतिकारक, देशाच्या स्वातंत्र्यासाठी निधड्या छातीने प्राणांचे बलिदान देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#chandrasekharazad
आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणाऱ्या, स्वप्नांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि एक आदर्श नागरिक आपण बनावं म्हणून आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना 'गुरुपौर्णिमा'निमित्त कोटी-कोटी प्रणाम!
#गुरुपौर्णिमा