फडवीसांना नीट माहीत आहे, ते महाराष्ट्रातील जनतेमुळे जिंकून आलेले नाहीत.
महाराष्ट्र त्यांना कधीही जिंकू देऊ शकत नाही.
त्यांनी निवडणूक आयोग आणि दिल्लीश्वरांच्या कृपेने विजय मिळवलाय.
त्यामुळेच हिंदीसक्तीदवारे ते महाराष्ट्राला धडा शिकवू पाहत आहेत.
ज्यांची लायकी साधी गाडी घेण्याची नव्हती त्यांच्यात ‘मर्सिडिज’ घेण्याची ताकद निर्माण करणारे ‘ठाकरे’ आहेत.
गद्दारीमुळे तुम्ही भूतकाळ विसरला असाल, पण वास्तव बदलू शकत नाही.
पैसे मिळतील का, कुणी पुन्हा पदं देईल का, म्हणून लाचारी करतायत!
स्वतःच्या अस्तित्वासाठी खुषमस्करी करताहेत, पण सत्य लपवता येईल का?
इतिहास सांगतो — स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी करणारे फार काळ टिकत नाहीत.
निलम गोऱ्हे ३० वर्षे शिवसेनेत. चार वेळा आमदारकी. दोन वेळा उपसभापतीपद पण सत्ता गेली आणि गद्दारी केली.
पदं लाटली, आमदारक्या मिळवल्या, सत्ता असताना पक्षाचं गुणगान गात बसल्या.
पक्ष सोडला आणि आरोप करायला सुरुवात केली.
म्हणे, पक्षात पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागतात!
जर हा आरोप खरा असेल, तर प्रश्न एकच—तुम्ही किती मर्सिडीज दिल्या?
उद्धवजींनी तुम्हाला ७ पदं दिली, म्हणजे १४ मर्सिडीज दिल्या असतीलच!
ह्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला? तो जाहीर केलात का?
काही पत्रकार आता रिपोर्ट बनवू लागलेत की उद्धवजींच्या मुख्यमंत्री काळाबाबत शरद पवारांनी पुस्तकात लिहिलंय.
पैसे मिळाले असतील तर नक्की रिपोर्ट बनवा, हरकत नाही.
पण, उद्धवजी हे कठीण काळात राज्याचं नेतृत्व करताना जनतेचा विश्वास जिंकणारे एकमेव ‘मुख्यमंत्री’ ठरलेत!
कांग्रेसची नाटकं तरी कशासाठी सुरु आहेत?
• लोकसभेला जनतेनं उद्धवजींना मतदान केलंय.
• मोदींनी केलेल्या महाराष्ट्रद्वेषाचा वचपा काढलाय.
• हुकूमशाहीला गाडलंय.
तुमचं काय? ना राहुल गांधींनी धड प्रचार केला ना कुठल्या कांग्रेसनेत्यानं?
मग तुम्हाला जनतेनं कसा कौल दिला?
भाजपने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असले विखारी विकृत विचार पसरविण्यासाठी स्पेशल बजेट ठेवलंय बहुतेक... असल्या बाजारबुणगे लोकांची लायकी तरी आहे का साहेबांचे नाव घेण्याची?
२०१४
भाजप + उद्धवजी = २३ खासदार
काँग्रेस - उद्धवजी = १ खासदार
२०१९
भाजप + उद्धवजी = २३ खासदार
काँग्रेस - उद्धवजी = १ खासदार
२०२४
भाजप - उद्धवजी = ९ खासदार
काँग्रेस + उद्धवजी = १३ खासदार
काँग्रेसने स्वतःची लायकी विसरु नये!