मुंब्रा येथील माझा गेल्या अनेक वर्षांचा सहकारी बबलू शेमणा याचा आज वाढदिवस आहे. निष्ठेत कधीच तडजोड न करणारा आणि तत्त्वासाठी कधीच मागे न हटणारा कार्यकर्ता, अशीच बबलूची ओळख सांगता येईल. २४ तासात कधीही काम सांगा, सदैव बबलू तत्पर ! एकीकडे ज्यांच्यावर विसंबून रहावे, अशी माणसे कमी होत असतानाच अशी काही माणसे आहेत की, ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवू शकता; त्यामध्ये बबलूचे नाव नक्कीच अग्रक्रमाने घेता येईल. बबलू शेमणा यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
@Awhadspeaks खूप खूप धन्यवाद साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण प्रेम दाखवलं त्याबद्दल आपले मनापासून आभार
आपण जो देशभरात संविधानाच्या बाजूने लढा उभा केला आहे आपण जेव्हा जय जय भीम चा नारा देतात या सर्वांमुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला खूप ऊर्जा भेटते
🙏🏻 thank you so much BOSS
शिव, फुले, शाहू , आंबेडकर यांच्या विचारधारेवर सतत कार्यरत असलेला प्रविण पवार हा माझा मुंब्रा येथील कार्यकर्ता ! आंबेडकरी विचारधारेशी कधीच प्रतारणा करणार नाही. प्रतिकूल परिस्थितीतून तावून - सुलाखून घडलेला हा कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी अन्याय - अत्याचार झाला तर सनदशीर मार्गाने आंदोलनाची भूमिका स्वयंस्फूर्तीने तो घेत असतो. पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या पवारचे माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. माझ्या संविधानवादी भूमिका जनमानसात पोहचविण्यासाठी तो झगडत असतो. त्याचा आज वाढदिवस, त्याला मनापासून शुभेच्छा !
मुंब्रा येथील एम.एम.वेली रस्त्यालगत ठा.म.पा जागेवर नैसर्गिक नाल्यावर भरणी करून सरासपणे अनधिकृत बांधकाम सुरू आहे.सन्माननीय माजी नगरसेविका व काही समाजसेवकांनी वारंवार तक्रार करून देखील ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही.
@TMCaTweetAway@Awhadspeaks
राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मी काही दिवसापूर्वी एक लायब्ररी कळवा मध्ये सुरू केली होती.लायब्ररी च कामकाज कस सुरू आहे..? विद्यार्थ्यांना काही समस्या आहेत का..? याबाबत माहिती घ्यावी,या उद्देशाने आज तिथे भेट दिली,आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांनी लायब्ररीच्या एकूणच व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना या लायब्ररीचा फायदा होतोय,हे पाहून समाधान वाटलं
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तर लिहिलेच; त्याचबरोबर देशात स्वाभिमानी जमात जन्माला घातली. मला अभिमान आहे सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा जी परिस्थितीने अत्यंत गरीब आहे, असे असूनदेखील, 'सरकारची भिक आम्हाला नको, सरकारची मदत आम्हाला नको' , आलेले दहा लाख रूपये परत पाठवून दिले. अशा आईच्या पोटी जन्माला यायला भाग्य लागते. या स्वाभिमानी आईला माझा मानाचा मुजरा !
सरकारकडून न घेतलेले दहा लाख रूपये मी त्यांच्या घरी जाऊन देईन; जर आईने घेतले तर ! मला तिचा स्वाभिमान दुखवायचा नाही. पण, खरोखरच मला त्या मुलाला मदत करायची आहे. ज्याच्या मागे कुणीही नाही. त्याच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे, ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती अन् त्या भूमिकेचा मी प्रचंड चाहता आहे. जिथे अन्याय- अत्याचार होत आहे; त्याविरोधात आपण उभे राहिलेच पाहिजे, ही डाॅ. बाबासाहेबांची शिकवण कायम स्मरणात राहिल.
सोमनाथ कसा मेला कुणी मारले
सरकार का लपवून ठेवत आहे
Its a institutional murder
पुन्हा एकदा सोमनाथ सुर्यवंशीच्या आईला मानाचा मुजरा !!
#जयभीम
आरोपीला न्यायालयाच्या दारात नेऊन त्याचा Encounter घडवून आणणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे..!
संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती घेऊन त्या अनुषंगाने गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपालिका भूमिका बजावत असते. पण याउलट युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती महाराष्ट्रात आणण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे.
कायदा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीच आहे, पण कायद्याचा गैरवापर जेव्हा केला जातो तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुणी म्हणतंय की अक्षयने आत्महत्येचा प्रयत्न केला, कुणी म्हणतंय की पोलिसांनी एन्काऊंटर केलं... आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस काय करत होते? पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश कुणी दिले? गोळ्या कुठे लागल्या? हे प्रकरण संशयास्पद असून याची न्यायिक चौकशी व्हायलाच हवी.
पण त्यासोबतच, महत्त्वाचं म्हणजे, निवडणुका तोंडावर असताना अशा हिंसक व न्यायविरोधी घटना घडवून आणून लोकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत गंभीर आहे.
या प्रकरणात नक्की काय लपवलं जातंय, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय?
सदर अपघाताला 3महिने उलटूनही मृत पावलेल्यांच्या पालकांना व जखमींना @ThaneCollectorअजूनही कोणतीही प्रशासकीय आर्थिक सहायता मिळालेली नाही.यावर नागरिकांमध्ये रोष आहे. @ThaneCollectorयांना @Awhadspeaks डॅा.जितेंद्र आव्हाड स्वतः भेटून याचे गांभिर्य निदर्शनास आणून दिले होते.
ज्या गाडीमुळे हे घडले
ही RMC ची गाडी कुठे जात होती.
गाडीला मार्ग दाखवण्यासाठी मोटारसायकल वर कोण होते ?
पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी…
आणि महानगर पालिकेचे अधिकारी सांगतात ना अनधिकृत काम बंद आहेत मग सकाळपासून ६ RMC च्या गाड्या गेल्या कुठे …..
@ThaneCityPolice@TMCaTweetAway
बृहन्मुंबई महानगर पालिका आणि पोलीस यांच्या संगनमताने कोणतीही चौकशी न करता पवई येथील जय भीमनगर ही झोपडपट्टी पाडण्यात आली होती. आज दुपारी मी या झोपडपट्टीधारकांना भेटण्यासाठी गेलो असता, जो पर्यंत पूर्ण चौकशी होत नाही. तोपर्यंत येथे कोणतेही काम होऊ देणार नाही, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले होते. आता रात्रीचे ११ वाजून ५५ मिनिटे झाली आहेत. मी आताच घरातून निघालो आहे कारण मला आताच समजलंय की तिथे पुन्हा काम सुरू झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी आहे अन् अशा पद्धतीने जर पोलीस आपले काम नाकारत असतील तर गोरगरीबांनी कायदा हातात घेतला तर कोणाला दोष देऊ नका. इतका अन्याय महाराष्ट्रातील गोरगरीब, दलित जनता सहन करणार नाही आणि आमच्यासारखे जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तर नाहीच नाही !
माहितीसाठी -
पोलीस महासंचालक आणि सर्व पत्रकार मित्र
@DGPMaharashtra@MumbaiPolice
https://t.co/LbDRPPT8qQ
महिलांच्या सन्मानावर बोलणारे यावर @surajvchavan आणि @umeshpatilspeak आंदोलन करणार का? जेव्हा मनुस्मृती सरकार पुन्हा आणत होतं तेव्हा तुम्ही का आंदोलनं केली नाहीत? खोक्यांना विकलेले यावर तरी बोलणार का?
@Awhadspeaks thank you so much BOSS
साहेब तुमचे मार्गदर्शन आशीर्वाद प्रेम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर नेहमी तुम्ही दाखवले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार साहेब
तुम्ही जेव्हा जय जय भीम चा नारा देता तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अन्याया विरुद्ध लढण्याचे खूप बळ भेटते
जय भीम
लोकसभेसाठी यंदा उत्तर-पूर्व दिल्लीत कन्हैय्या कुमार विरूद्ध मनोज तिवारी अशी लढत होणार आहे.
एका बाजूला विद्यार्थी चळवळीतून आलेला तरूण, तडफदार कार्यकर्ता आणि दुस-या बाजूला मोदी लाटेत अभिनेत्याचा झालेला नेता अशी लढत होणार आहे. कन्हैय्या कुमारचा लोकसभेत प्रवेश झाला तर विरोधकांच्या तोंडचे पाणी पळून जाईल. संविधानाची जाण असणारा आणि बाबासाहेबांना मानणा-या माझ्या तरूण मित्राला खूप खूप शुभेच्छा! #लढेंगेजितेंगे
दूर दुनिया का मेरे दम से अंधेरा हो जाए !!
हर जगह मेरे चमकने से उजाला हो जाए !!
Last night, I felt very emotional after seeing a boy named Abdur Rehman selling pens. When I asked him about his studies and school, he said he had to leave school due to poverty. It really broke my heart. Starting this Friday, Abdur Rehman, along with his elder brother and younger sister, will go to school.
#PadhegaMumbraAbBadhegaMumbra