वनराई पोलिस स्टेशनचे पी आई राजभर हे अचानक रजेवर का गेले?
वायकर याना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलिसस्टेशन मधून
बदलण्याचा प्रयत्न झाला.
वायकर यांचा खास माणूस(जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते)
retd.पी आई सातारकर हे वनराई पोलीसस्टेशनात चार दिवसा पासून कायडील करत होते? वनराई पोलीस स्टेशन चे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे.
रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही.
वादग्रस्तफ़ोन फोरहंसिक लॅब मध्ये पाठवल्याचे ऐकले.
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणांत बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारेहेच लॅबवाले आहेत!लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात!
@ECISVEEP@Dev_Fadnavis@PMOIndia@AUThackeray
मागासवर्गीयांच्या च्या परदेशी शिक्षणात मनू स्मृती सरकारचा अडथळा ……
समाजकल्याण विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून अनुसूचित जातीच्या विद्यार्थी परदेशी शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहतील.
1) शासनाने या आधी ५५% गुण आवश्यक केले होते. ते आता ७५% केले.
2) आधी संपूर्ण शुल्क व निर्वाह भत्ता मिळत होता. आता फक्त ३० लाख मिळणार आहेत. , हाॅर्वडसारख्या विद्यपीठाचे शुल्क ५० लाखांच्या वर आहे
3) आधी उत्पनाची अट नव्हती (पहिल्या १०० विद्यापीठांसाठी) आता उत्पन्न मर्यादा ८ लाख केली आहे
4) आधी कुटुंबातील 2 विद्यार्थ्यांला लाभ मिळत होता. आता फक्त एकाच विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सदरची शिष्यवृती राजर्षी शाहू महाराज यांचे नावाने आहे. पण शासनाने महाराजांचा जयंती दिन अर्थात २६ जून हाच दिवस निवडून हा अघोरी निर्णय घेतला आहे.
#फुले #शाहू #आंबेडकर
#जयभीम
आचार्य अत्रे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पंचमहाभूतांपैकी एक होते. मराठी मनाचा महाराष्ट्र जेंव्हा घडला तेंव्हा त्यात आचार्य अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. आचार्य अत्रेंची वाणी आणि लेखणी म्हणजे एक मुलूखमैदानी तोफ होती.
आचार्य अत्रे यांचा आज स्मृतिदिवस. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन..!
The reason y v say #EVM is a fraud.
72 hours after polling, Tripura CPM flags ‘official claims of turnout exceeding 100%’, seeks fresh elections :
https://t.co/CmP6uL4JA1
डोंबिवलीच्या 'एमआयडीसी'तील केमिकल कंपनीला आज पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे स्फोट झालेल्या ठिकाणापासून जवळच शाळा देखील आहे.
महिनाभरापूर्वी जेव्हा डोंबिवलीत अशा प्रकारची घटना घडली होती, तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी अशा अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ 'एमआयडीसी'मध्ये हलवणार असल्याचे सांगितले होते. ही प्रक्रिया कुठवर आली आहे?
घटना घडल्या की फक्त मोठ्या घोषणा करायच्या आणि नंतर निवांत बसायचं, हे कुठवर चालणार?
माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी तातडीने या कंपन्या हवलण्यासाठी आढावा बैठक घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा.
या दुर्घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नसावी ही आशा. डोंबिवलीकरांनो काळजी घ्या.
"देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करण्यासाठी पुढे सरसावणे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पुरे झाला शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांवरील अन्याय, प्रत्येक दुर्लक्षीत घटकाला मिळवून द्यायचाय न्याय! विचारांच्या लढ्याने महाराष्ट्राचे हित साधण्यासाठी आणि राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला निडर ताकद दाखवून देण्यासाठी गुरूवार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी दु. १ वाजता पारस नगरी, माने कॉम्प्लेक्सजवळ, बीड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात!"
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा व संसदरत्न, माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, डिजिटल मीडिया रिसर्च अँड कम्युनिकेशन विभागाचे राज्यप्रमुख नीरज महांकाळ यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रदेश कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना वंदन करतानाच आपला देश शिक्षित, स्वच्छ, गुन्हेगारीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आपण सगळेच प्रतिज्ञा करूया.
देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आणि सार्वभौमत्वाला बाधा न येवो आणि देशाच्या एकसंधत्वाचे आणि विकासाचे स्वप्न साकारण्यात आपल्या सर्वांचा सहभाग देण्याची प्रतिज्ञा आज स्वातंत्र्यदिन साजरा करताना घेऊयात. सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
आज आपला स्वातंत्र्य दिन.
देशासाठी सर्वस्व त्यागून आपले बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात - अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..!!
हा देश सदैव प्रगतीच्या आणि संपन्नतेच्या शिखरावर राहो,इथल्या सर्व नागरिकांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध होवो,ही मंगलकामना.!
तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#जयहिंद
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व देशभक्तांना विनम्र अभिवादन!
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी व संविधानीक मूल्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा निश्चय करूया. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.
अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारकांच्या त्याग आणि बलिदानातून आजचे स्वातंत्र्य साकारले आहे. आपण सर्वजण त्यांचे स्मरण करुयात. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#IndependenceDay #IndependenceDay2023
आज मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये सिसोदिया एक डेटा सेंटर बनवण्याच्या तयारीत आहेत. माझी खात्री आहे की, ते डेटा सेंटर झाल्या नंतर महाराष्ट्राच्या औद्योगिकरणामध्ये एक प्रकारचं वजन आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे जे वजनचा औद्योगिकरण आहे त्या वजनचे औद्योगिकरण आणि सोलापूर याचं एक नातं जोडलं जातंय याचा मला मनापासून आनंद आहे. आपण मला काही लोकांनी सोलापूरमध्ये उद्घाटनाला बोलावलं. फळबागा बनवल्या, डाळिंबाची शेती बनवली जो एकेकाळी दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेला सांगोला उत्तम प्रकारची फळं तयार करायला लागला. सोलापूरच्या अनेक ग्रामीण भागात काम केलं. आणि त्याचा परिणाम की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक साखर कारखाने आज कुठे असतील तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते काम ऊस उत्पादन करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी आणि कारखानदारी उभी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व जाणकारांनी आज सोलापूरमध्ये केलं. आणि त्याचा परिणाम ग्रामीण भाग बदलतोय, सोलापूर शहर बदलतोय आणि या सर्व गोष्टी करण्याच्या संदर्भातील संकल्प आपण सर्वांनी केलेला आहे. मी याठिकाणी जगतापांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी त्यांचा आर्यन ग्रुप इथे आणायचा निकाली घेतला. त्यांनी कोकणामध्येही काही कामं सुरु केली आहेत सावंतवाडीला आणखी काही ठिकाणी कामं करताहेत. मी जगतापांना एकंच सांगेन की, सोलापूरमध्ये आलात. आता इथून पुढे जायचं नाही. आता इथे काम वाढवायचं. इथं अधिक हातांना काम द्यायचं. आणि तुम्हाला नक्की समाधान मिळेल की सोलापूरच्या आमच्या कष्टकरी माणसांनी एखादी जवाबदारी हातात घेतल्यानंतर त्याठिकाणी काही अगर मगर न करता कष्ट करण्यासाठी सोलापूरकर कधी मागे पडत नाही. त्यांच्या पाठीशी तुम्ही रहा. माझी खात्री आहे की, तुमचा आर्यन ग्रुप इथे भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. हे सोलापूर आहे आणि या सोलापूरला तुमच्या सर्वांची साथ असली पाहिजे. तुम्ही याठिकाणी रोबोट आणणार आहात असं सांगितलं मी याबाबत फारसा खुष नसतो. रोबोट याचा अर्थ काय? मशीन काम करतं. आता इथे इतकी लोकं काम करणार आहेत त्यांना बाजूला ठेऊन मशीनला तुम्ही आणता. मशीन बघूया ज्यावेळी काम करण्याच्यासाठी लोकं कमी पडतील त्यावेळी बघा ना. आता इथे कामाची सुरुवात आहेत त्याच्या आधीच रोबोट तुम्ही आणणार. मशीनला काम दिलं तर आमच्या तरुणांनी इथं काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर येईल. रोबोटचा विचार जरूर करा. पण आधी याठिकाणी कारखानदारी उभी राहिलेली आहे, यशस्वी झालेली आहे. अधिक हातांना काम देणारी आहे, ही स्थिती निर्माण करा. माझी खात्री आहे सोलापूर शहर तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
मी काय अधिक बोलून आपल्या सर्वांचं वेळ घेत नाही. याठिकाणी आताच क्रिकेटच्या संबंधीत एक पुस्तक याठिकाणी A to Z क्रिकेट म्हणून प्रकाशित झालं. एकेकाळी सोलापूरलासुद्धा क्रिकेट चांगलं होतं. मला आठवतंय एका मॅचला मी आलो होतो. Inter University हिंदुस्थानातील सगळे विद्यार्थी इथं आणि त्यांच्याविरुद्ध West Indies ची टीम या सोलापूरला आली होती. आणि त्या इंडियाच्या टीमचे कॅप्टन शेर मोहम्मद नावाचे एक अतिशय उत्तम खेळाडू होते. आणि जगात चांगले जे खेळाडू क्रिकेटचे होते त्या सर्वांनी या सोलापूरमध्ये मॅच खेळून आपल्या खेळाचं कर्तृत्व दाखवलं होतं. आणि त्या मॅचला एक क्रिकेट शौकीन म्हणून मी स्वतः हजर होतो. मला या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था होती, आता मी काय फार लक्ष देत नाही. पण मी १० वर्षे मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष होतो. ०५ वर्षे देशाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. ०२ वर्षे आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. आणि ०४ वर्षे जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. यामुळे या सर्व क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी काम करण्याची संधी मला महाराष्ट्राने देशाने आणि जगाने दिली. याचा मला आनंद आहे. म्हणून त्या क्षेत्रामध्ये नव्या पिढीला क्रिकेटचा ज्ञान होण्याच्यासाठी आणि क्रिकेट क्षेत्रातील जाणकार यांचा परिचय व्हावा म्हणून हे पुस्तक आज याठिकाणी आणलं. तुम्हा सर्वांच्या साथीनं त्याचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो. नमस्कार..!
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे सर यांच्या लातूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Wishing the INDIA teachers’ organisations the very best for the Delhi University Teachers Association elections.
For the welfare of our teachers & students, we pray you win decisively!
https://t.co/iD49BrWqCR
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे धडाडीचे व्यक्तिमत्व, लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या छोट्याशा गावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे दिवंगत नेते विलासरावजी देशमुख.
देशमुखांचा राजकारणातील प्रवास उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहेच शिवाय महाराष्ट्रातील जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. विलासरावजी हे अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचे हसरे, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे नेते माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!