@namdevwrites तत्कालीन अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबर २०२१ च्या जळीतकांडात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. अजूनही दोषी मोकळे. घटनेनंतर तेवढ्यापुरती फायर ऑडिटची मागणी.चौकशा.नंतर सर्व गारगार.शांत.
@RahulAsks राहूलजी, तेरे पास घर है, पैसा है या धर्तीवर अपने पास खाशाबा है, असं म्हणायला लावणारी ही प्रेरणादायी कथा तुम्ही जगासमोर ठेवली, आणली. महाराष्ट्रात २०१२ पासून क्रीडा शिक्षक भरती नसल्याने क्रीडा पदवीधरांचा, बी.पीएड.धारकांचा "खेळ" झाला अशी बातमी याच महाराष्ट्रात आज वाचावी लागते.
@PuneZp देशातील पहिल्या एकल महिला धोरणाची पायाभरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी याच दि. ३ नोव्हेंबर २०२५ च्या बैठकीत केली. साऊ एकल महिला समितीने या धोरणासाठी पाठपुरावा केला. हे धोरण ठरविण्यासाठी आता मसुदा समिती स्थापन झाल्याने एक पाऊल पुढे पडले. गजानन पाटील सर धन्यवाद. शुभेच्छा.
१२ वर्षे गरीब कल्याणाची; सन्मान, सुरक्षा आणि सशक्तीकरणाची अभूतपूर्व वाटचाल!
गेल्या १२ वर्षांत देशातील गरीब, वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य झाले आहे. एकेकाळी केवळ आश्वासनांमध्ये आणि घोषणांमध्ये दिसणाऱ्या योजना आज प्रत्यक्ष लाभाच्या रूपाने कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवत आहेत.
पक्के घर, उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी, जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेशन, आयुष्मान भारतमधून मोफत आरोग्यसेवा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये, मोफत अन्नधान्य आणि हर घर जल अभियानाद्वारे नळाने पाणी अशा अनेक योजनांनी गरीबांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे.
ही केवळ शासकीय योजना नाहीत, तर गरिबांच्या जीवनात सन्मान, सुरक्षितता आणि आत्मविश्वास निर्माण करणारे परिवर्तनाचे टप्पे आहेत.
गरीब कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून विकासाची नवी व्याख्या घडविणाऱ्या या १२ वर्षांच्या यशस्वी प्रवासाला सलाम!
#12YearsOfGaribKalyan
@narendramodi@PMOIndia@BJP4India
छायाचित्रात दिसणाऱ्या कलिता माझी या पश्चिम बंगालमधील एक अत्यंत प्रेरणादायी राजकारणी आहेत. घरोघरी धुणी-भांडी आणि घरकाम करून अवघे २५०० रुपये कमावणाऱ्या कलिता या पश्चिम बंगालच्या औसग्राम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या आणि आता सुवेंदू अधिकारी मंत्रीमंडळात मंत्री झाल्या आहेत.
त्यांचे पती प्लंबर आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, आर्थिक परिस्थिती बेताची. घरकामे सांभाळून त्यांनी समाज कार्य केले, पूर्वी एकदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या पण आता थेट मंत्रिपदापर्यंत धडक मारली आहे. कलितांजींचे अभिनंदन. त्यांची निवड म्हणजे लोकशाही कशी सामान्य माणसाला सशक्त बनवते याचे उत्तम उदाहरण आहे.
#Inspiring #WestBengal #KalitaMajhi
@Shrirampur_MC_1 फक्त सर्वेक्षण, स्पर्धांच्या फाईलसाठी समाज माध्यमाचा वापर करण्याऐवजी नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी देखील केला पाहिजे. घंटागाडी दररोज दारात येत नाही. स्वच्छता समाज माध्यमात दिसते. रस्त्यांवर, शहरात दिसत नाही. हा बदल व्हावा.
@satyajeettambe@Tukaram_IndIAS सर्व खडड्यांच्या मुळात भ्रष्टाचाराची भेसळ आहे. या भेसळीने सर्व यंत्रणा पोखरल्या आहेत. सरकिरलाही भ्रष्टाचाराची भेसळमुक्ती नको असते. त्यामुळे अशी भेसळ उघड करणाऱ्या निडर तुकाराम मुंडेंना एका खात्यात सरकार स्थैर्य देत नाही. तीन वर्षे बदली नाही, या धोरणालाच हरताळ फासलो जातो.
@abpmajhatv "अंबादास एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली" हा काय प्रकार आहे. संपादन, मुद्रितशोधन, वाचन असे काही संस्कार आपल्या वाहिनीत दिसत नाहीत. जबाबदार वाहिनीची अक्षम्य चूक की चेष्टा मस्करी.
@KulkarniRL हो, डॉक्टर आपले निरीक्षण शंभर टक्के बरोबर आहे. मी धडधाकट आहे. मुतखडा सोडून इतर काही नव्हते. पन्नाशी ओलांडली म्हणून तपासले, तर बी.पी. सांगितला. सध्या Telmiz M-25 tablets सकाळी एक घेतोय. पण चिडचिड सोडली तर कसलाही त्रास जाणवत, दिसत नाही. वरवर सर्व आलबेल वाटते.
@Marathi_Kavita8 ३ जानेवारीस महिला मुक्ती दिन असा उल्लेख आहे. पण महिलांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या जयंतीचा उल्लेख नाही, ही बाब खटकणारी, हेतूत: केलेली वाटते. निषेध.
लक्ष्मी लाँन्स, नेवासारोड ते थे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय श्रीरामपूर तालुका प्रशिक्षण कार्यशाळेत शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसोबत सहभागी झालो.
@vaibhavsanap713 वैभवजी, जातपात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन सर्वसामान्यांशी नाळ असलेला, पण कुबट,कोंदट मुंबईच्या संवेदनाहिन वातावरणात देखील माणूस म्हणून संवेदनशील असणारा माणूसच असं "वैभव"शाली लिहू शकतो. नाही तर काही लिहिता न येणारेही कौतुकापेक्षा शिव्या देण्यात धन्यता माननारे कमी नाहीत. लगे रहो.
@iAditiTatkare आदितीताई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या व कोरोना लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षभरापासून खडखडाट आहे. फेब्रुवारीत ६० कोटी रू. आयुक्तालयास मिळूनही महिनाभरानंतरही ते खात्यात जमा नाहीत. लक्ष घालावे, ही विनंती. -मिलिंदकुमार साळवे ९८५०९६२५३५.