भांडुपच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘भांडुप पक्षी उद्यान’ प्रकल्पासंदर्भात आज पाहणी केली.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांच्या संकल्पनेनुसार आणि विनंतीवरून या प्रकल्पासाठी ₹४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक व्ह्यूइंग गॅलरी, बर्ड वॉचिंग डेक, हाय-रिझोल्युशन स्क्रीनद्वारे पक्षीनिरीक्षणाची सुविधा, तसेच फ्लेमिंगोसह सुमारे २५० पक्षी प्रजाती, विविध प्रकारचे गवत, फुलपाखरे आणि पर्यावरणपूरक परिसंस्था विकसित करण्यात येणार आहे. देश-विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भांडुप परिसरात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे उद्यान संवर्धन, संशोधन आणि जनजागृतीचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
अखिल भारतीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आंदोलन सुरु केले होते, आज या संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानभवन येथे भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. याबाबत पहिली विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार मंत्रालय स्तरावरही बैठक घेण्यात येईल. शासन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित केले, त्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे.
#Maharashtra #AshishShelar
Delighted to address a distinguished gathering of industry leaders, policymakers and technology experts at ABP Group’s INFOCOM Mumbai 2026, which marks 25 remarkable years of this prestigious platform driving conversations around innovation and transformation. This year’s theme, ‘Theme for a Dream’, beautifully reflects the power of ideas, imagination and leadership in shaping the future.
Commend ABP Group and INFOCOM for organizing this insightful conference focused on AI, cybersecurity, digital transformation and the technologies powering India’s next era of growth.
#AshishShelar
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात विकसित करण्यात येणाऱ्या कॉरिडोरमुळे भाविकांसाठी विविध आधुनिक आणि सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत.
श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर परिसर में विकसित किए जाने वाले कॉरिडोर के माध्यम से श्रद्धालुओं के लिए विभिन्न आधुनिक एवं सुविधाजनक व्यवस्थाएं उपलब्ध कराई जाएंगी।
(मुंबई | 25-5-2026)
#Maharashtra #SiddhivinayakTemple