लोकसहभागातून सुरक्षिततेकडे आणखी एक पाऊल!
बिलोलीतील ‘छोटा हनुमान मंदिर’ परिसरात नागरिक व भाविकांच्या सहकार्याने आधुनिक CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. गुन्हे प्रतिबंध व तपासासाठी पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ अधिक सक्षम!
#NandedPolice#CCTV#PublicSafety#Biloli#Maharashtra
एकच Password सर्वत्र? धोका मोठा!
प्रत्येक Account साठी वेगळा Strong Password वापरा आणि MFA / 2-Step Verification सुरू करा. Password, OTP किंवा Verification Code कोणाशीही शेअर करू नका.
सायबर फसवणूक झाल्यास 📞 1930 किंवा 112
#NandedPolice#CyberSafety#CyberAwareness
अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला आधार देत, सुरक्षिततेच्या दिशेने हात पुढे करणारी ती — तारिणी!
मदतीची गरज असलेल्या प्रत्येकासाठी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कर्तव्य बजावणारी नांदेड पोलीस दलाची तारिणी.
#NandedPolice#तारिणी#WomenSafety#PublicSafety#MaharashtraPolice
नोकरीच्या आमिषात पैसे मागितले? सावधान!
Job Registration, Interview किंवा Training च्या नावाखाली पैसे मागणाऱ्या अनोळखी Recruiter वर लगेच विश्वास ठेवू नका. Payment करण्यापूर्वी Company आणि Job Offer ची अधिकृतता तपासा.
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर दामिनी पथकाची कारवाई!
पेट्रोलिंगदरम्यान हुल्लडबाजी करून सार्वजनिक शांतता भंग करताना आढळून आलेल्या व्यक्तींना दामिनी पथकाने ताब्यात घेतले.
सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखा, कायद्याचे पालन करा.
#NandedPolice#DaminiPathak#PoliceAction
सोशल मीडियावर शस्त्र हातात घेऊन Reel टाकणं पडलं महागात!
Reel पोलिसांच्या निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारे किंवा कायद्याचे उल्लंघन करणारे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.
#NandedPolice#PoliceAction