🚨 FRAUD COACHING CLASS BUSTED BY MNS! 🚨
In Kalyan, a man posing as a GST officer was exposed by the MNS Student Wing for running fake coaching classes under the name “Siddharth Logic” for UPSC, MPSC , banking and other competative exams.
❌ No real teachers
❌ No training
❌ Fake credentials
✅ Fees collected: ₹30K–₹50K from over 400 students!💰 Estimated scam: ₹20–30 lakh!
In Kalyan, near the railway station, a man named Siddharth Singh Chandel, posing as a GST officer, was exposed by the student wing of Maharashtra Navnirman Sena (MNS) for running fraudulent coaching classes under the name “Siddharth Logic”, claiming to offer coaching for UPSC, MPSC, banking, and other competitive exams.
Following numerous complaints from students, MNVS District president Mr. Paresh Chaudhary and MNVS City president Mr. Vinod Kene confronted the director of the classes. When Siddharth Chandel failed to give any satisfactory answers nor documents, MNS took strict action against him.
It was discovered that through two branches in Kalyan and Navi Mumbai, an estimated 400 to 500 students were charged fees ranging from ₹30,000 to ₹50,000 each. In reality, there were no qualified teachers, no proper training, and not even a single experienced faculty member. Once students realized they had been scammed and demanded refunds, they were allegedly threatened.
The total fraud is estimated to be around ₹20 to ₹30 lakh. Furthermore, Siddharth Chandel, who falsely claimed to be a GST officer, had no official documentation or credentials to prove his claim. Upon discovering the scam, MNS student wing officials took immediate action and handed him over to the police.
Maharashtra Navnirman Vidyarthi Sena has appealed to students to thoroughly verify any coaching class before enrolling, in order to avoid falling victim to such frauds.
📢 Students, BE AWARE!Always verify before enrolling in any coaching class.
@rajupatilmanase@MNVS_Adhikrut
#MNS #StudentRights #CoachingFraud #KalyanNews #EducationScam #MNSStudentWing #UPSC #MPSC #FraudAlert #Manse #Exposed
झारखंडमधील ३८ कोटी रूपयांच्या दारू घोटाळ्यात ACB ने सुमित फॅसिलिटीजचा संचालक व पुण्यातील ठेकेदार अमित साळुंखे याला रांची येथे अटक केल्याच्या बातम्या कानावर आल्या. ह्याच सुमित साळुंखेच्या कंपनीला महाराष्ट्रातील १०८ ॲम्ब्युलन्ससह अनेक कंत्राटं दिली आहेत. निविदा भरताना कमी सर्व्हिस चार्जेस भरून कामे घ्यायची आणि घोटाळे करायची ही या कंपनीची मोडस ॲापरेंडी आहे. या कंपनीला मुंबईत deep clean चा ठेका दिलाय तसेच #KDMC मध्ये कचरा साफ करण्याचा ठेका पण याच कंपनीला दिला आहे.
जेव्हा हा ठेका १० वर्षासाठी अव्वाच्या सव्वा दरात दिला तेव्हा पण १०८ ॲम्ब्युलन्सचे कंत्राट देताना या कंपनीला विरोध झाला होता तसाच विरोध कल्याण डोंबिवलीतील जवळजवळ सर्व विरोधी पक्षांनी केला. परंतु मोठमोठी पदं उपभोगूनही कचऱ्यातुन पैसे खाण्याची सवय लागलेल्या आमच्या ठाण्यातील दोन ‘कचरा सेठ’ नी या कंपनीला ठेका दिलाच व आम्हा कल्याण डोंबिवलीकरांवर कचरा संकलन कर लावून टाकला. हे आमचे दोन ‘कचरा सेठ’ हाच टक्केवारीतून कमावलेला माल घेऊन पुन्हा KDMC त पालिका निवडणुकांमध्ये येतील व पैश्याचा जीवावर निवडणुका जिंकण्याचा डाव रचतील. त्यामुळे माझी एकंदरीतच KDMC व आजूबाजूच्या पालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना विनंती आहे की वेळीच सावध व्हा, कारण……’कचरा सेठ’ आ रहा है ।
#कचरा_सेठ #भ्रष्टाचार
सस्नेह जय महाराष्ट्र,
काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती.
माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता.
ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या.
बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं.
मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली.
मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.
माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे.
आणि लोकं हे पण म्हणतील तुम्ही मुद्द्याचं बोलताय, तुम्ही गुद्दे पण देताच की... हो आम्ही देतो गुद्दे....
महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिलेत आणि यापुढे देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका.
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे.
महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू.
यांत काही मोजके पत्रकार, त्यांच्या हातातील वर्तमानपत्र असो की एखादं चॅनेल, याचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरायचं सोडून, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर करत आहेत हे उघड झालं.
समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही. मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे आणि त्यातून जो वणवा पेटतोय त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका.
जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा.
आपला
राज ठाकरे
"एकतर टोलवसुलीच्या नावाखाली लोकांकडून अव्वाच्या-सव्वा पैसे घेता आणि ते घेण्यासाठीही लोकांना ५-५ तास त्यांना वाहनांच्या रांगेत ताटकळत ठेवता, ऍम्ब्युलन्स आली तरी सोडत नाहीत... लोकं ह्यावर संतापली आहेत आणि लोकं नक्की त्यांचा राग मतपेटीतून व्यक्त करतील." - मनसे नेते श्री. अमित ठाकरे
#ActionOrientedAmitThackeray
"कुणाचंही राजकीय पाठबळ नसलेली नव्या दमाच्या तरुण-तरुणींची आम्ही पदाधिकारी म्हणून नेमणूक करतो तेव्हा खूप आनंद होतो." - मनसे नेते श्री. अमित ठाकरे
#ActionOrientedAmitThackeray
जर NIA दिल्लीवरून पडघा- बोरीवलीत लक्ष घालून दहशत वादी कारवायांसंदर्भात संशयित पकडुन नेतात तर पडघा पोलीस ठाणे काय फक्त वसुली चे काम करतात का ?
गोपनीय खातं नक्की कुठ खातंय...
@ThaneCollector@Thane_R_Police
https://t.co/RUrIrgkzo4
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो.
ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती.
अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित.
राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं).
मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत.
काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे.
माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील.
राज ठाकरे
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
Raised voice against the biggest problem in #Bhiwandi City - The Dadagiri of Torrent Co.
Demanded:
1. Full audit of Torrent
2. End to monopoly of this company in Bhiwandi.
#RiseWithRais
@RajThackeray साहेब १७ वर्ष आम्ही साथ दिली अस तुम्हीं मोठ्या मनाने म्हणता, पण आम्हाला “महाराष्ट्र सैनिक” ही स्वाभिमानाची आोळख तुम्हीं दिली.. तुमच्या ऋणात आम्ही आयुष्यभर राहू. साहेब तुम्हीं आवाज दया, आम्ही नेहमीप्रमाणे पुढच्या क्षणाला आदेशाच पालन करु. अनेक शुभेच्छा..@mnsadhikrut