हजारो जिंतूर-सेलूकर जनतेच्या उदंड उपस्थितीत देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांची झंजावाती सभा सेलू शहरात पार पडली.
माझ्यावर उमेदवारीची जबाबदारी देत विश्वास टाकल्याबद्दल आदरणीय @PawarSpeaks साहेब, प्रांताध्यक्ष @Jayant_R_Patil साहेब, तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेतृत्व, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्यांच्या उत्थानासाठी मी सतत कार्य करत आलो त्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेचे आभार मानतो
शिवस्वराज्य यात्रा, लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा..!
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'शिवस्वराज्य यात्रेची' जिंतूर, परभणी येथे भव्य सभा संपन्न झाली. लोकं योजना स्विकारतील की नाही या भीतीने जाहिरातबाजी होते आहे, अशी टिका प्रदेशाध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांवर केली. मतांची आली कडकी, बहिण झाली लाडकी अशी खोचक टिका पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली. तसेच भाजपचे नेते कापूस, सोयाबीनला भाव देणार होते त्याचं काय झालं? असा सवाल माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी सभेच्या माध्यमातून सरकारला केला.
यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. फौजिया खान, जयप्रकाश दांडेगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे, माजी विजय भांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, रमेश महाराज, अशोक काकडे, डी. आर. तुपसुंदर, मनिषा केंद्रे, प्रेक्षा भांबळे, रितेश काळे, सोनाली देशमुख, प्रद्युम्न पाटील, अजय चौधरी, रामराव उबाळे, मनोज थिटे, सचिन बोबडे, आशाताई खिलारे, कपिल फारुकी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#शिवस्वराज्य_यात्रा #ShivSwarajyaYatra #NCPSP
प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या जिंतूर, परभणी येथील सभेत युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे यांनी मांडलेले ठळक मुद्दे.
#शिवस्वराज्य_यात्रा#ShivSwarajyaYatra#NCPSP
प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या जिंतूर, परभणी येथील सभेत पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी मांडलेले ठळक मुद्दे.
#शिवस्वराज्य_यात्रा#ShivSwarajyaYatra#NCPSP
प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या जिंतूर, परभणी येथील सभेत माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी मांडलेले ठळक मुद्दे.
#शिवस्वराज्य_यात्रा#ShivSwarajyaYatra#NCPSP
अत्यंत शांत, उत्तम समन्वयक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आपणास आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
@uddhavthackeray
देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज ८३ वा वाढदिवस! आठ दशकांची ही गाथा, देशातील मातब्बर नेतृत्व, आज संपूर्ण देश ज्यांच्याकडे आशेने पाहतो, असे आपल्या सर्वांचे पाठीराखे आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब, आपणास जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
@PawarSpeaks