९ ते ५ कधीच नऊ ते पाच नसतं खंडेराव..ते सात ते सात असतं.. वरांगी स्वच्छ दिसणाऱ्या उदरनिर्वाहासाठी ७ ते ७ बंदिस्त कोंडवाडे निर्माण झाले.. आता माघारीचे दोर आत्मघातकी सन्मानासाठी कापले जातील..यात जो कोणी अडकला.. त्याला माघार घेऊ दिली जाणार नाही.. खंडेराव, जपून उतर यात..❤️
#नेमाडपंथी
पूर्ण भरलेल्या बसचा ड्रॉयव्हर
जीवघेण्या घाटातून बस चालवतांना शीळ घालत , गाणे म्हणत, प्रवाशांशी हसत खेळत बस चालवतो का तंबाखूची गुळणी तोंडात ठेवून, गंभीर चेहऱ्याने याने मला काहीही फरक पडत नाही.
त्याने घाट धोकादायक असण्याचे कारण न देता, साऱ्या प्रवाशांना सुखरूप मुक्कामाला पोचवणे हे त्याचे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल काम आहे ; त्याचे दिसणे, हसणे सारे दुय्यम ;
______________________
हृदयाच्या वा मेंदूच्या शस्त्रक्रिया करणारा शल्यविशारद
प्रत्यक्ष ऑपरेशनच्या वेळी चेहऱ्यावर काय भाव ठेवतो याने मला काहीही फरक पडत नाही
त्याने शस्त्रक्रिया अवघड आहे असे कारण न देता, शस्त्रक्रियेनंतर मी लवकरात लवकर खडखडीत बरा होणे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल ; बाकी सारे दुय्यम
_______________________
ज्या दाईकडे मी माझे बाळ दिवसभर सोपवून जाते
ती दाई सलवार कमीज घालते की साडी ; शाकाहारी आहे की मांसाहारी याने मला काहीही फरक पडत नाही
दाईने बाळ खूप रडते असे कारण न देता, बाळाच्या खाण्या / पिण्याच्या , सुरक्षतितेतच्या गोष्टी सांभाळणे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल ; बाकी साऱ्या दुय्यम गोष्टी
______________________
मी निवडून दिलेला राज्यकर्ता / नेता
कधी भावनिक होतो , कधी रडतो, कधी जोरजोरात बोलतो, किती चांगले भाषण करतो याने मला काहीही फरक पडत नाही
त्याने कोणतीही आंतरराष्ट्रीय घडामोडींची कारणे न देता कोट्यवधी ग्रामीण / शहरी नागरिकांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुखावह करण्यासाठी ; त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य घडवण्यासाठी , सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करावे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल , बाकी साऱ्या गोष्टी दुय्यम
संजीव चांदोरकर ( २७ मे २०२६)
मतलब ओ अलगच लेव्हलची पार्टी हाय! 🤣
Full चांद्या पासून बांध्या पर्यंत सगळेच ड्रॅमेबाज भरलेत… 🫣😅
आता मथुरात खासदार हेमा मालिनी आणि स्थानिक आमदारांनी ऑटो रिक्षालाच भाजपचा झेंडा, पोलीस सायरन आणि “विधायक जी” नाव लावून पूर्ण राडाच केला म्हणे! 🤣🚨
लो भाई इंस्टाग्राम पर रील बनाकर धड़ल्ले से नकली नोट बेचे जा रहें है।
और वो चिप वाली आंटी और तिहाड़ी कहते थे सेटेलाइट को सिग्नल मिल जायेगें।
रुबिका से पूछकर देखो तो इसके फायदे भी गिनवा सकती है।
Instagram लूक मिळविण्यासाठी मेकअप, फॅशन, दागिने, चप्पल, बॅग्स यावर बराचसा पैसे व वेळ खर्च भारतीय स्त्री जर तिला मिळणार्या सोयी सुविधा, तिचे हक्क यावर दोन शब्द नियमितपणे बोलायला लागली तर किती बदल घडेल, नाही? 🤷🏽♀️
Sudden rise and capture of Power in short span(2 Years) by forming new party by *Thiru C Joseph Vijay* _alias_ Thalapathi in Tamilnad could be alarming to those who holds current Government in Center as well in other States.
तान्ही बाळ 👶🏼 उनात ट्रैफिक मध्ये उपाशी राहतील🚗
🚑 रुग्णवाहिके मधे पेशंट मरतील
पण लोक वाहनातून बाहेर येऊन भिकार सरकारला जाब विचारणार नाहीत
हा मेलेला षंढ महाराष्ट्र आहे
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
#MissingLink
वरून पडणारे चाकू किंवा तलवारी पकडण्याचा प्रयत्न करू नये…. शेअर बाजारातील शहाणपण !
सेन्सेक्स आणि शेयर मार्केट…. मध्यपूर्वेतील परिस्थिती मुळे, नर्व्हसनेस मुळे अजून खाली जात आहे. कोणी ग्रेट ज्योतिषी देखील नक्की काय होईल ते सांगू शकतं नाही.
आज आता लिहिताना सेन्सेक्स ११५० अंकांनी खाली…७२,४३० आहे.
५२ आठवड्याचा नीचांक ७१,४२५ होता. त्याच्या फक्त एक हजार अंकाने दूर. त्याच्या जवळपास सरकत आहे.
फायनान्शियाल सल्लागार/ ब्रोकर्स अनेक सल्ले देतील. टेक्निकल ऍनॅलिसिस सांगतील. मार्केट बॉटमला आहे. यानंतर ते वरच जाणार आहे. अनेक शेअर्सचे अतिशय आकर्षक बाजारभाव आहेत. तुम्ही तर चडफडत होतात तो शेयर विकत घेण्यासाठी. हा तर ५२ आठवड्याच्या निचांकाच्या जवळ आहे.
सगळ्यांचे ऐका. पण निर्णय घेण्याआधी मनाचे ऐका.
आपण किती नुकसान सहन करू शकतो याचा कागदावर हिशोब करा.
समजा मार्केट उलटे फिरले आणि तुम्ही खालच्या बाजारभावाची बस मिस केली. कोणी मरत नाही. बसेस सतत येत असतात. काही काळाने जास्त भावात शेयर खरेदी केलात तर काय होईल? कमी भांडवली नफा होईल. एवढेच.
नफा/ रिटर्न आणि जोखीम/ रिस्क…या दोन्हीवर एकाचवेळी दोन्ही डोळ्यांची बुबुळे लावून ठेवा. यात एकाचवेळी हा शब्द महत्वाचा. नजर हटी, दुर्घटना घटी.
दिसेल त्याला सारख्या सारख्या टिप्स विचारू नका. संबंधितांकडून कोणत्या टिप्स मार्केटमध्ये फिरतील हे बघितले जाते. साधे नाही ते प्रकरण. त्यांना विकायचे असतात. म्हणून त्यांना खरेदी करणारे हवे असतात.
शेयर बाजारात गुंतवलेले मुद्दल देखील कधीकधी जाऊ शकते. मान्य. पण मुद्दल कमीतकमी उडून जाईल अशी किमान सजग स्ट्रॅटेजी तरी हवी.
काही काळ कॅश घेऊन बसलात तर काही सेबी शिक्षा करत नाही. कॅशवर शांतपणे बसायला शिकले पाहिजे. कॅश सारखी आपल्याला ढुशी मारत राहते “मला बसून कंटाळा आलाय. मला एकदाचा गुंतव” त्याला बळी पडू नका.
दुसरी स्ट्रॅटेजी. एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका. शेयर कितीही आकर्षक वाटला तरी गुंतवणुक जास्त कंपन्यांच्या शेयर मध्ये करा. जोखीम विखरून टाका.
हे सल्लागार, ब्रोकर पहाटेपासून स्क्रीनवर खिळून असतात. तुम्ही नोकरी, धंदा, व्यवसाय सांभाळून गुंतवणूक करता. हा मूलभूत फरक लक्षात ठेवा.
जास्तीत जास्त नफा कमावण्याची स्पर्धा कोणाशीही खेळू नका.
आपल्या कष्टाने, घामाने कमावलेल्या बचती…सर्वात मूल्यवान असतात. स्वतःच्या मुलांची काळजी घ्याल तेवढी स्वतःच्या बचतींची काळजी घ्या..
संजीव चांदोरकर (३० मार्च २०२६)
UPSC-MPSC ची तयारी करून आपण पास होऊन अधिकारी नाही झालो तरी एक चांगला नागरिक नक्की होऊ हा फार मोठा गैरसमज आहे. फार फार तर जाणकार वगैरे होतो आपण.. बाकी किमान आपल्याकडे तरी ज्ञान किंवा माहितीचा उपयोग अर्थार्जनासाठी होत नसेल तर फक्त खिल्लीच उडवली जाते.
#स्पर्धापरीक्षा