आज शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी घोडबंदर येथील मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बस डेपोला मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी भेट देऊन परिवहन सेवेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक (ई-व्ही) बसची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी ��सची रचना, तांत्रिक वैशिष्ट्ये, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा तसेच सुरक्षिततेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. शहरातील सार्वजनिक परिवहन सेवा अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक व प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने ई-व्ही बसच्या संचालनासंदर्भात आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रवाशांना दर्जेदार परि���हन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी मा. परिवहन समिती सभापती श्री. राजकुमार मिश्रा, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, प्रभाग समिती क्र. ४ चे सभापती श्री. संजय थेराडे, उपायुक्त (परिवहन) स्वप्निल सावंत, नगरसचिव दिनेश कानगुडे, उद्यान अध���क्षक नागेश विरकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#मिराभाईंदर #परिवहनसेवा #PublicTransport #MBMC #MBMT
आज गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालि���ा मुख्य कार्यालयात भारतरत्न आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता व अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी, उपायुक्त (मुख्यालय) प्रणाली घोंगे, सहाय्यक आयुक्त सुनिल यादव व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
#इंदिरा_गांधी #mbmc #MiraBhayandar
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील गरजू महिला, मुली व बालकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रम आज बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी सभाग���ह, आरक्षण क्र. २४१, पहिला मजला, सेवन इलेव्हन स्कूलच्या मागे, मिरारोड (पूर्व) येथे संपन्न झाला. मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे ७०० ते ८०० महिला लाभार्थी उपस्थित होत्या.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत गरजू महिला व बालकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये निराधार, एकल व घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य, त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक मदत, एकल व निराधार घटस्फोटित महिलांना ‘माय-माऊली योजना’ अंतर्गत अर्थसहाय्य, मुली व महिला रुग्णांच्या कर्करोग उपचारासाठी आर्थिक मदत तसेच कर्करोगग्रस्त महिलांच्या पती आणि एकल महिलांच्या १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कर्करोग झाल्यास संबंधित महिलांना आर्थिक सहाय्य अशा विविध योजनांचा समावेश आहे.
कार्यक्रमास मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अनिता पाटील, महिला व बालकल्याण समिती उपसभापती श्रीमती हेमा बेलानी, शिक्षण समिती सभापती श्रीमती स्नेहा पांडे, पाणीपुरवठा समिती सभापती श्री. मोहन म्हात्रे, महिला व बालकल्याण समिती सदस्या श्रीमती दीप्ती भट, श्रीमती रुपाली मोदी, श्रीमती जया दत्ता, श्रीमती रिझवाना खान, अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त श्रीमती कविता बोरकर तसेच इतर मान्यवर नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#महिला_सक्षमीकरण #WomenEmpowerment #mbmc #mirabhayandar
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील गरजू महिला, मुली व बालकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
१. निराधार/एकल/घटस्फोटीत महिलांच्या मुलींना विवाहाकरीता अर्थसहाय्य
२. निराधार/एकल/��टस्फोटीत महिलांच्या मुलामुलींना शिक्षणाकरीता शैक्षणिक मदत
३. एकल/निराधार घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य (माय-माऊली योजना)
४. मुली व महिला रुग्णाकरिता कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत
५. वय वर्षे ६० वर्षापर्यंतच्या ज्या महिलेच्या पतीस व एकल महिलांच्या बाबतीत त्यांच्या वय वर्षे �� ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना(पुरुष) कॅन्सर आजाराने ग्रस्त असतील अशा महिलांना आर्थिक मदत
वरील योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी धनादेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, आरक्षण क्र. २४१, पहिला मजला, सेवन इलेवन स्कुल मागे, मिरारोड (पूर्व) येथे दुपारी २.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास अंदाजे ७०० ते ८०० महिला लाभार्थी सहभागी होणार आहेत. तरी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या नागरी समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा "महापौर दिन" आज सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झाला. यावेळी नागरिकांनी आपल्या परिसरातील रस्ते, नागरी सुविधा आणि ��तर विविध समस्यांसह तक्रारी व सूचना थेट मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्यासमोर मांडल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची दखल घेत मा. महापौरांनी संबंधित अधिकारी व विभागप्रमुखांकडून त्याबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच तक्रारींचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वारंव���र पाठपुरावा करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, शहर अभियंता दिपक खांबित, उपायुक्त (मुख्यालय) प्रणाली घोंगे, उपायुक्त कविता बोरकर, उपायुक्त स्वप्नील सावंत, सहाय्यक संचालक नगररचना पुरुषोत्तम शिंदे, कार्यकारी अभियंता, सर्व प्रभ���गनिहाय सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
#महापौर_दिन #MiraBhayandar #MBMC
आज सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ ���ोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील टी.बी.एम. मशीनद्वारे सुरू असलेल्या भूमिगत जलवाहिनी (Underwater Sea Tunnel) प्रकल्पाच्या कामाची मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता व मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळभेट देऊन पाहणी केली.
प्रकल्पाच्या कामादरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, कामातील अडथ��े आणि सद्यस्थितीचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः चेना गाव परिसरातील जलवाहिनीच्या कामातील अडचणींची माहिती घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
तसेच प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी महानगरपालिका व एमएमआरडीएच्या संबंधित विभागांनी आवश्यक समन्वय राखून कामाचे नियोजन करावे आणि निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी ���्रभावी कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती श्री. मोहन म्हात्रे, शहर अभियंता दिपक खांबित, ��गरसेवक श्री. भगवती शर्मा, तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका व एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#MiraBhayandar #MMRDA #जलवाहिनी #DevelopmentWorks
मिरा-भाईंदर महानगरपालिका नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे, पारदर्शकपणे व तात्काळ सोडविण्यासाठी महापौर दिन आयोजित करण्यात आला आहे.
🗓️ सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६
⏰ सकाळी ११.०० वाजता
📍 मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, भाईंदर (प.)
आपल्या नागरी समस्या, तक्रारी व सूचना लेखी निवेदनासह थेट मा. महापौर यांच्यासमोर मांडण्याची संधी नक्की घ्या.
#महापौर_दिन #MBMC #MiraBhayandar #MBMCUpdates
मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत "स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी" स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
चित्रकला स्पर्धा व पुनर्वापरातून सजावट स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत स्वच्छता, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला.
#swachhdiwalishubhdiwali #swachhbharat #SwachhMiraBhayandar #SwachhMBMC #SwachhSurvekshan2025_26
आज बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता, मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) आणि मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, यांच्या उपस्थितीत सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांची पाहणी करण्यात आली.
यावेळी चेना एमबीआर, वसई खाडी, कावडास व सूर्यानगर येथील ४५ एमएलडी जलाशय, जलवाहिनी, मायक्रो टनलिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कामे दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना देण्यात आल्या. मिरा-भाईंदर शहराला पुरेसा, नियमित व अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा सातत्याने आढावा घेत आहे.
#SuryaWaterProject #MBMC #MiraBhayandar #WaterSupply
आज बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता, मा. महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) आणि मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील यांनी मिरा-भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी चेना येथील वर्सोवा परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात ���ल्या.
मिरा-भाईंदरकरांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सूर्या प्रकल्पातील कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
यावेळी मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, पाणीपुरवठा व मल:निसारण सभापती मोहन म्हात्रे, शहर अभियंता दिपक खांबित, सन्माननीय नगरसेवक तसेच सूर्या प्रकल्प व महानगरपालिकेचे संबंधि�� अधिकारी उपस्थित होते.
#SuryaProject #MiraBhayandar #WaterSupply #DevelopmentWork #MBMC
झाडांना पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर करा आणि वॉशिंग मशीन गरजेनुसारच चालवा. दैनंदिन जीवनातील छोट्या सवयींमधून पाण्याची मोठी बचत शक्य आहे. चला, पाणी जपूया आणि जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करूया!
#MiraBhayandar#SaveWater#MBMC
स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत महिला बचत गटांसाठी घनकचरा व्यवस्थापन व उपजीविका निर्मिती या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, RRR (कमी वापर, पुनर्वापर व पुनर्चक्रण) केंद्राचे व्यवस्थापन, नारळाच्या कचऱ्यापासून कोकोपीट निर्मिती तसेच फुलांच्या कचऱ्यापासून अगरबत्ती निर्मिती याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. कचऱ्याचे य���ग्य व्यवस्थापन करत त्यातून उपयुक्त उत्पादने तयार करणे, पर्यावरण संवर्धनास हातभार लावणे आणि महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
#MBMC #SwachhMiraBhayandar #SwachhBharat #SwachhSurveksha2025_26