सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सह��ागी आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.
महाराष्ट्रात सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या वारसाला 2 ल��ख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान @narendramodi
Pained by the loss of lives due to a fire tragedy in Solapur, Maharashtra. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने भारताने सकारात्मकतेने टाकलेले पाऊल आहे. या निर्णयाचा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#CasteCensus
📍सोलापूर
धन्यवाद मोदीजी!
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा करून सर्व समावेशक धोरणाचा नवा अध्याय सुरू केला असून ही जनगणना शैक्षणिक व सामाजिक आरक्षण धोरणांना अधिक न्याय बनवेल हा विश्वास आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया…या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या आ���ुष्यात सुख, शांती नांदो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
जय श्रीराम 🙏🏻🚩
प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री नगर, जुळे सोलापूर येथील श्रीराम सेना प्रतिष्ठान येथे प्रभू श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य प्राप्त होवो, अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना केली.
#रामनवमी#सोलापूर
जल्लोष श्रीराम भक्तांचा,
सोहळा श्रीराम जन्मोत्सवाचा !🙏🏻🚩
सोलापूर येथील एक प्रभू श्री राम भक्त...ज्यांनी राम नवमी निमित्त आपली रिक्षा सजवली आहे. हे बघून मला रिक्षात बसण्याचा मोह आवरला नाही...
#रामनवमी#ramnavmi2025#सोलापूर#Solapur#जय_श्रीराम#प्रभू_श्री_राम
याप्रसंगी सोलापूर शहर उत्तर आमदार श्री विजयकुमार देशमुखजी, मंडळाचे संस्थापक श्री राजकुमार पाटीलजी, श्रीराम युवा सेना मंडळाचे अध्यक्ष श्री शशी अन्नलदास, भाजपा युवा मोर्चा सोलापूर शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#रामनवमी#सोलापूर
जय श्रीराम !🙏🏻🚩
आज श्रीराम युवासेना यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेत सहभागी झालो. यावेळी उपस्थित सर्वांना श्रीराम नवमी निमित्त शुभेच्छा दिल्या.
शोभायात्रेमध्ये "जय श्री राम" "प्रभू श्री रामचंद्र की जय"अशा घोषणांनी संपूर्ण परिसर राममय झाला.
चन्नविर चिट्टे मित्र परिवार यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. उन्हाच्या तडाख्यात जनतेला गारवा देणाऱ्या या सेवाभावी उपक्रमातून सामाजिक जाणीव आणि बांधिलकीचे दर्शन घडते.
या उद्घाटन प्रसंगी चन्नविर चिट्टे मित्र परिवार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
#सोलापूर#पाणपोई#उद्घाटन
भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त, काल सकाळी भवानी पेठ, सोलापूर येथे चन्नवीर चिट्टे मित्र परिवार यांच्या तर्फे पाणपोई सुरू करण्यात आली असून याचे उद्घाटन केले.
आज सोलापूर येथील ज्ञानदीप या आमच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सहपरिवार झेंडावंदन करून भाजपा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि उपस्थित सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
#BJP4ViksitBharat#BJPSthapnaDiwas#भाजपा_स्थापना_दिवस
यावेळी सोलापूर शहर उत्तर आमदार श्री विजयकुमार देशमुख जी, दक्षिण सोलापूर आमदार श्री सुभाषबापू देशमुख जी, मा.आमदार श्री नरसिंगजी मेंगजी, भाजपा ज्येष्ठ नेते श्री रामचंद्र जन्नू जी, श्री किशोर देशपांडे जी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन��� उपस्थित होते !
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस भाजपा सोलापूर शहर व जिल्हा कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याठिकाणी ज्येष्ठ भाजपा नेते श्री ��ाशाभाई अलिशेर शेख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यास अभिवादन केले व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस...🪷
"वसा राष्ट्रसेवेचा • संकल्प प्रगतीचा • वारसा संस्कृतीचा"
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तसेच सर्व नागरिकांना हार्दिक शुभे���्छा...!
#BJP #Maharashtra #BJP4ViksitBharat
राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शनिवारी #सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर विमानतळ येथे त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. आदरणीय देवेंद्रजी यांच्या भेटीने नेहमीच नवीन उर्जा व बळ मिळते..! 🪷🙏🏻
@Dev_Fadnavis ji
#BJP4Solapur#BJP4Maharashtra