Official Twitter Account of Divisional Information Office, #KONKAN Region, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी पश्चिम महाराष्ट्रातील #सहकार आणि #साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केली. राज्यातील सहकार क्षेत्रासाठी ३,००० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली असून याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १,५०० कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेले नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्क येथे आयोजित जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, राज्यमंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde
राज्यात १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी #मतदान घेण्यात आले असून या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
या निवडणुकांची मतमोजणी उद्या, २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री. वाघमारे यांनी दिली.
सविस्तर वृत्त : https://t.co/U4DH7X0kTk
#सार्वत्रिकनिवडणूक #पोटनिवडणूक
आषाढी यात्रेसाठी #एसटी च्या ५ हजार ५०० विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा.
#आषाढीएकादशी#पंढरपूर#STBus#MSRTC
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (#पीएमकिसान) योजनेचा २३ वा हप्ता पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मुंबई येथून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २३ व्या हप्त्याचा लाभ थेट जमा करण्यात आला असून यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांतर्फे आभार व्यक्त करतो. – कृषी मंत्री @bharanemamaNCP
#PMKisan #PMKisanSammanNidhi
📍कोल्हापूर
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँके’च्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्या’चा नामविस्तार करण्यात आला.
यावेळी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde
📍लोकभवन, मुंबई
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत #पश्चिमबंगाल राज्य स्थापना दिन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत व नृत्याच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाला व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
महाराष्ट्र व पश्चिम बंगाल परस्परांपासून दोन हजार किमी दूर असले तरी देखील दोन्ही राज्यांमधील लोकांची अस्मिता समान असल्याचे यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबईतील विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma
📍लोकभवन
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील #रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिर शाळेला #स्कूलबस प्रदान करण्यात आली. सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे ही बस देण्यात आली आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मनीष रुपाणी, नाना पालकर स्मृती समितीचे पदाधिकारी कृष्णा महाडिक, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे मानद सचिव डॉ. निलेश रेवगडे आदी उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (#दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (#बारावी) पुरवणी परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मानसिक आधार व मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध स्तरांवर समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुरवणी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताण किंवा संभ्रम न बाळगता उपलब्ध समुपदेशन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.
#SSC #HSC
सविस्तर वृत्त : https://t.co/J1XBeyeQCg
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६'साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार.
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा https://t.co/4ylz4viIll
अर्जासाठी शेवटीची तारीख : १० जुलै २०२६
#राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार
#NationalTeachersAwards
#परभणी जिल्ह्यातील #यशवाडी येथील हनुमान मंदिरातील दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यामध्ये मृत्यूमूखी पडलेल्या भाविकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई महालक्ष्मी शक्तिपीठास भेट देऊन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी सपत्नीक दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिर परिसर विकास कामांच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde
#कोल्हापूर #श्रीमहालक्ष्मीमंदिर #श्रीअंबाबाई
📍कोल्हापूर
दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हे मंदिर तब्बल १५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कृतज्ञता सोहळ्यात केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अध्यात्मिक व सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा विकासाचा आग्रह केंद्रीय गृहमंत्र्यांनी धरला होता. राज्यातील ५ जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा तीर्थक्षेत्राचाही विकास सुरु आहे. या विकास आराखड्यातून भाविकांसाठी पुढील शंभर वर्षात सेवा करता येईल, असे व्यापक काम शासनाने हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राने संपूर्ण देशाला अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे. श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसरातील आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला आज प्रारंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर एका वेगळ्या उंचीवर जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde
#कोल्हापूर #श्रीमहालक्ष्मीमंदिर #श्रीअंबाबाई
#आषाढीएकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून #श्रीक्षेत्रपंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी #एसटी महामंडळाने ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
#MSRTC #STBus
@PratapSarnaik
📍 श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांचा शुभारंभ कोनशीलेचे अनावरण करून करण्यात आला.
यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यांच्या हस्ते मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध विभागांचे मंत्री व मान्यवर उपस्थित होते.
@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde
#कोल्हापूर #श्रीमहालक्ष्मीमंदिर, #श्रीअंबाबाई
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जून, २०२६ पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होणार असून यावेळी विधान भवन प्रवेशासाठी प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री ते अधिकारी-कर्मचारी वर्ग, स्वीय सहायक, अभ्यागत अशा सर्वांसाठी विधान भवन ई-प्रवेश प्रणालीद्वारे ‘चेहरा पडताळणी पध्दती’ अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अत्यंत काटेकोर स्वरूपात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अधिवेशनकाळात विधान भवन परिसरामध्ये होणारी गर्दी नियंत्रित असावी तसेच सुरक्षा यंत्रणेला तपासणी संदर्भात सुलभता असावी या दृष्टीने या पावसाळी अधिवेशनात छापील प्रवेशपत्राऐवजी ‘चेहरा पडताळणी पध्दती’ राबविण्यात येत असून याबाबत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच अन्य सर्व संबंधित आस्थापना, वार्तांकनासाठी येणारे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी, भा.प्र.से. तसेच भा.पो.से. आणि अन्य सर्व अधिकारी कर्मचारी, सचिव-विशेष कार्य अधिकारी, सर्व स्वीय सहायक अशा सर्वांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयातर्फे सूचित करण्यात आले आहे.
ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वरूपात माहिती पाठविणे, आवश्यक ती माहिती ई-मेलवर प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू झाली असून ती दि. २० व २१ जून, २०२६ रोजी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने जारी केले आहे. सर्वांनी या नव्या प्रवेशपास प्रणालीचा स्वीकार करावा आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही विधानमंडळ सचिवालयातर्फे करण्यात आले आहे.
#पावसाळीअधिवेशन
#पावसाळीअधिवेशन२०२६
कचऱ्याने भरलेल्या परिसराचे छायाचित्र मुंबईतील असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. व्हायरल झालेले छायाचित्र प्रत्यक्षात केनियातील नैरोबी येथील आहे. तिथे ६ मार्च २०२६ रोजी मुसळधार पावसामुळे सांडपाणी साचले होते आणि कचराही जमा झाला होता. त्याचा मुंबईशी काहीही संबंध नाही.
#FactCheck
#DGIPRFactCheck
साईभक्तांचा प्रवास होणार अधिक सुखकर!
पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा CM @Dev_Fadnavis व रेल्वे मंत्री @AshwiniVaishnaw यांच्या हस्ते शुभारंभ.
🔹दौंड, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर येथे थांबे.
🔹विद्यार्थी, शेतकरी व भाविकांना मोठा फायदा.