निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा...!
संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा...!
होळी व धुलीवंदना निमित्त नागरिकांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन पर्यावरण पुरक पाच रंगाचा समावेश असलेला संच दिले आणि #होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या !!
@Dev_Fadnavis
#Holi2026 #धुलीवंदन #होळी #EnvironmentClimateChange #Maharashtra #पर्यावरण
सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करून देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय श्री. @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अंत्योदयाचा ध्यास बाळगून देशातील शेवटच्या घटकाला विकासाचा स्पर्श देण्याचे प्रेरणादायी कार्य मा.मोदीजी करत आहात, या कार्यासाठी, विकसित आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी त्यांना आरोग्यपूर्ण सुदीर्घ जीवन लाभो अशी प्रार्थना करते!
#HappyBdayPMModi #HappyBirthdayModiji
वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज अंबाजोगाई शहरात आयोजित सभासदांच्या मेळाव्याला संबोधित केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या विजयात मताधिक्याच्या माध्यमातून योगदान देण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, शिवाजीराव सिरसाठ, बबनराव लोमटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अंबाजोगाई शहरातील मोंढा भागात आज शहरातील व्यापारी आणि वैद्यनाथ बँकेच्या सभासदांशी संवाद साधला. वैद्यनाथ बँक संचालक मंडळ निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. जेष्ठ नेते नंदकिशोर काका मुंदडा, अक्षय भैया मुंदडा आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
#वैद्यनाथबँक #VaidynathBank
आज धारूर येथील वैद्यनाथ बँकेच्या सभासदांशी संवाद साधला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.
#वैद्यनाथबँक#VaidynathBank
वैद्यनाथ सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारार्थ वडवणी, माजलगाव, गेवराई आणि बीड येथील सभासदांशी संवाद साधला.
सभासदांनी ना. @Pankajamunde ताई यांच्या आश्वासक नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा' पॅनलच्या पाठीशी उभे राहण्याच्या निर्धार व्यक्त केला.
ना. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व बँकेच्या उज्वल भवितव्याची हमी असल्याने आणि बँकेचे लौकिक वाढवण्यासाठी, सहकार क्षेत्रात बँकेची प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी येत्या १० ऑगस्ट रोजी ‘विमान' या चिन्हावर शिक्का मारून भरगोस मतांनी सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
आज नियोजित कार्यक्रमानिमित्त शिरूरकडे जाताना स्थानिक कार्यकर्त्यांनी आपुलकीने केलेले स्वागत स्वीकारले.
तसेच शिरूर येथे श्री प्रकाश देसरडा यांच्या निवासस्थानी भेट दिली, त्यांनी केलेल्या अगत्यपूर्वक सन्मानाचा स्वीकार करून देसरडा कुटुंबाशी संवाद साधला.
आज नियोजित कार्यक्रमासाठी पाटोदा तालुक्याकडे जाताना पुत्रदा एकादशीच्या मंगलदिनाच्या औचित्याने राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे सावरगाव घाट येथे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी ग्रामस्थांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले, त्यांच्याशी संवादही साधला.
#संत_भगवान_बाबा#भगवानबाबा#सावरगावघाट
आष्टी आणि पाटोदा येथे आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारार्थ सभासदांशी संवाद साधला. वैद्यनाथ बँक सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे ना. @Pankajamunde ताई यांच्या आश्वासक नेतृत्वामुळे पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार याप्रसंगी सभासदांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय श्री. विनोद जी तावडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपले संघटन कौशल्यातील प्राविण्य आणि संवादातील नैपुण्य भारतीय जनता पक्षाला नित नवे आयाम स्थापित करण्यासाठी सानुकूल ठरत आहेत. निस्पृह सेवावृत्ती आणि समर्पनातून आपण करत असलेले पक्षकार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि इच्छित कार्य पूर्ण करण्याची शक्ती प्रदान करो अशी प्रार्थना आपल्या वाढदिवसानिमित्त करते.
@TawdeVinod@BJP4India
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु जी, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।
प्रभू वैद्यनाथ जी से आपकी दीर्घायू और स्वास्थ्य की कामना करती हूं।
@rashtrapatibhvn#HappyBirthday
📍रामटेक, मुंबई.
आमचे जेष्ठ बंधू खासदार श्रीमंत छत्रपती श्री.उदयनराजे भोसले महाराज यांनी आज रामटेक या माझ्या शासकीय निवासस्थानी प्रथमच सदिच्छा भेट दिली.
यावेळी रामटेकवर महाराजांचे हृदयपूर्वक स्वागत केले. यानंतर मुंडे साहेब आणि महाराजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कौटुंबिक संवाद साधला.
याप्रसंगी आ.सीमाताई हिरे या देखील शिष्टमंडळा समवेत उपस्थित होत्या..
@Chh_Udayanraje@MlaSeemaHiray
मध्य प्रदेशच्या भेडाघाट येथे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात शिवलिंगाचे पूजन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य मोठे आहे. याचाच सार भेडाघाट इथेही दिसून आला. नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेले हे शिवालाय अहिल्यादेवीनीं स्थापन केलेले आहे. त्यांच्या धार्मिक बांधिलकीची साक्ष देणाऱ्या मंदिरात पूजन करून आत्मिक प्रसन्नता लाभली.
#ahilyabaiholkarat300 #अहिल्यादेवी
@BJP4India@BJP4MP@BJP4Maharashtra