MPSC म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयोगशाळा आहे का?
कधी अभ्यासक्रम बदल, कधी Optional विषय सुरू करून पुन्हा बंद, आता अचानक Online परीक्षा आणि त्यातही अन्यायकारक Normalization पद्धत!
MPSC सारख्या स्वायत्त संस्थेला महाराष्ट्रात एक साधी ऑफलाईन परीक्षा सुद्धा पारदर्शकपणे घेता येत नसेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
विद्यार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून, वर्षानुवर्षे कष्ट करून तयारी करायची आणि आयोगाने एका निर्णयाने त्यावर पाणी फेरायचं? विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोण घेणार?
MPSC ने गट 'क' ऑनलाइन परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यायकारक Normalization पद्धत रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबवावा. नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan
#MPSC #GroupC #OfflineExam #Normalization #MPSCStudents
सरळसेवा भरतीचे आज पर्यंत एक ही पेपर इमानदारीने झाले नाहीत. खाजगी कंपन्या मग त्या कोणत्याही असेना त्या घोटाळे करतातच. यात सहभागी सरकार पण आहे कारण ते या कंपन्यांकडून मलिदा घेतात आणि ह्या कंपन्या खाली .... खातात. प्रत्येक वेळेस आम्ही सरकारला सांगत आलो आहोत घोटाळे होतात परीक्षा @mpsc_office कडे द्या पण परीक्षा जर #MPSC कडे दिल्या तर सरकारला घोटाळ्याचा महसूल कसा मिळेल? म्हणून सरकार सर्व परीक्षा MPSC कडे देत नाहीये.
@TCS@Mars_TCSiON एक तरी परीक्षा आपण नीट घेतली का? कश्याला खाजगी सेंटर देत आहात. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला घोडा लावायचे काम तुम्ही आणि @Dev_Fadnavis करत आहेत. तलाठी भरतीला तेच केला. सेंटर मॅनेज करून प्रत्येक परीक्षा मध्ये हेच होत आहे. आता शिक्षक भरतीची TAIT झाली त्यात सुद्धा हेच झालं. प्रामाणिक आणि होतकरू मुलांचे भविष्याचे वाटोळे केले आहे या सरकारने. आता तरी सरकारने TCS आणि IBPS यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून परीक्षा ह्या Mpsc आयोगाकडे देण्यात यावे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ssaunik@NANA_PATOLE@INCHarshsapkal@AUThackeray@RRPSpeaks@Awhadspeaks@PawarSpeaks@LoksattaLive@SakalMediaNews@abpmajhatv@TV9Marathi
BMC SE निकालावरून सरकारच्या अपारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह!
7 मे रोजी BMC ने जाहीर केलेला Assistant Engineer (AE) निकाल IBPS च्या अधिकृत आणि पारदर्शक Format मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या निकालात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, श्रेणी, गुण, कट-ऑफ – सर्व काही व्यवस्थित आणि तपशीलवार स्वरूपात नमूद होते. यामुळे उमेदवारांना स्वतःचा निकाल समजून घेणे आणि निवड प्रक्रियेबाबत विश्वास ठेवणे शक्य झाले.
मात्र, 12 जून रोजी जाहीर करण्यात आलेला Sub Engineer (Mechanical, Electrical) निकाल केवळ एका साध्या Excel शीट स्वरूपात प्रसिद्ध केला गेला आहे. यात ना गुण आहेत, ना श्रेणी, ना कट-ऑफ, ना कुठलेही अधिकृत तपशील. केवळ नाव आणि रोल नंबर!
हेच का आहे ‘सुशासन’?
सरकार एकाच भरती प्रक्रियेतील दोन वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे निकष वापरत असेल, तर पारदर्शकतेचा आणि विश्वासार्हतेचा सर्वस्वी अभाव वाटतो. ही गोष्ट केवळ गोंधळाची नाही, तर संशयास्पद आणि गंभीर आहे.
@mybmc ने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की –
➡️ एकाच परीक्षेसाठी दोन वेगवेगळे निकाल Format का?
➡️ SE पदासाठी गुण, कट-ऑफ, श्रेणी का लपवण्यात आले?
➡️ जर AE निकाल IBPS Format मध्ये शक्य आहे, तर SE निकाल तसे का नाही?
हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नाही, तर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि नीतिमत्ता हरवत असल्याचे संकेत आहेत.
आमचा स्पष्ट आग्रह आहे –
➡️ @mybmc ने त्वरित या बाबत खुलासा करावा
➡️ SE (Mechanical, Electrical) निकाल देखील IBPS च्या अधिकृत Format मध्ये पुनः प्रकाशित करावा
सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे. अन्यथा #BMC_SE भरतीतील विश्वासार्हतेवर कायमचे काळे डाग उमटतील.
#BMC_SE
#SE_Result_Issue
#IBPSFormat
#सरकार_जवाब_दो
#YouthDeservesTransparency
#StopPlayingWithCareers
अनेक ठिकाणी गुन्हे असतानाही एका उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार आहे.
#PWD#Mhada अशा विभागांच्या परीक्षेत डमी उमेदवार म्हणून गुन्हा दाखल असणारे विष्णू रतनसिंग जरवाल यांना #WRD@Deepakk75058621 जलसंपदा विभागाने CEA पदी नियुक्ती दिली आहे. अशा उमेदवारांना का नियुक्ती देण्यात आली याच स्पष्टीकरण विभागाने द्यावे. सोबत शासन पत्र, नियुक्ती पत्रे आहेत दोन्ही तपासून घ्यावे. प्रामाणिक उमेदवारावर अन्याय होणार असल्याने याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी.
@RVikhePatil@girishdmahajan@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks .
जलसंपदा भरती 2023-१४ पदांची प्रतीक्षा सूची १ ऑगस्ट २०२५ रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही नम्र विनंती @Deepakk75058621@girishdmahajan@RVikhePatil
जलसंपदा भरती 2023-१४ पदांची प्रतीक्षा सूची १ ऑगस्ट २०२५ रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही नम्र विनंती @Deepakk75058621@girishdmahajan@RVikhePatil
मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1957 साली उद्धाटन केलेला प्रतापगडवरील छत्रपती शिवरायांचा हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे.
मात्र महाभ्रष्ट युती सरकारने उभारलेला सिंधुदुर्गातील महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला.
#मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून बेजबाबदार सरकारचा जाहीर निषेध. सरकार फक्त दिखाव्यांसाठी काम करते का? महापुरुषांच्या स्मारकांच्या कामातही #दलाली खाल्ली का? असा प्रश्न आज पडतो.
महाराष्ट्राला #दलालीच्या_दलदलीत अडकवणाऱ्या या #टेंडरबाज सरकारला जमीनदोस्त केल्याशिवाय महाराष्ट्र आता स्वस्थ बसणार नाही. असो!
द्वेष पसरवण्याच्या गोष्टींमध्ये डराव-डराव करणारे स्थानिक नेते याबाबत सरकारला जाब विचारतील, ही अपेक्षा!
#ChhatrapatiShivajiMaharaj |
#Maharashtra | #Malvan |
मित्रांनो कोणत्याही बातमीने पॅनिक होऊ नका.
कोणत्याही परिस्थितीत कृषीच्या जागा समाविष्ट करून राज्यसेवा जाहिरातीत अतिरीक्त जागांचा समावेश करून घेऊन शेवटच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ.
सर्वजण गट तट सोडून एकत्र या...
#MPSC
आज आंदोलनाचा सातवा दिवस शासन आमच्या मागण्याची दखल नघेतक्याने नाईलाजाने आम्ही पाच अभियोग्यताधारक आजपासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केलेली असून आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघे घेणार नाही.हा शासनाला इशारा आहे.
#दहाटक्केसह_सेकंडफेज_जाहिरातद्या