🏥शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयात क्षमतावाढ प्रकल्प राबविण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी आज रूग्णालयास भेट देऊन क्षमतावाढ प्रकल्प कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. रूग्णालयातील आपत्कालीन विभाग, विविध कक्ष, एमआयसीयू, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आदींचा समावेश आहे.
🔹मुख्य रूग्णालय इमारत (टप्पा क्रमांक - २ अ), ऑन्कोलॉजी इमारत आदी ठिकाणी श्रीमती वर्मा -लवंगारे यांनी कामांची पाहणी केली. तसेच प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेतला. नव्याने विकसित होणाऱ्या रूग्णालयात नागरिक तसेच रूग्णालयातील निवासी डॉक्टर व कर्मचारी यांच्यासाठी विरंगुळ्यासाठी ठिकाणे तयार करावीत, असे निर्देश श्रीमती वर्मा -लवंगारे यांनी दिले.
🔹रूग्णालयात नागरिकांच्या सुविधेसाठी विविध आरोग्य सेवांसाठी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असा सूचना त्यांनी केली. तसेच नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी नियमितपणे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
🔹रूग्णालयात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गावर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात यावे. जेणेकरून वेळे आधी रूग्णालयातून बाहेर पडणाऱ्या कर्मचारी वर्गावर लक्ष ठेवता येईल. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मानव संसाधन विभागाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कर्मचारी वर्गाच्या उपस्थिती बाबत निगराणी ठेवण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून पब्लिक एड्रेस सिस्टिमची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत असेही निर्देश त्यांनी दिले.
🔹रूग्णालयाच्या ठिकाणी नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देतानाच कर्मचारी वर्गाला विशिष्ट युनिफॉर्म परिधान करण्यासाठी द्यावेत. तसेच रूग्णालयात मूषक व श्वान यांचा उपद्रव राहणार नाही यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. रूग्णालयात हॉस्पिटल मॕनेटजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम यंत्रणेची अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
🔹उपायुक्त (परिमंडळ -२) श्री. प्रशांत सपकाळे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (एफ /उत्तर) श्री. अरूण क्षीरसागर सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@PrajaktaVerma
कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे.
या अंतर्गत, ‘एल’ या विभागातील एल.बी.एस. मार्ग या ठिकाणी आज सखोल स्वच्छता करण्यात आली. (२/२)
#MyBMCUpdates
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि (१/२)
@Prabhat_NSUI@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - LX_202600086073
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/Xw8wcWxICm… येथे कृपया भेट द्यावी.
@Prabhat_NSUI आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - LX_202600086073
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/QUoheW597o येथे कृपया भेट द्यावी.
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एल' विभागातील कुर्ला पश्चिम येथील भाभा सर्वसाधारण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#CleanlinessDrive#MyBMCUpdate#स्वच्छमुंबई
मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पादचारी प्रथम अर्थात 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान.
#MyBMCUpdates#PedestrianFirst
🔹माननीय भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण – २०२६ कार्यक्रमाच्या कालावधीला मुदतवाढ दिली आहे.
🔹सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आता दिनांक १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत गृहभेट देतील.
🔹नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@ECISVEEP@MaharashtraSEC@CEO_Maharashtra
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२४ पासून मुंबईतील बेकरी व्यावसायिकांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.यासाठी महानगरपालिकेकडून मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहाय्य देखील प्रदान केले जात आहे. काही बेकरींमध्ये लाकूड आधारित भट्ट्यांचा वापर होत आहे. अशा बेकरी व्यावसायिकांनी हवेच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी वीज किंवा नैसर्गिक वायूसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@9d84b2758fb74b2 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - LX_202600085570
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/QUoheW597o येथे कृपया भेट द्यावी.