जनतेशी सातत्यपूर्ण संवाद, त्वरित सेवा आणि लोकहिताची बांधिलकी अधिक दृढ करत हे कार्यालय समाजसेवेचे सक्षम केंद्र बनेल, हीच सदिच्छा.
@ravindrachavanofficial @niranjandavkhare @madhavinaikbjp @mi_sandeeplele @KrishnaDadu@bjp4maharashtra
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार मा. अॅड. माधवीताई नाईक यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित पार पडला.
जिल्हा सरचिटणीस डॉ. समीराताई भारती, विक्रम भोईर, भारतीय जनता पक्षाचे सन्मा. नगरसेवक - नगरसेविका तसेच भाजपा, ठाणे शहर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच समन्वय प्रतिष्ठान आयोजित मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार मा. श्री. संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधत शिबिरातील विविध आरोग्य सुविधा, तपासणी व उपचार व्यवस्थेची पाहणी केली. सर्वसामान्य नागरिकांना मोफत, दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अत्यंत मोलाचे असून, निरोगी समाज घडविण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल आहे
राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री. विनोदजी तावडे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास निरोगी, आनंदी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य लाभो. आपल्या नेतृत्वातून समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@TawdeVinod
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे अग्रदूत, महान क्रांतिकारी मंगल पांडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दाखवलेले अद्वितीय शौर्य, राष्ट्रभक्ती आणि बलिदान आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
#मंगलपांडे#मंगलपांडेजयंती#mangalpandey
श्रेष्ठ लेखक, कवी व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक समतेसाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#अण्णाभाऊसाठे#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे#annabhausathe
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन धावण्यासाठी सज्ज! 🇮🇳🚆
भारतीय रेल्वे आता डिझेल किंवा विजेवर नाही, तर थेट हायड्रोजनवर धावणार! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हरियाणाच्या जिंदमधून भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत. प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण!
#HydrogenTrain
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी एक मोठा निर्णय!
राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ₹48,000 कोटींचे थकीत वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीला नवसंजीवनी मिळण्यास मदत होईल.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा आता ५० हजार रुपयांवरून २ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पीक कर्ज भरण्याची अटही रद्द करण्यात आली असून अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
"भक्तीमार्गातून साधण्या प्रपंचात परमार्थ,
आदेशाने निवृत्तीच्या ज्ञानदेवांनी मांडला गीतेचा अर्थ." 🙏🚩
नाथ संप्रदायाचे आद्य संत, संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या अध्यात्म, वैराग्य आणि भक्तीच्या शिकवणीस कोटी कोटी प्रणाम.