नमस्कार @mpcb_official चिपळूण येथील खडपोली MIDC मधील कंपनी मधून midcच्या मागील नैसर्गिक ओढ्यामध्ये केमिकल असलेले पाणी सोडले जात आहे आणि हेच पाणी पुढे वाशिष्ठी नदीला मिळत आहे.दूषित पाण्यामुळे नैसर्गिक हानी तर होत आहेच पण नागरिकांच्या आरोग्याला पण धोका आहे.त्वरित कारवाई करावी.
नमस्कार @MDNagpure@PMCPune पुण्यात पाणी कपात चालू असताना,गणपत नगर पापळ वसाहत बिबवेवाडी इथे पिण्याचे पाणी दररोज असच वाहून जाते.दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते.वेळोवेळी पुणे मनपा,स्थानिक नगरसेवक यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा काही ठोस उपाययोजना नाही.
नमस्कार @PMCPune हे कचरा वाहण्याची गाडी आहे की सांडपाणी रोडवर टाकायची.या चिकट सांडपाण्यामुळे अपघात होऊ शकतो. अपघात झाला तर त्याची जबाबदारी आपण घेणार का ?????
Namaskar 🙏 @SamsungIndia@SamsungMobile I am a loyal customer of yours, but my mother tongue,Marathi,is not available in the Live Translate feature on my Samsung S25 Ultra. I kindly request you to please make the Marathi language available in it.
नमस्कार @MahaForest तुम्ही ज्यांचा फोटो लावला आहे ना त्यांनाच सांगा त्यांनीच खुप झाडे तोडली आहेत.आणि अजूनही विकासाच्या आणि धर्माच्या नावाखाली झाडे तोडत आहेत.
@Riteishd छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट शिवरायांच्या मातृभाषेत पाहणेच अधिक वास्तववादी ठरेल, ज्या भाषेत खरोखर महाराज बोलले असतील.
महाराष्ट्राच्या बाहेर इतर भाषेत देखील चित्रपट व्हावा पण महाराष्ट्रात मात्र चित्रपटगृहाचे तिकीट मराठीचेच काढा !
#शिवरायांची_मातृभाषा
भाजप आणि काँग्रेसच्या आयटी सेल मध्ये राजा शिवाजी या चित्रपटावरून जातीय युद्ध सुरू आहे.
हा वाद चित्रपटाचा नसून दोन्ही गटातल्या जातीय आणि धर्मांध मानसिकतेचा आहे, मराठी लोकांनी या दोघांच्या वादात पडले नाही पाहिजे.
चित्रपट पहिल्या दिवशीच पाहणार आणि मराठीतच. #राजाशिवाजी आतुरता❤️
@MumbaiPolice महाराष्ट्रात धुलिवंदनला रंग खेळत नाही. होळीच्या राखेला वंदन करून राखेने धुलिवंदन खेळतात. रंग रंगपंचमीच्या दिवशी खेळतात. चुकीची पोस्ट केली आहे तुम्ही.
@MeSiddheshRane आपल्या मराठी लोकांना बाहेरच्यांच्या संस्कृती अंगावर घेयची घाण सवय लागली आहे.त्यात धुलीवंदनला व्यावसायिकांनी वेगवेगळे होली नावाने उपक्रम चालू केले आहेत.जिथे मराठी मूल मुले जाऊन रंग खेळतात.आपण मराठी लोक धुलीवंदनला रंग खेळत नाही.रंग आपण रंगपंचमीच्या दिवशी खेळतो