मोहरमच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्वांच्या परिवारात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो. मानवतेचा मार्ग अधिक दृढ होवो, हीच प्रार्थना. मोहरम निमित्त शुभेच्छा!🌟
#Blessings#FamilyWellbeing#Muharram#GoodVibes#शुभेच्छा
📍 स्थळ : मोखाडा तालुका, विक्रमगड विधानसभा क्षेत्र
🗓️ दिनांक : २५ जून २०२६
🚩 शिवसेना पदाधिकारी, बूथ प्रमुख व BLA-2 यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न! 🚩
विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील मोखाडा तालुक्यातील आसे, पोशेरा आणि खोडाळा जिल्हा परिषद गटांतील शिवसेना पदाधिकारी, बूथ प्रमुख तसेच BLA-2 प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात आणि मजबूत संघटनात्मक वातावरणात संपन्न झाली.
आगामी काळातील पक्ष संघटन बळकटीकरण, बूथ स्तरावरील कार्याचा आढावा, जनसंपर्क अभियान आणि महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गतिमान नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार सर्वच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यासाठी जनतेशी साततत्याने थेट संपर्क ठेवणे आणि जनसेवा करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले.
याप्रसंगी मा. श्री. पांडुरंग पाटील साहेब (संपर्क प्रमुख), ज्येष्ठ नेते श्री. प्रल्हाद काका कदम, तालुका प्रमुख श्री. अमोल भाऊ पाटील, विधानसभा संघटक श्री. प्रदीप वाघ, ज्येष्ठ नेते श्री. वासुदेव खंदारे, माजी सभापती श्री. युवराज गिरंधले, विभाग प्रमुख श्री. निलेश झुगरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बूथ प्रमुख, BLA-2 प्रतिनिधी आणि निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Mokhada #Vikramgad #EknathShinde #BoothPrabhari #ShivsenaMeeting
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
भारताचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाच्या राजकीय, आर्थिक आणि सामरिक पटावर अशी मुसंडी मारली आहे की, आता महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित 'लोवी इन्स्टिट्यूट'च्या ताज्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणाने यावर शिक्कामोर्तब केले असून, जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत नरेंद्र मोदीजींनी अव्वल स्थान पटकावत नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल पंतप्रधानांचे शिवसेना पक्षाकडून मन:पूर्वक अभिनंदन!
या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांनाही मोदीजींनी मागे टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन किती बदलला आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
@narendramodi
#Shivsena #EknathShinde
राज्यात समान नागरी कायदा लवकरच येणार आहे. कारण, या कायद्यासाठी शिवसेना महायुती सरकार १००% सकारात्मक आहे. कायद्याचा प्रारूप मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री मा. योगेश कदम यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
#Shivsena #EknathShinde
कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहर नियोजन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा.
— मा. राजेश क्षीरसागर, आमदार.
एमआयडीसी हद्दीतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता लवकरच होणार आहे. उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत अशी माहिती दिली आहे.
#Shivsena#EknathShinde
सायबर बुलिंगच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन, ई-स्पोर्ट्सच्या बाबत आचारसंहिता आखणे आवश्यक आहे. वयोमर्यादा, खेळण्यासंदर्भात नियमावली आखणे आवश्यक आहे.
मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार
#Shivsena#EknathShinde
साक्री विधानसभा मतदारसंघातील तापी नदी ते पांझरा नदी उगमापर्यंत नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावा. या प्रकल्पामुळे साक्री, धुळे आणि शिंदखेडा परिसरात बारमाही पाणी उपलब्ध होईल.
— मा. मंजुळा गावित, आमदार
#Shivsena#EknathShinde#maharashtra
हिंगोली, वाशिम हा हळद उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे. या भागासाठी ड्रायर उपलब्ध करुन दिले पाहिजेत तसेच सेंद्रीय हळद देशाबाहेर निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
मा.भावना गवळी, आमदार
#Shivsena#Eknathshinde
कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाबोधी संकुल उभारण्यात येत आहे. पण तरीही या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. शासनाने महाबोधी संकुल संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, ही विनंती आहे.
— मा. बालाजी किणीकर, आमदार
#Shivsena #EknathShinde
शिवसेनेचे सचिव व प्रवक्ते मा. श्री. किरण पावस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:
#Shivsena#EknathShinde
गेल्या तीन दिवसांत परिवहन खात्याशी संबंधित सलग तीन आंदोलने संवादाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या मागे घेण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील जनतेला अधिक चांगल्या आणि प्रभावी सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
— मा.ना.श्री. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
#Shivsena#Eknathshinde
वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात अधिक कडक तरतुदी करणार आहे का? तसेच, महाराष्ट्रात वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत का?याशिवाय, वणव्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येणार आहे का?
— मा. दिलीप लांडे, आमदार
#Shivsena #EknathShinde
नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा २ योजनेत अहिल्यानगरमधील काही गावांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यामध्ये संवेदनशीलता, वार्षिक पर्जन्यमान, एकूण पावसाचे दिवस, भूजलस्थिती, साक्षरता, मासिक उत्पन्न, मातीची जलधारण क्षमता अशा विविध निकषांच्या आधारे गावांची निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यातून आमच्या गावांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात येते. परंतु, आता या टप्पा २ मधील निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून जागतिक बँकेसह आपला करारही झालेला आहे.
मा. ना. श्री. आशिष जयस्वाल, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार मंत्री
#Shivsena #Eknathshinde
सभा मंडप उभारण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात आणि त्यानुसार प्रत्येक गावात सभा मंडप उभारण्यात यावा.
-- मा. विठ्ठल लंघे, आमदार
#Shivsena#EknathShinde
किंग जॉर्ज, किंग्स सर्कल अशा अनेक ब्रिटिश नावांबद्दल आपण निश्चित धोरण स्वीकारलं पाहिजे. यासंबंधी धोरणनिश्चिती करण्याची विनंती करतो.
मा.श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार
#Shivsena#EknathShinde
शासकीय आयटीआय, सोलापूर येथे टीसीएसप्रमाणेच मुलींच्या जबरदस्तीने धर्मांतरासंबंधी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच तळेगाव दाभाडे येथील सिकाऊत्सो इंडिया या स्पॅनिश कंपनीत एका मुलीने लैंगिक शोषणाची तक्रार केली. मात्र तिला कंपनीतून काढून टाकण्यात आलं. या कंपनीचं लायसन्स आपण रद्द करणार का?
मा.डॉ. मनिषाताई कायंदे, आमदार
#Shivsena #Eknathshinde
जालना जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच, वीज वितरण व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
— मा. अर्जुन खोतकर, आमदार
#Shivsena#EknathShinde